शेती उत्पादन वाढीसाठी वापरली जाणारी कीटकनाशक, खते तणनाशकाचे दुष्परिणाम...


शेती उत्पादन वाढीसाठी कीटकनाशक, खते, तणनाशक वापरले जातात. त्यांचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम दिसून येतात. या सर्व गोष्टी आधी एवढ्या मोठ्या प्रमाणात जाणवत नसे परंतु सध्या सर्वांनाच मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. खरे म्हणायचे तर दुष्परिणाम होत आहे हि गोष्ट जाणवणे चांगली बाब आहे. कीटकनाशक, खते, तणनाशक यांच्या वापरामुळे शेतीवर, जमिनीवर परिणामी मिळणाऱ्या उत्पादनावर चुकीचा दुष्परिणाम होत आहे. त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे रासायनिक कीटकनाशक, खते, तणनाशक यांचा होणारा भरमसाठ वापर.  
कीटकनाशकाचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम दिसून येतात. सध्या शेतात पिकांवर येणाऱ्या रोग आणि कीटकांच्या नाशासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जातो. ज्यामुळे लवकर कीड व रोगांचा नाश तर होतो, परंतु त्यामुळे रासायनिक कीटकनाशकाचे अंश पिकांवर, जमिनीवर सोबतच वातावरणात राहतात हे अति प्रमाणात दुष्परिणाम कारक आहे. त्यामध्ये उत्पादन, जमीन व वातावरणावर रासायनिक कीटकनाशकाचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतो. हा होणारा दुष्परिणाम जास्त कालावधीसाठी असतो जो लवकर भरता येणारा नसतो. म्हणून रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणे टाळणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय हे होणारे दुष्परिणाम टाळणे अवघड आहे आणि ते आपल्यासाठी तर हानिकारकच आहेत, परंतु येणाऱ्या पिढ्यांसाठी देखील जास्त प्रमाणात हानिकारक आहेत. पुढच्या पिढीला चांगले वातावरण, जमीन व उत्पादन देणे हि तुम्हा-आम्हा सर्वांचीच जबाबदारी आहे. म्हणून वेळीच या सर्व गोष्टी थांबवून ज्या सर्वांसाठी आवश्यक व गरज बनल्या आहेत त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. 
खते व तणनाशकांचेही कीटकनाशकांसारखेच आहे. खते व तणनाशकेही रासायनिक पद्धतीची वापरली जातात. ज्यांचा जमिनीवर, पिकांवर व वातावरणावर मोठ्या प्रमाणात नुकसानकारक दुष्परिणाम दिसून येतो. शेतामध्ये ज्यावेळी बियाण्यांची पेरणी करायची असते किंवा रोपांची लागवड करायची असते त्या आधी जमिनीत मोठ्या प्रमाणात रासायनिक खते टाकले जातात. या बरोबरच पेरणीच्या वेळी काही मात्रा रासायनिक खतांची दिली जाते. त्या नंतर काही मात्रा विविध पिकांच्या वाढीच्या वेगवेगळ्या कालावधीत दिल्या जातात. वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवगळ्या कारणांनी विविध खते व औषधांच्या वेगवेगळ्या मात्रा या वेगवेगळ्या कारणांसाठी दिल्या जातात. म्हणजे उत्पादनाच्या वाढीसाठी तसेच काही गोष्टींची पिकांमध्ये कमतरता असेल तर ती भरून काढण्यासाठी खतांचा पुरवठा केला जातो. यामध्ये अनेक खते हि पाण्याबरोबर देखील दिली जातात. वेगवेगळ्या पद्धतीने दिली जातात. हे सगळे जमीन, पिक व वातावरण कसे आहे इत्यादी सर्व गोष्टीवर ठरत असते कि कोणत्या प्रकारे खते देणे हे लाभकारक ठरेल. या सर्वांमध्ये हि खते रासायनिक पद्धतीची असतात त्यामुळे यांचा तात्काळ लाभ झालेला दिसून येतो. परंतु हा तात्काळ झालेला लाभ दूरगामी नुकसानकारक आहे. कारण यामुळे अनेक प्रकारचे दूरगामी वाईट परिणाम होत असतात. हे सगळे टाळायचे असेल तर सेंद्रिय खतांचा वापर करणे हि आज काळाची गरज बनली आहे. यामुळे कुठल्याही प्रकारचे चुकीचे दुष्परिणाम होत नाहीत.
तणनाशके हे अनेक प्रकरची आहेत त्यामध्ये ज्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो ते म्हणजे रासायनिक तणनाशके होय. जे जमिनीवर, वातावरणावर व पिकांवर देखील दुष्परिणाम करतात. या ऐवजी शेतात येणाऱ्या तणांचा योग्य प्रकारे उपयोग जमिनीसाठी केला जावू शकतो. त्यामध्ये जे अपायकारक तन आहेत त्यांचा नाश करावा. जे तन फक्त मुख्य पिकाच्या पोषणास बाधा आणत आहेत, अशा तनांची काढणी करून ते एका ठिकाणी गोळा करून वाळू द्यावे. उन्हाळ्यात जेव्हा जमिनीची धूप होत असते त्या वेळी पिकांच्या सरीत जर हे वाळलेले गवत पसरविले तर जमिनीची होणारी धूप मोठ्या प्रमाणात थांबविली जावू शकते. असे एक नाही अनेक उपाय आहेत ज्यातून शेतातील तणही काढले जाते व त्याचा सदुपयोग देखील केला जातो. 
सेंद्रिय याचा अर्थ आहे, "सह इंद्रिय" म्हणजेच इंद्रियांचा वापर करून केलेली शेती हि सेंद्रिय शेती होय. इंद्रिय सजीवांना असतात, सजीव हि दोन प्रकारची असतात एक म्हणजे प्राणी व दुसरे म्हणजे वनस्पती या सर्व प्रकारच्या सजीवांना अवयव असतात. म्हणजेच प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांचा वनस्पतीचे अन्न म्हणून उपयोग करणे. त्यात खत अवस्थेत तसेच वनस्पतींवर कीड व रोग येतात म्हणजे वनस्पती आजारी पडतात, अशक्त होतात त्यांना चांगल्या अवस्थेत आणण्यासाठी या अवशेषांचा वापर करणे म्हणजे सेंद्रिय शेती करणे होय. त्यामध्ये पालापाचोळा, शेणखत, गोमूत्र, गांडूळखत, व्हर्मिवॉश, दशपर्णी अर्क इत्यादी सजीवांच्या अवशेषांचाच हा भाग आहे. या पद्धतीने ज्या वेळी शेतीत उत्पादन वाढीसाठी उपयोग केला जाईल त्या वेळी मोठ्या प्रमाणात वातावरणात, जमिनीवर व उत्पादनावर होणारे दुष्परिणाम टाळता येतील. कारण रासायनिक कीटकनाशक, खते, तणनाशक यांच्या सध्याच्या अति वापराने जमिनीवर, उत्पादनावर, वातावरणावर तर वाईट परिणाम होतच आहेत. सोबतच जी व्यक्ती यांची फवारणी करतात किंवा ते हाताळतात त्यांनाही याचे खूप मोठे धोके असतात. व्यवस्थित काळजी घेवून या सर्व बाबी केल्या नाहीत तर फवारणी व हाताळणी करणाऱ्या व्यक्तीला मोठ्या शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागताना दिसून येते. त्यामुळे रासायनिक कीटकनाशक, खते, तणनाशक वापरणे सर्वच दृष्टीने अपायकारक आहे व त्याचे मोठे दुष्परिणाम दिसून येतात. हे सर्व दुष्परिणाम टाळायचे असतील तर वेळीच अभ्यासक दृष्टीकोनातून सेंद्रिय शेतीकडे वळणे काळाची गरज आहे. यासाठी आधुनिक शेतीक्रांतीला सुरुवात होणे आवश्यक आहे. ज्यामध्ये रासायनिक कीटकनाशक, खते, तणनाशक यांना थारा नसेल व शेतीमध्ये कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत. 


English Translate
Bad effects of insecticide fertilizer weedicide used for increase in agricultural
 
insecticide, fertilizer, weedicide are widely used to increase agricultural production. They show a large number of side effects. All of these things have been felt so much before but now they are all felt to a great extent. In fact, it is a good thing that all of this is having a detrimental effect on agriculture, on the land and on the resulting product. The most important reason for this is the chemical insecticide, fertilizer, weedicide used in all these. This has led to a wide variety of adverse effects in agriculture at present.
The side effects of pesticides are large. This is because a large number of chemical pesticides are currently being used in the fields to control crop diseases and pests. This leads to early destruction of pests and diseases, but it also causes a large amount of adverse effects of chemical pesticides on crops and soil. Chemical pesticides have a major impact on production, soil and environment. This side effect lasts for a long time which cannot be remedied quickly. It is therefore imperative to avoid the use of chemical pesticides. Without it, it is difficult to avoid these side effects and they are not only harmful to us but also extremely harmful to future generations. It is the responsibility of all of us to provide a good environment, land and production to the next generation, so it is necessary to stop all these things in time and implement what is necessary for all.
Fertilizers and weedicide are similar to pesticides. Fertilizers and herbicides are also used chemically which have a large detrimental effect on the soil, crops and the environment. Large quantities of chemical fertilizers are applied in the soil before sowing seeds or planting seedlings in the field. At the same time some chemical fertilizers are given at the time of sowing followed by some doses at different periods of growth of different crops. Different doses of different fertilizers and pesticides are given for different crops for different reasons. This means that fertilizers are supplied to increase production as well as to make up for shortages in certain crops. Many fertilizers are also given along with water. Are given in different ways. It all depends on the land, the crop and the environment, etc., how the fertilizer will be beneficial. In all of these, these fertilizers are of chemical method, so it is seen that they have immediate benefits. But this immediate benefit is far-reaching. This is because it has many far-reaching consequences. To avoid all this, the use of organic fertilizers has become the need of the hour. It does not cause any side effects.
There are many types of weedicides, the most widely used of which are chemical weedicides. Which adversely affect the soil, the environment and even crops. Instead, weeds from the field can be used properly for the soil. Destroy the weeds that are in them and weeds that are only interfering with the nutrition of the main crop are collected and collected in one place. If it is spread in the dried village, soil erosion can be stopped to a large extent. There are many remedies that can be used to remove weeds from the field.
Organic means "co-senses" which means organic farming. The senses belong to living things, living things are of two kinds, one is animal and the other is plant. All kinds of living things have organs. That is to use the remains of animals and plants as plant food. Pests and diseases occur in the manure stage as well as on the plants which means that the plants get sick and weak. To use them to get them in good condition is to do organic farming. This is part of the remains of living beings like mulch, cow dung, cow urine, vermicompost, vermiwash, dashaparni extract etc. This method will prevent large scale adverse effects on the environment, soil and production at the time when it is used to increase production in agriculture. This is because the current overuse of chemical pesticides, fertilizers, weedicides is having a detrimental effect on the soil, production, environment as well as the farmers who spray or treat them are also at great risk. If all these things are not done with proper care, the person spraying and handling them will face big physical problems, so the use of chemical pesticides, fertilizers, weedicides is harmful in all respects and its major side effects are to be avoided. Turning takes time. For this, it is necessary to start a modern agricultural revolution in which there is no shelter from chemical pesticides, fertilizers, herbicides and there will be no adverse effects on agriculture.

Post a Comment

0 Comments

Close Menu