बियाणे


शेतामध्ये चांगल्या उत्पादनासाठी ज्याप्रमाणे चांगली जमीन असणे गरजेचे असते
, चांगले पाणी व्यवस्थापन महत्वाचे असते, खते महत्वाची असतात. त्याच प्रमाणे अतिशय महत्वाचे असते ते म्हणजे ज्या पिकाचे उत्पादन घ्यावयाचे आहे त्या पिकाच्या योग्य जातीची निवड व त्या जातीचे उत्कृष्ट बियाणे. उत्तम प्रतीचे बियाणे हे भरघोस उत्पादनाचा गाभा आहे. बियाणे शक्यतो आपल्या शेतावरच बनविण्याचा प्रयत्न करावा त्यातून बियाण्याच्या शुद्धते बद्दल आपल्याला खात्री असते. तसेच कुठल्याही प्रकारची भेसळ नसेल याची आपल्याला पूर्ण कल्पना असते. उत्पादन क्षमता याबाबतही आपल्याला शंका नसते. तसेच पारंपारिक बियाण्याचे जतन करणे आवश्यक आहे ते आपले मूळ आहेत त्यापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळते. बाहेरील बियाणे घेण्यापेक्षा आपल्या पारंपारिक बियाण्यांच्या लागवडीला महत्व द्यावे. त्यातून आपल्याला खात्रीशीर उत्पादन तर मिळतेच सोबत पारंपारिक बियाण्याचे जतनही करणे होते व त्याची वाढ करण्यासही चांगला वाव मिळतो. पिकाच्या ज्या वाणाची लागवड करावयाची आहे त्याचे गुणधर्मही त्यात चांगल्या प्रकारे असतात. 
सध्या मोठ्या प्रमाणात बियाणे हे खरेदी केले जातात. अशा वेळी बाहेरून बियाणे खरेदी करताना सतर्क राहून, डोळस व अभ्यासक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे. बियाणे खात्रीशीर असणे महत्वाचे आहे, कारण पुढे उत्पादनाची सर्व धुरा हि चांगल्या प्रतीच्या बियाण्यावरच अवलंबून असते. बियाणे हे शुद्ध जातीचे असले पाहिजेत हेही बघावे. ज्या पिकाची लागवड करावयाची आहे त्याचे जे वाण निवड केले आहेत त्या वाणाचे त्या बियाण्यामध्ये शारीरिक व आनुवंशीक गुणधर्म असणे आवश्यक आहेत, ते आहेत कि नाही याची चौकशी करावी. बियाण्याची खरेदी करताना त्यात भेसळ या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते. म्हणजे त्या आकाराचे दुसऱ्या जातीचे बियाणे त्यात भेसळ केलेले असू शकतात. तसेच मोठ्या प्रमाणात बियाण्यात तणांचे बियाणे देखील आढळून येतात त्यामुळे या गोष्टी बघणे अगत्याचे आहे. बियाण्याच्या खरेदीच्या वेळी त्या बियाण्याची रुजवण क्षमता किती आहे हे जरूर बघावे. कारण जर कितीही महाग बियाणे घेतले आणि त्याची रुजवण क्षमता चांगली नसेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही, परिणामी नुकसान होते. त्यामुळे बियाणे खरेदी वेळी त्या बियाण्याची रुजवण क्षमता हि 80% ते 85% असावी. अशा प्रकारच्या बियाण्याची खरेदीसाठी निवड करावी   
तसेच बियाण्याची खरेदी करताना ते बियाणे रोग विरहीत आहेत कि नाही हे तपासून घ्यावे. नाहीतर पुढे जावून याचा मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. त्याचप्रमाणे बियाणे हे मोठे व टपोऱ्या आकाराचे एकसारखे असावेत. बियाणे कोरडे असले पाहिजेत व त्यावर कुठल्याही प्रकारची बुरशी असू नये या सर्व गोष्टी बियाणे खरेदीच्या वेळी बघणे गरजेचे आहे. बिजोत्पादनाच्या प्रामुख्याने अभिजात बियाणे, मुलभूत बियाणे, पायाभूत बियाणे, नोंदणीकृत बियाणे, प्रमाणित बियाणे या पद्धती आहेत. यांचे उत्पादन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने घेतले जातात तसेच काहींच्या उत्पादनाचे प्रमाणित ठिकाणेही आहेत. यापैकी बियाण्याचे प्रकार बाजारात मिळत असतात व त्याचा वापर शेतकरी लागवडीसाठी करत असतात.
या आणि इतर अनेक सावधानी बियाणे खरेदी वेळी बाळगणे महत्वाचे आहे. एकदा बियाणे घेतले गेले आणि त्याची लागवड केली गेली तर नंतर काहीच करता येत नाही. चांगले बियाणे मिळाले तर त्याचे मोठे लाभ होतात आणि ते बघावयासही मिळतात, परंतु जर बियाणे चांगले नाही मिळाले तर त्याचे नुकसानही दिसायला सुरुवात होते नंतर काहीही करता येत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी आधीच बघणे नुकसान टाळण्यास मदतीचे ठरते. चांगले बियाणे हि उत्तम उत्पादनाची गुरुकिल्ली समजली जाते. बियाण्यांमध्ये रोग व किडीस प्रतिकार करण्याची क्षमताही असणे महत्वाचे असते. तसेच बियाण्यात रुजवण क्षमता चांगली असणे आवश्यक असते. बियाण्यांना सुप्तावस्था येवू नये व सुप्तावस्था घालविण्यासाठी बियाण्यांना योग्य प्रकारची बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. बीजप्रक्रिया या बद्दल माहिती आपण पुढे बघणारच आहोत.
बियाण्याच्या निवडीवर पूर्ण उत्पादन अवलंबून असते व त्याचे काय चांगले वाईट परिणाम होतात हे सगळे आपण थोडक्यात पाहिले. यासाठी तरुण वर्गाने शेतीकडे वळणे काळाची गरज आहे. बियाणे या क्षेत्रात देखील अभ्यासक दृष्टीकोन ठेवून आधुनिक शेतीक्रांती करण्यास वाव आहे. यामध्ये पारंपारिक बियाण्यांची वाढ होवू शकते जे आपले मूळ आहे. त्याकडे आपण वळले पाहिजे ज्यातून नुकसान नाही परंतु सर्वांनाच त्याचा चांगला लाभ होण्यास मदत होवू शकते. चांगले बियाण्याची निर्मिती करण्यास सुवर्ण संधी आहेत त्या ओळखून त्याकडे वाटचाल केली पाहिजे. 

English Translate 
Seeds 

Just as good soil is essential for good production in a field, good water management is important, fertilizers are important. Equally important is the selection of the right variety of the crop to be grown and the best seeds of that variety. High quality seeds are the core of abundant production. You should try to make the seeds on your field as much as possible so that you are sure about the purity of the seeds. Also, we have a complete idea that there will be no adulteration. We also have no doubt about the production capacity. It is also important to preserve the traditional seeds to get maximum yield from what they have in their roots. Your traditional seed cultivation should be given more importance than taking outside seeds. This not only gives you a guaranteed product but also preserves the traditional seed and gives you a good chance to grow it. It also has good properties for the variety of crop to be cultivated.
Currently a large number of seeds are purchased. In such cases, it is important to be cautious when buying seeds from outside. It is important to be sure of the seeds, as all further production depends on good quality seeds. It should also be noted that the seeds should be of pure variety. The seeds of the selected varieties of the crop to be planted should have physical and genetic properties. When buying seeds, one has to face the big problem of adulteration. This means that seeds of another species of the same size may be adulterated. Weed seeds are also found in large quantities, so it is important to look at these things. At the time of purchase of seeds, it is important to check the germination capacity of the seeds. Because no matter how expensive the seed is taken and its germination capacity is not good, it is of no use, resulting in loss. Therefore, the germination capacity of the seed should be 80% to 85% at the time of purchase. This type of seed should be selected for purchase
Also, when buying seeds, make sure that the seeds are disease free. Otherwise, it may have to bear the brunt of the loss. Similarly, the seeds should be large and uniform in size. The seeds should be dry and free from any kind of fungus. The main methods of seed production are Classical Seed, Basic Seed, Basic Seed, Registered Seed, Certified Seed. Their products are grown in different ways in different places and some of them have standardized production places. These types of seeds are available in the market and are used by farmers for cultivation.
These and many other precautions are important to keep in mind when buying seeds. Once the seed is taken and planted, nothing can be done. If you get good seeds, it has great benefits and you can see it, but if you don't get good seeds, it starts to show its disadvantages and then nothing can be done. So looking at all these things in advance helps to avoid damage. Good seeds are considered to be the key to a good product. It is also important for the seeds to be resistant to diseases and kiddies. Also seed germination capacity needs to be good. Seeds should not be dormant and proper disposal of seeds is required to eliminate dormancy. We will see more about seed processing later.
The whole production depends on the choice of seed and we have seen briefly what good and bad effects it has. It takes time for the youth to turn to agriculture. In the field of seeds too, there is scope for modern agricultural revolution with a pragmatic approach. This can lead to the growth of traditional seeds that are our roots. We should turn to it which is not harmful but can help everyone to benefit from it. It is important to recognize that there are golden opportunities to produce good seeds.

Seeds Video :-

Post a Comment

0 Comments

Close Menu