गांडूळ खतामध्ये पाण्याची भूमिका


गांडूळखताची निर्मिती करताना पाण्याची भूमिका हि अत्यंत महत्वाची आहे. पाण्याशिवाय गांडूळखत निर्मिती होणे अशक्य आहे. सेंद्रिय शेती करत असताना गांडूळ खताचे महत्व अनन्य साधारण आहे. त्यासाठीच गांडूळ खताची निर्मिती जास्तीत जास्त होणे गरजेचे आहे. गांडूळखत निर्मिती विविध प्रकारे केली जावू शकते त्यामध्ये तीन प्रकारचे फायदे होतात एक म्हणजे त्यापासून खत मिळते. दुसरे म्हणजे गांडुळे मिळतात. कारण गांडूळांचे प्रजनन होत असते त्यातून त्यांची वाढ होते. चांगल्या प्रतीचे गांडुळे असले तर त्यांची विक्री देखील केली जावू शकते. इतरांना प्रोत्साहन देवून जास्तीत जास्त गांडूळ खताची निर्मिती वाढवली जावू शकते. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे
 व्हर्मीवॉश. याचा उपयोग कीड रोगांच्या नियंत्रणासाठी सेंद्रिय शेतीत केला जातो. ज्याचा उपयोग करणे अत्यंत लाभाचे आहे असे हे व्हर्मीवॉश. गांडूळ खताच्या बेड वर टाकले जाणारे पाणी झिरपून जमा होते ते असते व्हर्मीवॉश. उत्तम प्रतीच्या व्हर्मीवॉशची देखील विक्री केली जावू शकते. 
गांडूळ खताला पाण्याची गरज हि असतेच. चांगल्या प्रतीचे गांडूळखत मिळवायचे असेल तर त्यावर मुबलक प्रमाणात पाणी आवश्यक असते. म्हणून ज्या ठिकाणी गांडूळ खताच्या बेडची उभारणी करावयाची आहे अशा ठिकाणी पाण्याची सोय असावी. उत्तम प्रकारचे व दर्जेदार गांडूळ खत निर्मिती करायची असेल तर त्यासाठी पाणी हे खूप महत्वाचे आहे. गांडूळ खताच्या निर्मितीत पाण्याची भूमिका हि अनन्यसाधारण आहे.    
गांडूळखत हा चांगल्या प्रकारचा व्यवसाय होवू शकतो. कारण सर्वच गांडूळ खताची निर्मिती करू शकतील असे नसते. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी हा व्यवसाय केल्यास त्यातून अनेक प्रकारचे लाभ होण्यास वाव आहे. सेंद्रिय शेती करणे हि काळाची गरज आहे. ज्या प्रमाणे इतर खते व औषधे कृषीसेवा दुकानांमध्ये विक्रीला ठेवले जातात. त्यांचा परवाना घेतला जातो त्यानंतर त्यांची विक्री करता येते. गांडूळखत देखील विक्रीसाठी ठेवले जावू शकते. रासायनिक खते व औषधे विक्रीला प्रतिकार करा असे माझे अजिबात म्हणने नाही, कारण ते कुणाला सहज व लगेच पटणारे नाही. तसेच रासायनिक खते व औषधांची खूपच जास्त प्रमाणात सवय झाली आहे. परंतु हळू हळू का होईना आपण हे कमी करू शकतो. त्यासाठी उत्तम ठिकाण म्हणजे कृषीसेवा केंद्रे हे आहेत. शेतकरी हा कुठल्याही प्रकारच्या कीड व रोगांच्या निवारणासाठी औषधे घ्यायला म्हणून कृषीसेवा केंद्रातच जातात. त्यामुळे या ठिकाणी कृषीसेवा केंद्रे यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. या माध्यमातून अनेक प्रकारच्या सुधारणा शेतीत करू शकतो. आधुनिक शेतीक्रांती व्हावी असे वाटत असेल तर या गोष्टी करणे गरजेचे आहे.

English Translate
Role of water in vermicomposting

The role of water is very important in the production of vermicompost. It is impossible to produce vermicompost without water. The importance of earthworm manure in organic farming is uniquely general. That is why the production of vermicompost needs to be maximized. Vermicomposting can be done in different ways. There are three types of benefits. The second is to get earthworms. This is because earthworms breed and grow. If there are good quality earthworms, they can also be sold. The production of vermicompost can be maximized by encouraging others. The third thing after that is the vermiwash. It is used in organic farming for pest control. This is a vermiwash that is extremely beneficial to use. The vermicompost is the water that seeps into the vermicompost beds. The best quality vermiwash can also be sold.
Earthworm manure needs water. If you want to get good quality vermicompost, you need plenty of water on it. Therefore, water should be provided at the place where vermicompost beds are to be constructed. Water is very important for producing good quality vermicompost. The role of water in the production of vermicompost is unique.
Vermicompost can be a good type of business. Because not all earthworms can produce manure. Therefore, if those who can do this business, there is scope for many benefits. Organic farming takes time. Just like other fertilizers and medicines are sold in agricultural service shops. They can be sold after their license is obtained. Vermicompost can also be put up for sale. I am not saying to resist the sale of chemical fertilizers and drugs, because it does not suit anyone easily and immediately. Also, chemical fertilizers and medicines have become very common. But gradually we can reduce it. The best place for this is Krishiseva Kendras. Farmers go to the Krishiseva Kendra to take medicines for the treatment of any kind of pests and diseases. Therefore, the role of agricultural service centers is very important in this place. Through this we can make many kinds of improvements in agriculture. These things need to be done if we want a modern agricultural revolution.

Post a Comment

0 Comments

Close Menu