कृषीसेवा केंद्राकडून आधुनिक कृषीसेवा केंद्राकडे वाटचाल....


कृषीसेवा केंद्राची उभारणी करताना अनेक गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते. त्यामध्ये जागेची निवड अत्यंत महत्वाचा भाग आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा वावर असेल किंवा त्यांना येणे जाने सोयीचे असेल अशी जागा निवडणे आवश्यक आहे. कृषीसेवा केंद्राची उभारणी करताना त्याचा परवाना काढणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यामध्ये कोणत्या प्रकारचे खते व औषधांची विक्री होणार आहे
, त्यानुसार वेगवेगळे परवाने काढले जातात. यासाठी कृषी सेवा केंद्रे हे उभारण्या बरोबरच त्यांचे परवानेही काढणे तेवढेच महत्वाचे असते. सध्या स्थितीत असे दिसून येते कि, अनेक प्रकारची कृषीसेवा केंद्रे असतात परंतु त्या ठिकाणी पाहिजे तशी शेती विषयक माहिती नसते. अशा वेळी त्या कृषीसेवा केंद्रांमधून खता-औषधांची विक्री तर होते परंतु शेतकऱ्यांना पाहिजे तो सल्ला या ठिकाणाहून मिळत नाही. यासाठी प्रत्येक कृषीसेवा केंद्रावर एक कृषी सल्लागार असणे आवश्यक आहे. कारण शेतकऱ्यांना आवश्यक असलेले खत व औषधे पुरविणे आवश्यक आहे, सोबतच त्या खता-औषधांची माहितीही देणे आवश्यक आहे. यासाठी कृषीसेवा केंद्र धारकांनी फक्त रासायनिक खते, औषधे विक्रीला न ठेवता सेंद्रिय खते औषधे ठेवणेही अगत्याचे आहे. या सर्व गोष्ठी असतील तरच योग्य तो शेती विषयक सल्ला दिला जावू शकतो. फक्त रासायनिक खतांची विक्री करणे हे कृषीसेवा केंद्रांचे काम नाही. तर योग्य तो सल्ला देखील शेतकरी मागतात तेव्हा देणे आवश्यक आहे. कशामुळे काय होवू शकते या वास्तवाची जाणीव करून देणे आपली नैतिक जबाबदारी आहे हे विसरता कामा नये. शेतकऱ्यांना योग्य तो सल्ला देवून त्यांचे पीकही वाचेल व जमिनीची घडण चांगली राहील, उत्पादनातही चागंली वाढ होईल. वातावरणाचाही समतोल राखला जाईल इत्यादी सर्वांगाने योग्य ते सेंद्रिय खता व औषधांकडे शेकऱ्यांची रुची वाढवण्याचे काम या माध्यमातून होवू शकते. 
सध्या सगळीकडेच बघितल्या नंतर या गोष्टी प्रकर्षाने जाणवतील कि, किती गरज आहे या सर्वाची. जर आपल्याला वाटत असेल शेतकरी सुखी व संपन्न व्हावा तर या बदलासाठी आधुनिक शेतीक्रांतीच्या दिशेने पुढे जात असताना, आधुनिक कृषीसेवा केंद्रे उभी राहणे काळाची गरज बनली आहे. कारण यामधून अनेक मोठे व क्रांतिकारी बदल घडविले जावू शकतात. याकडे जास्तीत जास्त तरुण वर्गाने संधी म्हणून बघणे म्हणजे एक प्रकारे दुग्ध शर्करा योग होवू शकतो. कारण यामधून एक उत्तम व्यवसाय तर मिळूच शकतो, सोबतच एक चांगल्या कामात योगदान देखील दिले जावू शकते. 
मान्य आहे कि सेंद्रिय शेती करा असे सांगितल्यावर कुणीही ते पटकन करायला तयार होत नाही. सेंद्रिय शेती तर आपल्या देशात झालीच पाहिजे तीही सिक्कीम या राज्यात आहे शंभर टक्के सेंद्रिय शेती त्या प्रमाणे आपल्या पूर्ण देशात झाली पाहिजे शंभर टक्के सेंद्रिय शेती. असे म्हटले तरी ते कुणाला मान्य करवत नाही, परंतु हे झालेच पाहिजे हा तुम्हा आम्हा सर्वांचा ठाम निर्धार झाला तर हे सर्व काही होणे शक्य आहे. जरी सेंद्रिय शेती सध्या कुणी पूर्णपणे करत नसले तरी आधुनिक कृषीसेवा केंद्रांच्या माध्यमातून या गोष्टीत अमुलाग्र बदल घडविला जावू शकतो. पूर्णपणे रासायनिक खतांची व औषधांची विक्री न करता हळू हळू का होईना पण सेंद्रिय खते व औषधांची विक्री करणे सुरु केले पाहिजे व त्यांचे महत्व पटवून दिले पाहिजे. सेंद्रिय शेती करणे काळाची गरज का आहे? याचे महत्व सर्वांगाने सर्वांना समजणे महत्वाचे आहे. सध्याच्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांची सवय झाली आहे. असा बदल होणे गरजेचे आहे कि सेंद्रिय खतांची सवय झाली पाहिजे.
सेंद्रिय खतांच्या वापराने नापीक होणाऱ्या जमिनी सुधारता येतील. पर्यावरणाला होणारा त्रास कमी करता येईल. रासायनिक गोष्टींच्या वापरामुळे जे आजार मनुष्यास होत आहेत ते सेंद्रिय गोष्टींच्या वापराणे थांबतील. सर्वांना सात्विक आहार मिळाल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. आरोग्य चांगले राहिले तर शरीरात प्रतिकारशक्ती चांगली राहते. आपल्या देशातील व्यक्तींना चांगले व निरोगी आयुष्य यामुळे लाभू शकते. या सर्व काही गोष्टी आपल्या मुळावरच अवलंबून आहेत आणि आपले मुळ आहे शेती व शेतीतील चांगले उत्पादन. हे सुधारण्यासाठी आधुनिक पद्धतीने कृषीसेवा केंद्रांची मांडणी व त्यामध्ये एक सल्लागार असलाच पाहिजे.

English Translate
On the way from Krishiseva Kendra to Modern Krishiseva Kendra

There are several things to keep in mind while setting up an agricultural service center. The choice of space is a very important part of it. It is important to choose a place where the farmers are comfortable or where they can come and go. It is necessary to issue a license while setting up an agricultural service center. For this, different licenses are issued according to the type of fertilizers and medicines to be sold in it. For this, along with setting up agricultural service centers, it is equally important to get their licenses issued. At present, it is seen that there are many types of agricultural service centers but they do not have the required agricultural information. At such times, fertilizers and medicines are sold from those agricultural service centers, but the farmers do not get the advice they need from this place. For this, there should be an agricultural consultant at each agricultural service center. This is because farmers need to be provided with the required fertilizers and medicines, as well as information on those fertilizers and medicines. For this, it is important for the Krishiseva Kendra holders to keep not only chemical fertilizers and medicines but also organic fertilizers. Only when all these things are in place can proper agricultural advice be given. It is not the job of agricultural service centers to sell only chemical fertilizers. So the right advice should also be given when farmers ask. We must not forget that it is our moral responsibility to make people aware of what can happen. By giving proper advice to the farmers, their crops will be saved and the soil structure will be good and the production will also increase. The balance of the environment will be maintained, etc. The work can be done to increase the interest of the farmers towards organic fertilizers and medicines.
After looking everywhere now, these things will make you realize how much you need. If we want farmers to be happy and prosperous, then for this change, while moving towards modern agricultural revolution, it has become a need of the hour to set up modern agricultural service centers. Because it can bring about many big and revolutionary changes. Seeing this as an opportunity for as many young people as possible can in a way be milk sugar yoga. Because it can be a great business, but also a contribution to a good work.
Admittedly, no one is willing to do organic farming when they are told to do it. Organic farming should be done in our country. Sikkim is also in the state. One hundred percent organic farming should be done in our country. One hundred percent organic farming should be done in our country. That being said, it does not make anyone agree, but it is possible for all of us to do this if we all have a firm determination that it should happen. Even though no one is currently fully engaged in organic farming, this can be radically changed through modern agro-service centers. The sale of organic fertilizers and medicines should be started gradually and their importance should be emphasized without completely selling chemical fertilizers and medicines. Why does organic farming take time? It is important for everyone to understand the importance of this. In the present situation a large number of chemical fertilizers have become accustomed. There is a need to change the habit of organic fertilizers.
The use of organic fertilizers can improve barren lands. Environmental damage can be reduced. Diseases caused by the use of chemicals will stop the use of organic things. Getting proper nutrition through your diet does not have to be complicated. When health is good, the body's immune system stays strong. It can lead to a better and healthier life for the people of our country. All these things depend on our roots and our roots are agriculture and good agricultural production. In order to improve this, there should be a modern system of agricultural service centers and a consultant.

Post a Comment

0 Comments

Close Menu