वेगवगळ्या पेरणीच्या पद्धतींचे फायदे


वेगवगळ्या पेरणीच्या पद्धतींचे अनेक प्रकारचे फायदे आहेत. त्यामध्ये पेरणी करतांना पासून तर मशागत करणे
, खते औषधे देणे, पाणी पुरवठा करणे, काढणी करण्यापर्यंत अनेक प्रकारचे फायदे वेगवेगळ्या पेरणीच्या पद्धतींचे आहेत. १. बी फोकून बियाण्याची पेरणी करणे. २. पाभरीने बियाण्याची पेरणी करणे. ३. बियाणे टोकून पेरणी करणे. ४. रोपे तयार करून लागवड करणे. या चार पद्धती लागवडीच्या प्रमुख पद्धती समजल्या जातात यामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने लागवड होत असते. 
ज्यावेळी बियाणे फोकून बियाण्याची पेरणी केली जाते त्या वेळी हि पेरणी काही विशिष्ट पिकांसाठी केली जाते. ती सर्वच पिकांमध्ये करून चालत नाही. किंवा सर्वच पिकांना या पिक पेरणीच्या पद्धतीचा फायदा होणार नाही त्यासाठी हि पिकांची पेरण्याची पद्धत हि काही पिकांच वापरली जाते. कारण या पेरणीच्या पद्धतीमध्ये पिके मोठे झाल्यावर मशागतीचे कामे करणे अत्यंत अवघड असते. त्यामुळे ज्या पिकांना सतत मशागत करावी लागते त्यांची पेरणी या पद्धतीत केली जात नाही. या पद्धतीमध्ये एका ठिकाणी उभे राहून आजूबाजूला बियाणे हाताने फेकले जाते. यामुळे अनेक वेळा काही ठिकाणी बियाणे तुरळक पडतात तर काही ठिकाणी जास्त प्रमाणात पडतात. त्यामुळे जेव्हा बियाण्याची उगवण होते त्यावेळी काही ठिकाणी ते तुरळक प्रमाणात उगवलेले दिसते तर काही ठिकाणी दाट प्रमाणात उगवण झालेली दिसून येते. त्यामुळे हि पेरणीची पद्धत अशा पिकांसाठी आवश्यक आहे ज्या पिकांची थोडी मोठी वाढ झाल्यास त्यांची मशागत केली नाही तरी चालेल. पाभरीने बियाण्याची पेरणी करणे या पद्धतीमध्ये अनेक प्रकारचे पाभर आहेत त्यामध्ये एक चाड्याची पाभर, दोन चाड्याची पाभर इत्यादी या पद्धतीने लागवड करताना अशा पिकांची लागवड करावी ज्या पिकांचे दोन ओळींत सामन अंतर राहिलेले चालेल व दोन रोपांमधील अंतर समान नसेल तरीही चेलेल अशा पिकांची लागवड या पद्धतीने करावी. कारण या पद्धतीत दोन ओळींत तर समान अंतर ठेवता येते पण दोन रोपांमध्ये एकसारखे अंतर ठेवता येत नाही. या पद्धतीने लागवड करण्याचा महत्वाचा फायदा म्हणजे बियाणे योग्य खोलीवर बियाणे लावता येते. त्यामुळे या पद्धतीने अनेक प्रकारच्या बियाण्यांची लागवड केली जाते. बियाणे टोकून पेरणी करणे या पिक पेरणीच्या पद्धतीमध्ये विशिष्ट अंतरावर खुणा करून बियाण्याची लागवड केली जाते. त्यामुळे दोन रोपांत व दोन ओळींत योग्य अंतर ठेवणे सोपे जाते. तसेच या पद्धतीमध्ये मशागतीची कामे करणेही अतिशय सोपे असते. या पद्धतीने लागवड करताना मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागते. तसेच  या पद्धतीने मका, भुईमूग, एरंडी इत्यादी पिकांची लागवड केली जाते. रोपे तयार करून लागवड करणे या पद्धतीने लागवड करताना बियाणे हे गादीवाफे किंवा सपाट वाफ्यात तयार करून नंतर त्यांची शेतात लागवड केली जाते. अनेक प्रकारच्या भाजीपाला पिकांसाठी या पद्धतीचा वापर केला जातो. यामध्ये वाफ्यामध्ये बियाणे वाढविण्याचा कालावधी हा वेगवेगळा असतो काही रोपे हे ३ आठवड्यात तयार होतात लागवडीसाठी तर काही रोपे हे ५ आठवड्यात तयार होतात. काळजीपूर्वक या पद्धतीने लागवड केली जाते. या पद्धतीमध्ये मनुष्यबळी मोठ्या प्रमाणात लागते.
अभ्यासक पद्धतीने पाहिले तर कुठल्याही पिकाच्या पेरणीपूर्वी हा विचार झालाच पाहिजे. त्या पिकाच्या कोणत्या प्रकारच्या लागवडीने आपल्याला सर्व गोष्टी करणे सोपे होईल. सोबतच उत्पादनातही चांगली भर पडेल या बाबी लागवडीपूर्वी लक्षात घेणे अनिवार्य आहे. या सर्व गोष्टींचा लागवडीपूर्वी विचार केला तर अनेक गोष्टी सोप्या होतील. शेती हि जरीही पारंपारिक पद्धतीने होत असेल तरीही त्यामध्ये अभ्यासक दृष्टीकोन येणे हि आता काळाची गरज बनली आहे. त्याशिवाय शेतीला सोनेरी दिवस येणार नाही. शेतकरी सुखी व संपन्न व्हावा असे वाटत असेल तर शेतीत चांगले व लाभकारी बदल करणे हि काळाची गरज बनली आहे. त्यासाठी योग्य त्या पिकांसाठी योग्य ती पेरणीची पद्धत निवड आवश्यक आहे. पेरणीच्या पद्धतींचे अनेक लाभ आपल्याला बघावयास मिळतात. त्यासाठी भाजीपाला पिकांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. फुलशेतीमध्ये फुलझाडांच्या लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. फळशेती करताना तेथेही विविध निरनिराळ्या लागवडीच्या पद्धती आहेत. अन्नधान्य पिकांच्या लागवडीच्या अनेक पद्धती बघावयास मिळतात पिकानुसार. असे सर्वच बाबींचा यामध्ये विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पेरणीच्या पद्धतींचे अनेक फायदे हे पिकाच्या उत्पादनावर दिसून येतात. या ठिकाणी आपण मुख्य पद्धती थोडक्यात पहिल्यात.

English Translate 
Benefits of different sowing methods

Different sowing methods have different advantages. There are various benefits of different sowing methods ranging from sowing to cultivation, application of fertilizers, water supply, harvesting. 1. Sowing seeds by sowing seeds. 2. Sowing of seeds with pabhari. 3. Sowing seeds. 4. Preparation and planting of seedlings. These four methods are considered to be the major methods of cultivation in which different types of cultivation are used.
When sowing is done by sowing seeds, this sowing is done for certain crops. It does not work in all crops. Or not all crops will benefit from this method of sowing so only a few crops are used. This is because in this method of sowing, it is very difficult to do cultivation work when the crop is big. Therefore, crops which have to be cultivated continuously are not sown in this manner. In this method the seeds are thrown by hand while standing in one place. This often results in sparse seeds falling in some places and excessive falling in others. Therefore, when seeds germinate, in some places they appear to be sparsely germinated and in some places dense germination is seen. Therefore, this method of sowing is essential for crops which can grow well even if they are not cultivated. The method of sowing seeds by pabhari has many types of pabhars, including one chadya pabhar, two chadya pabhar etc. This is because in this method two rows can have the same distance but two plants cannot have the same distance. An important advantage of this method of sowing is that the seeds can be sown at the right depth. Therefore, many types of seeds are sown in this method. Seed sowing This method of sowing is done by sowing seeds at specific distances. This makes it easy to keep proper spacing between two plants and two rows. It is also very easy to cultivate in this method. This method of planting requires a lot of manpower. Also maize, groundnut, castor etc. are cultivated by this method. Seedlings are prepared by planting in this method. The seeds are prepared in mattress pads or flat pads and then sown in the field. This method is used for many types of vegetable crops. In this variety of seed germination period is different in Waffa. Some seedlings are ready for planting in 3 weeks while some seedlings are ready in 5 weeks. Carefully planted this method. This method requires a large amount of human sacrifice.
From a study point of view, this should be considered before sowing any crop. What kind of cultivation of that crop will make everything easier for you. At the same time, it is important to keep in mind that there will be a good increase in production. Many things will be easier if you consider all these things before planting. Even though agriculture is done in a traditional way, it has become a need of the hour to come up with a pragmatic approach. Without it, agriculture will not have a golden day. If the farmer wants to be happy and prosperous then it is time to make good and beneficial changes in agriculture. For this, it is necessary to choose the right sowing method for the right crop. There are many benefits of sowing methods. For this, there are different methods of growing vegetables. There are different methods of cultivating flowers in floriculture. While cultivating fruits, there are also different cultivation methods. There are several methods of cultivating food crops depending on the crop. All these things need to be considered in this. Therefore, many advantages of different sowing methods are seen in the yield of the crop. At this point we briefly look at the main methods.

Post a Comment

0 Comments

Close Menu