फळबागा लागवडीच्या संधी


फळबागांच्या लागवडीत अनेक प्रकारच्या संधी दडलेल्या आहेत. त्याकडे आपण डोळसपणे व अभ्यासक दृष्टीकोनातून बघणे अत्यंत आवश्यक आहे. फळबागा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही फळबागा पाणी असलेल्या क्षेत्रात चांगल्या होतात
, त्यांना पाणी जास्त प्रमाणात लागते. तर काही फळबागा कमी व तुरळक पाणी असेल तरी चांगले उत्पादन देतात. याचप्रमाणे काही फळबागांना चांगली व भारी उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन मानवते, तर काही फळबागा मध्यम व हलक्या प्रतीच्या जमिनीत देखील चांगल्या येतात.
या सर्व गोष्टी होत असताना फळबागा लागवडीमुळे काय संधी उपलब्ध होवू शकतात याकडे बघणे आवश्यक आहे. फळबागा लागवड केल्या नंतर त्यात महत्वाची व चांगली बाब म्हणजे वेगवेगळे आंतरपीक घेता येतात. एकाच वेळी हंगामी उत्पादन तर फळबागांपासून मिळणारच असते. सोबत नगदी उत्पादन देखील मिळण्यास मदत होते. या सर्व गोष्टी वातावरण, जमीन, पाणी व्यवस्थापन इत्यादी बाबींवर ठरत असतात. कोणत्या जमिनीत कोणती फळबाग लावलेली आहे. त्या ठिकाणी कोणते आंतरपीक घेणे उचित ठरेल या सर्व गोष्टींचा अभ्यास करून पिकांची लागवड केली पाहिजे. ज्यामुळे शेतकरी अनेक प्रकरचे लाभ यातून साध्य करू शकतात. 
या बरोबरच फळबागा आल्या म्हणजे त्या फळांपासून अनेक प्रकरचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. या गोष्टी देखील लक्षात घेणे तितकेच महत्वाचे आहे. जमीन चांगली नसेल कुठले चांगले उत्पादन येत नसेल अशा ठिकाणी देखील विविध फळबागा घेतल्या जावू शकतात. उत्पादन निघाल्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी त्यांची विक्री केली जावू शकते. काही ठिकाणी विक्री हि फळे म्हणून केली जावू शकते, काही ठिकाणी फक्त प्रक्रिया उद्योगाला उत्पादनाची विक्री केली जावू शकते. अशा एक नाही तर अनेक गोष्टी आहेत ज्यातून फळबागा लागवड हि पुढे येवू शकते. 
फळबागांच्या लागवडीतील संधी बघितल्यात तर अनेक गोष्टी लक्षात येतील. फळझाडे हि वर्षानुवर्ष फळे देत राहतात. सुरुवातीचे काही काळ लक्ष दिले तर नंतर खूप त्यात वेळ द्यावा लागत नाही. सुयोग्य नियोजन केल्यास सुरळीत व चांगले कामे होतात. तसेच उत्पादनात देखील त्याचे चांगले अनुभव बघावयास मिळतात.

English Translate
Opportunities for orchard cultivation

There are many opportunities hidden in orchard cultivation. It is very important that we look at it carefully and from a practical point of view. There are different types of orchards. Some orchards thrive in areas with water, they require more water. Some orchards produce good yields even though they have less and less water. Similarly, some orchards are well drained and well drained, while some orchards thrive in medium and light soils.
While all of this is happening, it is important to look at the opportunities that orchards may bring. An important and good thing after planting orchards is that different intercrops can be taken. At the same time seasonal produce is to be obtained from orchards. It also helps in getting cash product. All this depends on the environment, land, water management, etc. Which orchard is planted in which land. Crops should be planted by studying all the intercrops that would be suitable in that place. So that farmers can reap many benefits from this.
Along with this came orchards which means that many kinds of processed foods are made from those fruits. These things are equally important to note. Various orchards can be grown even in places where the soil is not good and no good produce is coming. They can be sold for a variety of reasons once the product is released. In some places the fruit can be sold, in some places the product can only be sold to the processing industry. There are many things that can help a horticulture plant.
If you look at the opportunities in orchard cultivation, many things will come to mind. Fruit trees bear fruit year after year. If you pay attention for a while, then you don't have to spend much time on it. Properly covered, it will withstand a great deal of adverse conditions. You can also see his good experience in production.

Post a Comment

0 Comments

Close Menu