
आधुनिक शेती क्रांती होणे आवश्यक आहे परंतु ते फक्त शेतकऱ्यांनी करावे असे
नाही. आधुनिक शेतीक्रांती हा विषय फक्त शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या मुलांसाठी व शेतमजुरांसाठी आहे असे नाही. या सर्व गोष्टी सर्वांसाठी आहेत त्यातला
महत्वाचा भाग म्हणजे शेतात काम करणारे मजूर आहेत. कारण शेतीमध्ये होणाऱ्या आधुनिक
तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अनेक शेतमजुरांना काम मिळत नाही. यामुळे अनेक आर्थिक
अडचणी येताना दिसून येतात. यातून मजुरांची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर
मजुरांना चांगल्या कौशल्याने तयार केले गेले पाहिजे. त्यासाठी चांगल्या प्रकारचे
नवीन उद्योग शेतात सुरु केले जावू शकतात. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी नव्या
प्रकारे केल्या जावू शकतात. त्यामुळे मजुरांना काम मिळेल व चांगले कौशल्य त्यांनी
आत्मसात केलेले असल्यामुळे त्यांना चांगले उत्पन्न त्यातून मिळू शकते. जसे कि
गायींचा गोठा असल्यास त्या ठिकाणी दुध तर विकले जातेच, या ठिकाणी जर
कुशल कामगार तयार केले तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुधाचे वेगवेगळे
प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जावू शकतात. त्यामध्ये वेगवेगळे ताकाचे प्रकार,
दही, तूप, पेढे, खवा असे इतर भरपूर प्रक्रियायुक्त पदार्थ असतात जे छोट्या ठिकाणीही केले
जावू शकतात. हे आणि इतर अनेक गोष्टी आहेत ज्यातून योग्य श्रमशक्तीचा वापर तर होईलच
परंतु जे मजुरांचे नुकसान होते ते होणार नाही. तसेच छोट्या जागेवर चांगल्या
प्रकारची रोपवाटिका बनवली जावू शकते. त्या त्या भागात योग्य प्रकारे येणारे
रोपांची निवड करून त्यांची रोपवाटिका तयार केल्यास चांगला लाभ होईल. छोट्या गोष्टी
सुरु करण्यासाठी सरकार कडूनही योजना असतात. ज्यांची माहिती आपण खात्रीशीर करून
त्याचा चांगला लाभ घेवू शकतो. आधुनिक शेतीक्रांतीसाठी अशा आणि इतर शेतीतील संधी
ओळखून अमलात आणल्यास होणारे नुकसान टाळण्यास मदत होईल.
शेतीकडे बघताना थोडा
दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. ज्यातून तरुण पिढी देखील चांगली प्रेरणा
घेवून कुशल कामगार तयार करू शकतात. तसेच चांगल्या प्रकारचे छोटे उद्योग यातून उदयास येवू
शकतात. त्यातून सर्वांनाच लाभ होण्यास मदत होईल. तरुण पिढीसाठी यात अनेक
संशोधन व उद्योगाच्या संधी दडलेल्या आहेत. नवीन
तंत्रज्ञानाचा वापर होत असताना असे दिसून येते जेथे जास्त मजूर लागतात तेथे काही
ठिकाणी कमी मजुरांत काम होवू लागले आहे. तसेच काही ठिकाणी तर मजुरांची आवश्यकताच
उरलेली नाही. यामुळे मजुरांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले दिसते आणि हा मजूर
वर्ग सुखी असणे व त्यांचा उदरनिर्वाह चांगला व्हावा, हि आपली
सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी आपण वेळीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. कालांतराने
शेतमजुरांचे काम जाने व त्यांचे होणारे नुकसान हा मोठा विषय बनू शकतो परंतु नवीन
गोष्टी राबवून त्यात संधी निर्माण केल्या जावू शकतात. कारण आधुनिक शेतीक्रांती
व्हायची असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तर झालाच पाहिजे, परंतु ते कामे करणाऱ्या मजुरांचे जे काम जाते त्यांना दुसरे कुशल काम
मिळणे गरजेचे आहे. या दोघेही गोष्टींचे संतुलन राहणे गरजेचे आहे. नाहीतर मोठ्या
समस्या निर्माण होवू शकतात. शेती क्षेत्रात अभ्यासक दृष्टीकोन ठेवून शेती करताना
आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य तो वापर केला जावू शकतो, त्यामुळे
ज्यांचे काम जाते त्यांना दुसरे चांगले काम मिळेल. यातून योग्य पद्धतीने
श्रमशक्तीचा वापर केला जावू शकतो व मजूर आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्यात योग्य तो
समतोल राखला जावू शकतो. आधुनिक शेतीक्रांतीमध्ये तरुण, शेतकरी
आणि मजूर हे क्रांतीचा कणा आहेत. यांनी ठरवले तर लवकरच आधुनिक शेतीक्रांती घडून
येवू शकते आणि शेतीकडेही इतर क्षेत्रांप्रमाणे एक संधी म्हणून पाहिले जावू शकते.
ज्यातून भरपूर प्रकारच्या संधींचा उगम होवू शकतो. शेती हे आपले मूळ आहे आणि
त्याकडे दुर्लक्ष करून आता चालणार नाही. त्याकडे योग्य व अभ्यासक पद्धतीने लक्ष हे
दिले गेलेच पाहिजे हि तुम्हा आम्हा सर्वांचीच गरज आणि जबाबदारीही आहे.
English Translate
The need for a modern agricultural revolution
There must be a modern agricultural revolution but it is not just for the farmers. The subject of modern agricultural revolution is not just for farmers or farmers' children and agricultural laborers. All of these things are for everyone, the most important part of which is the farm laborers. Because of the use of modern technology in agriculture, many agricultural laborers do not get jobs. This leads to many financial difficulties. If this is to improve the economic condition of the workers, then the workers should be trained with good skills. For this, good new industries can be started in the field. Different kinds of things can be done in new ways. As a result, the workers will get jobs and they will get good income from it as they have acquired good skills. For example, if there is a herd of cows, the milk is sold at that place. It contains different types of taka, curd, ghee, pede, khova and many other processed foods that can be made even in small places. There are these and many other things that will use the right manpower but will not hurt the workers. Also a good kind of nursery can be made in a small space. It will be beneficial to create a nursery by selecting the right seedlings for that area. There are also plans from the government to start small things. We can make the most of it by making sure of the information. Identifying and implementing such and other agricultural opportunities for the modern agricultural revolution will help to avoid losses.
There is a need to change the approach to agriculture. From which even the younger generation can take good inspiration and create skilled workers. It can also lead to good small businesses. It will help everyone to benefit. It has many research and industry opportunities for the younger generation. As new technologies are used, it is seen that in some places where more labor is required, less labor is required. Also, in some places, there is no need for labor. It seems that the workers have suffered a lot and it is the responsibility of all of us to make the working class happy and have a good livelihood. You just have to be more discriminating with the help you render toward other people. Over time, the loss of agricultural labor and their losses can be a major issue, but new things can be done to create opportunities. Because if there is to be a modern agricultural revolution, modern technology must be used, but the workers who do that work need to get another skilled job. Both of these things need to be balanced. Otherwise big problems can arise. Modern technology can be used properly while farming with a pragmatic approach in the field of agriculture, so those who go to work will get another good job. This allows for the proper use of labor and the right balance between labor and modern technology. In the modern agricultural revolution, youth, farmers and laborers are the backbone of the revolution. If he decides, a modern agricultural revolution can take place soon and agriculture can be seen as an opportunity like other sectors. Which can lead to a wide variety of opportunities. Agriculture is our origin and it will not be ignored. It must be addressed in a proper and pragmatic manner. This is the need and responsibility of all of us.
0 Comments