रोपवाटिकेत मातृवृक्षाचे महत्व


मातृवृक्ष हा रोपवाटिकेचा आत्मा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण रोपवाटिकेत मातृवृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. रोपवाटिकेत कलमे, रोपे यांची निपज करण्यासाठी मातृवृक्षांची आवश्यकता असते. रोपवाटिका परवाना काढण्यापासून, बाकी सगळ्याच ठिकाणी रोपवाटिका धारकांना मातृवृक्षाची माहिती असणे महत्वाचे असते. मातृवृक्ष दोन प्रकारचे असतात एक म्हणजे खुंटाचा मातृवृक्ष आणि दुसरा म्हणजे सायन (कलम काडी) मातृवृक्ष. दोघेही प्रकारचे मातृवृक्ष रोपवाटिकेत महत्वाचे आहेत. परवाना काढण्याच्या वेळी देखील मातृवृक्षाची माहिती द्यावी लागते. म्हणजे कोणत्या जातीचे व कोणत्या प्रकारचे मातृवृक्ष रोपवाटिकेत असणार आहेत. मातृवृक्ष किती व कसे असणार आहेत इत्यादी सर्व बाबी माहिती असणे आवश्यक असते.
मातृवृक्षाची निवड करताना काही आवश्यक बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये मातृवृक्षाबद्दल पूर्णपणे माहिती रोपवाटिका धारकांना असावी. मातृवृक्षाचा इतिहास माहिती असणे आवश्यक आहे. मातृवृक्ष हे जातिवंत असावेत, त्यामुळे मातृवृक्षात जसे गुण असतील तसेच गुण त्या पासून निर्माण होणाऱ्या पुढच्या पिढीत उतरण्यास मदत होईल. मातृवृक्ष निरोगी असावेत त्यांना कुठल्याही रोगाची लागण झालेली नसावी अशा मातृवृक्षाची निवड करावी. मातृवृक्षाची निगा राखणे सहज व सोपे असावे. सर्वात महत्वाचे म्हणजे मातृवृक्षाची उपलब्धता हि सहज व लवकर होणारी असावी. वेळेवर मातृवृक्ष मिळणे सहज सोपे झाले पाहिजे असे मातृवृक्ष निवडावेत.
फळझाडांमध्ये व फुलझाडांमध्ये शाखीय व अशाखीय अभिवृद्धी केली जाते. त्यामध्ये शाखीय अभिवृद्धी करताना मातृवृक्षाचे अनन्यसाधारण महत्व आहे. यामध्ये मातृवृक्ष जर चांगले वाढणारे व उत्पादन देणारे असेल, तर अभिवृद्धी करताना त्यांच्या अवयवांचा उपयोग केल्यास नवीन येणारे झाड हे जोमदार वाढणारे व चांगले उत्पादन देणारे असेल. अशा पद्धतीने शाखीय अभिवृद्धी केली जाते. काही फळझाडांसाठी व फुलझाडांसाठी खुंटाचा वापर महत्वाचा असतो.

फळझाडे व त्यांचे खुंट खलील प्रमाणे :-
1. संत्रा – रंगपूर लाईम, जंबेरी
2. मोसंबी – रंगपूर लाईम, जंबेरी
3. कागदी लिंबू – जंबेरी
4. आवळा – बनारसी किंवा स्थानिक
5. द्राक्षे – डॉगरीज, रामसे इत्यादी.
6. चिकू – खिरणी
7. आंबा – रायवळ, विलायकोलंबन, आंबेलावी इत्यादी
8. संकरित सीताफळ – रामफळ
9. जांभूळ (निवडक) – जांभूळ स्थानिक
10. बोर – उमराण, गावठी बोर

फुलझाडे व त्यांचे मातृवृक्ष खालील प्रमाणे :-
1. पिवळा चाफा – स्थानिक सोनचाफा
2. गुलाब – ब्रायर, एडवर्ड इत्यादी
3. हवाई जास्वंद – स्थानिक जास्वंद

अनेक प्रकारच्या फळझाडांची कलमे फाटे कलम, गुटी कलम, दाब कलम या पद्धतीने सायन मातृवृक्षवारच केली जातात. त्यासाठी खुंटाची आवश्यकता नसते उदा. डाळिंब, पेरू, केळी, लीची, द्राक्षाच्या काही जाती इत्यादी फळझाडांसाठी सायन मातृवृक्षाची आवश्यकता असते. कुठलेही झाड मातृवृक्ष म्हणून न वापरता निवडक झाडे हे मातृवृक्ष म्हणून वेगळेच ठेवावेत व त्यांची योग्य ती काळजी घ्यावी. तसेच काही फुलझाडांची अभिवृद्धी फाटे कलमापासून, गुटीकलमापासून, मुनव्यापासून केली जाते. उदा. कण्हेर, जाई-जुई, मोगरा, शेवंती, जरबेरा, लिली, कार्नेशन इत्यादी. या बरोबरच काही फुलझाडांची अभिवृद्धी बियांपासून केली जाते उदा. झेंडू, झिनिया इत्यादी.
रोपवाटिकेत मातृवृक्ष असल्याचे अनेक फायदे असतात ते म्हणजे वेळच्या वेळी कामे करणे सोपे होते. या बरोबरच अनेक गोष्टी आहेत ज्या हे सर्व करत असताना लक्षात घेणे आवश्यक आहेत. ते म्हणजे कुशल कामगार रोपवाटिकेसाठी महत्वाचे असतात. त्यामध्ये रोपांच्या लागवडीसाठी तसेच कलमे तयार करण्यासाठी, रोपांची व इतर गोष्टींची वाहतूक करण्यासाठी. अशा प्रकारे मजुरांची देखील वर्गवारी करावी लागते. त्यामध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रोपवाटिकेत कामे असतात त्या वेळी जास्त कामगारांची आवश्यकता असते. परंतु नंतर काही काळ जास्त कामगारांची आवश्यकता नसते कारण रोपे तयार असतात. त्यांच्याकडे फक्त लक्ष ठेवायचे असते व पाणी, खते देणे या गोष्टी असतात त्या कालावधीत कमी कामगार लागतात. अशा रीतीने कामगारांचीही सोय बघणे आवश्यक असते. मातृवृक्षांचे संघोपण चांगले व्हावे व रोपवाटिका चांगली रहावी यासाठी कुशल कामगार तयार करणे हि देखील महत्वाची कामगिरी आहे. रोपवाटिका हा व्यवसाय शेतकरी व तरुण पिढीने व्यवस्थित रित्या समजून व अभ्यासक दृष्टीकोन ठेवून केला तर त्यात चांगले यश मिळण्यास मदत होईल. आधुनिक व पारंपारिक गोष्टींचा मेळ साधला तर आधुनिक शेतीक्रांतीच्या रुपात शेतीमध्ये उत्तम बदल घडतील. शेतीकडे एक संधीचे क्षेत्र म्हणून बघितले जाईल. पुढच्या पिढीला देखील शेती या विषयाची ओढ निर्माण होईल व त्यातल्या गोष्टींची माहिती होईल. या सर्व गोष्टी झाल्यात तर आपला देश देखील सुखी व संपन्न होईल. कारण सर्व धुरा हि शेतीवरच आहे, आपली देशाची आर्थिक स्थिती देखील शेतीवरच अवलंबून आहे. ज्या वेळी शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन एक संधी व अभ्यासक असा होईल त्या वेळी शेतीत आधुनिक शेतीक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही.

English Translate 
Importance Of Mother Tree In Nursery

It doesn't matter if the mother tree is the soul of the nursery. Because the mother tree is of paramount importance in the nursery. Nurseries require mother trees to produce cuttings and seedlings. From issuing nursery licenses, it is important for nursery holders to be aware of the mother tree everywhere else. There are two types of mother tree, one is the mother tree of Khunta and the other is the mother tree of Sion (Kalam Kadi). Both types of mother trees are important in the nursery. The mother tree also needs to be informed at the time of issuing the license. That is, what species and what kind of mother tree will be in the nursery. It is necessary to know all the details about how many and how the mother trees will be.
There are a few things to keep in mind when choosing a mother tree. It should have complete information about the mother tree to the nursery holders. Must know the history of the mother tree. The mother tree should be a genus, so the mother tree will have the same qualities as the mother tree will help to pass on to the next generation. Mother trees should be healthy and they should not be infected with any disease. The mother tree should be easy to care for. Most importantly, the availability of mother tree should be easy and quick. It should be easy to get mother tree on time.
Branch and non-branch growth is done in fruit trees and flower trees. In it, the mother tree has a unique importance in branching growth. In this, if the mother tree is good growing and productive, then if their organs are used for growth, the new tree will be vigorously growing and giving good yield. This is how branching is done. The use of poles is important for some fruit trees and flowers.

Fruit trees and their trunks are as follows: -
1. Orange - Rangpur Lime, Jamberry
2. Mosambi - Rangpur Lime, Jamberry
3. Paper Lemon - Jamberry
4. Amla - Banarasi or local
5. Grapes - Dogris, Ramsey etc.
6. Chiku - Khirni
7. Mango - Raiwal, Vilaykolomban, Ambelavi etc.
8. Hybrid Custard apple - Ramphal
9. Purple (selective) - Purple local
10. Bore - Umran, village bore

Flowers and their mother trees are as follows: -
1. Yellow Chafa - Local Sonchafa
2. Roses - Briar, Edward, etc.
3. Hawaiian Jaswant - Local Jaswant

The cuttings of many types of fruit trees are cut by split cuttings, guti cuttings and pressure cuttings. It does not require a peg e.g. Sion mother tree is required for fruit trees like pomegranate, guava, banana, lychee, some varieties of grapes etc. Instead of using any tree as a mother tree, selected trees should be kept as a mother tree and they should be taken care of properly. Also some flowers are propagated from fork cuttings, gutikalma cuttings, munavas. E.g. Kanher, Jai-Jui, Mogra, Shevanti, Gerbera, Lily, Carnation etc. Along with this some flowers are grown from seeds e.g. Marigold, Xenia etc.
The many advantages of having a mother tree in a nursery are that it makes it easier to do things on time. Along with this there are many things that need to be kept in mind while doing all this. They are skilled workers are important for the nursery. It includes for planting seedlings as well as for making cuttings, transporting seedlings and other things. Thus the laborers also have to be classified. It has a large number of nursery works during the rainy season and requires more workers at that time. But then some time does not require much labor as the seedlings are ready. All they have to do is keep an eye on it and have less water and fertilizer. In this way, it is necessary to take care of the workers as well. It is also important to create skilled workers for better nurturing of mother trees and better nursery. If the nursery business is done by the farmers and the younger generation with a proper understanding and a pragmatic approach, it will help in achieving better success. If modern and traditional things are combined, great changes will take place in agriculture in the form of modern agricultural revolution. Agriculture will be seen as an area of ​​opportunity. The next generation will also be attracted to the subject of agriculture and will be aware of its contents. If all these things happen, our country will also be happy and prosperous. Because all the focus is on agriculture, the economic condition of our country also depends on agriculture. At a time when the approach to agriculture will be one of opportunity and practice, agriculture will not survive without a modern agricultural revolution.

Post a Comment

0 Comments

Close Menu