हिरवळीची खते


जमिनीची सुपीकता चांगली राहावी व ती वाढावी यासाठी चांगला उपाय म्हणजे हिरवळीच्या खतांचा वापर करणे. हिरवळीचे खत म्हणजे नेमके काय ते जाणून घेवूया... हिरवी वनस्पती अथवा पाने
, कोवळ्या फांद्या इत्यादी जमिनीत गाडले जातात, ज्यांचा उपयोग जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी होतो या प्रकाराला हिरवळीचे खत असे म्हणतात. या खतांच्या वापरामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीची सुपीकता वाढते, जमिनीतील पाण्याचा निचरा चांगला होण्यास मदत होते. सोबतच हिरवळीच्या खतांमुळे जमिनीची घडण दिवसेंदिवस सुधारताना दिसते. हिरवळीच्या खतांमुळे जमिनीतून होणारा मूलद्रव्यांचा निचरा कमी प्रमाणात होतो. हिरवळीच्या खतांमुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीतील आवश्यक जीवाणूंच्या संख्येत वाढ होते. हिरवळीच्या खतांमुळे जमिनीत नत्राचे प्रमाण वाढून मोठ्या प्रमाणात नत्राचे स्थिरीकरण होते. जमिनीतील स्फुरद, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह इत्यादी मुलद्रव्यांची उपलब्धता देखील वाढताना दिसून येते. या सर्वांचा उपयोग पिकांच्या चांगल्या वाढीवर व उत्पादनावर होतो. कारण पिकांना जमिनीतून आवश्यक त्या अन्नद्रव्यांचा पुरवठा हिरवळीच्या खतांमुळे होतो. हिरवळीचे खत दोन प्रकारे उपयोगात आणले जाते एक म्हणजे हिरवी पाने, फांद्या जमिनीत गाडणे. उदा. गिरीपुष्प, सुबाभूळ इत्यादी वनस्पती बांधावर वाढविल्या जातात व आवश्यक त्या पद्धतीने फांद्या कापून जमिनीत पुरल्या जातात. दुसरे म्हणजे शेतात जागेवरच हिरवळीचे खत करणे. उदा. ताग, धैंचा, चवळी इत्यादी पिके शेतात पिकवून त्यांची योग्य तेवडी वाढ करून नंतर ते पूर्णपणे जमिनीत गाडले जाते.
हिरवळीच्या पिकांची निवड करत असताना अभ्यासक दृष्टिकोन महत्वाचा आहे. हिरवळीच्या खतांसाठी जमिनीत लागवड करत असलेले पिक हे द्विदल वर्गीय असावे. त्याच्या मुळांवर जास्त प्रमाणत गाठी असतील अशा पिकाची हिरवळीच्या खतासाठी निवड करावी. मुळांवरच्या गाठी या जमिनीत अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडत असतात. जे पिक निवडणार आहेत त्याची मुळांची वाढ हि जास्त होत असणारे निवडावे. तसेच पिकाची निवड करताना त्यात जास्त प्रमाणात नत्राचे प्रमाण असेल याची खात्री असावी. त्या पिकाचे ओलाव्याचे प्रमाणही चांगले असावे सोबतच त्या पिकाला भरपूर पालवी येईल असे पिक निवडावे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्या पिकाची पाण्याची गरज कमी असेल असे पिक निवडावे. ज्यामुळे कुठल्याही प्रकारचा हिरवळीच्या खतांचा ताण इतर गोष्टींवर पडणार नाही. हिरवळीचे पिक निवडताना अशा प्रकारच्या पिकाची निवड करावी जे किडी व रोगास प्रतिकारक असेल. यासाठी योग्य हंगाम बघूनच आवश्यक त्या पिकाची निवड करावी. जेणेकरून कीड व रोगांचा त्यावर प्रादुर्भाव टाळता येईल. हिरवळीच्या खतासाठी निवडत असलेले पिक हे लवकर कुजणारे असावे. लवकर कुजणारे असले तर त्याचे परिणामही लवकर बघावयास मिळतात.
तरुण पिढीने व शेतकऱ्यांनी हिरवळीचे खत याकडे फक्त खत म्हणून न बघता, एक संधी म्हणून बघितले तर त्याचा खूप मोठा परिणाम आधुनिक शेतीक्रांतीच्या दिशेने झालेला दिसेल. हिरवळीच्या खतांच्या वापराने अनेक गोष्टी साध्य करता येतात. हिरवळीचे खत हे उत्तम खत आहे सोबतच ते बनविण्यासाठी कमी पाणी असेल व कोरडवाहू जमीन असेल तरी चालते. त्यासाठी थोडा अभ्यासक पद्धतीने हंगाम बघून पिकांची निवड केली तसेच फुलोरा येण्यापूर्वी पिकाची कापणी करणे. असे काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवलेत आणि त्यांचा अवलंब केला तर हिरवळीचे खत चांगल्या प्रकारे शेतात घेतले जावू शकते. गिरीपुष्प, सुबाभूळ इत्यादी प्रकारची झाडे देखील शेताच्या बांधावर लागवड केल्यास त्यांचा हिरवळीचे खत म्हणून चांगला उपयोग होण्यास मदत होते. त्यांचा पाला आणून जमिनीत गाडला जातो त्याने देखील चांगला फायदा होण्यास मदत होते. पिक लागवडीपूर्वी हिरवळीचे खते जमिनीत गाड्ल्याने कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खताची आवश्यकता लागणार नाही. इतका उपयोग हिरवळीच्या खतांचा जमिनीला व पिकांना होतो. हिरवळीच्या खतांच्या वापरामुळे पिकांमध्ये कुठल्याही प्रकारच्या विषाणूंचा अवशेष जाणार नाही, विषाणू रहित पिकाचे उत्पादन मिळण्यास मदत होईल. रासायनिक खतांमुळे जमिनी नापीक होतात तरीही त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, का तर त्याचा फायदा लगेच दिसू लागतो परंतु हे सगळे थोड्या काळासाठी असते. दूरगामी याचा मोठा वाईट दुष्परीनाम जमिनीवर सोबतच हवामानावर, पिकांवर परिणामी उत्पादनावर  होत असतो हे आता डोळसपणे बघितले पाहिजे.

English Translate 
Green manure

The best way to maintain and increase soil fertility is to use green manure. Let's find out exactly what is green manure ... Green plants or leaves, twigs, etc. are buried in the soil, which is used to increase the fertility of the soil. This type is called green manure. The use of these fertilizers increases the water holding capacity of the soil. Improves soil texture, increases soil fertility, improves soil drainage. At the same time, due to green manure, soil texture is improving day by day. Green manure reduces the drainage of nutrients from the soil. Green manure increases the amount of organic matter in the soil. This increases the number of essential bacteria in the soil. Green manure increases the amount of nitrogen in the soil and stabilizes a large amount of nitrogen. The availability of elements like phosphorus, calcium, potassium, magnesium, iron etc. in the soil is also increasing. All these are used for good growth and production of crops. This is because green manures provide the nutrients that crops need from the soil. Green manure is applied in two ways, one is by burying green leaves and branches in the soil. E.g. Plants like Giripushpa, Subabhul etc. are grown on the dam and the branches are cut and buried in the ground as required. The second is to apply green manure on the field. E.g. Crops like hemp, dhaincha, chawli etc. are grown in the field and their proper size is increased and then they are completely buried in the soil.
A pragmatic approach is important when choosing green crops. Crops planted in the soil for green manure should be dicotyledonous. Crops with high number of nodules on its roots should be selected for green manure. Root knots play a very important role in this soil. The crops that are to be selected should be selected with high root growth. Also, when choosing a crop, make sure that it is high in nitrogen. The moisture content of the crop should be good and the crop should be selected in such a way that it can grow well. The most important thing is to choose a crop that needs less water. So that the stress of any kind of green manure will not fall on other things. When choosing a green crop, choose a crop that is resistant to pests and diseases. The crop should be selected according to the right season. So that pests and diseases can be prevented. The crop you choose for green manure should be an early decomposer. If it decomposes quickly, its effects can be seen early.
If the younger generation and farmers see green manure as an opportunity, not just as a fertilizer, it will have a huge impact on the modern agricultural revolution. Many things can be achieved with the use of green manure. Green manure is the best fertilizer and works well with less water and dry land. For this, the crop was selected by looking at the season with a little study method and also harvesting the crop before flowering. If some important points are kept in mind and followed, then green manure can be better applied in the field. Plants like Giripushpa, Subabhul etc. are also planted on the bunds of the field which helps them to be used as green manure. Bringing their leaves and burying them in the ground also helps in making good profit. No chemical fertilizer is required as the green manure is buried in the soil before planting. So much green manure is applied to the soil and crops. The use of green manure will not leave any residue of toxins in the crop, will help in getting a crop free of the virus. Although chemical fertilizers make the land barren, they are widely used, but the benefits are obvious, but only for a short time. It should be noted now that the long-term bad effects of this are on the soil as well as on the weather, on the crop and on the resulting product.

Green manure Video :-

Post a Comment

0 Comments

Close Menu