वृक्षारोपण कार्यक्रमात आपण भाग का घ्यावा?


वृक्षारोपण कार्यक्रमात आपण भाग का घ्यावा? असा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. सर्वात महत्वाची बाबा पर्यावरणाची सध्या काय स्थिती आहे हि तुम्हा आम्हा सर्वांनाच माहिती आहे. गेल्या काळात भारत बंद होता सर्वांना त्रस्त केलेल्या महामारीमुळे. त्या वेळी वातावरणात झालेले बदल देखील आपण सर्वांनीच पाहिलेत. त्यातून सर्वांनाच लक्षात येईल कि, काय करणे आपल्या वातावरणाला धोका निर्माण करते व ते कसे टाळले जावू शकते. किमान कमी तरी कसे केले जावू शकते याची सर्वांनाच जाणीव झाली असेल. त्यामुळे फक्त बघणे किंवा त्यावर बोलणे एवढेच करून भागणार नाही तर त्यासाठी कृती करणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीची सुधारणा हि आपल्यापासून केली पाहिजे. तसेच काहीसे आहे या प्रश्नाचे उत्तर कि आपण वृक्षारोपण या कार्यक्रमात भाग का घ्यावा. खरे तर हि जाणीव प्रत्येकाला असायला हवी हा प्रश्नही मनात येता कामा नये. झाडे आपल्याला हवा देतात ज्याचा आपल्याला काय उपयोग होतो या सगळ्या प्राथमिक गोष्टी आपण सगळेच लहानपणापासून ऐकत, बघत व अनुभव घेत आलो आहोत. आता त्यापुढे जावून गोष्टी करण्याची वेळ आली आहे. आपण लहान असू त्या काळातले वातावरन आणि आपले आई वडील व आपले आजी आजोबा यांच्या काळातील वातावरणात नक्कीच खूप मोठा फरक होता. तसेच आत्ता आपण अनुभवलेले वातावरण व पुढील पिढ्यांना मिळणारे वातावरण यात देखील मोठ्या प्रमाणात तफावत असणारच आहे त्यात शंका नाही. परंतु हे सगळे होत असताना काही गोष्टी या तुम्हा आम्हा सर्वांच्या हातात असतात त्या तर आपण चांगल्या ठेवू शकतो. 
ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांचा विचार करण्यात काही अर्थ नाही. परंतु जी गोष्ट आपल्या हातात आहे ती नक्कीच आपण सुधारू शकतो. चांगली ठेवू शकतो किंवा चांगली देवू शकतो त्यातलीच हि एक गोष्ट आहे ती म्हणजे पर्यावरण. पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर होय. जो चांगला राखणे हे तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. कारण येणाऱ्या पिढ्यांना सगळे काही करता येईल स्वबळावर. परंतु जर त्यांच्यासाठी वातावरण आपण चांगले नाही ठेवले तर भविष्यात त्याची खंत नको वाटायला. कि काही गोष्टी आपल्या हातात होत्या परंतु त्या आपण वेळीच करू शकलो नाहीत असे. सध्या वातावरण हे दुषित आहे ते तसेच न राहू देता त्यात जमेल तशी सुधारणा करणे आपली जबाबदारी आहे. तेच सुधारलेले वातावरण आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना हक्काने देवू शकतो. वातावरण टिकविणे हे सर्व मनुष्यांची जबाबदारी आहे, आणि याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. यावर बोलण्याची वेळ येते इथपर्यंत का गोष्टी गेल्यात का आपल्याला अजूनही याची स्वतःहून जाणीव होत नाही. 
या सर्व गोष्टी चांगल्या ठेवण्यासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. त्यासाठी कुठलाही व कसलाही विचार करण्याची आवश्यकता नाही. जसे इतर गोष्टींसाठी आपण आपली हक्क दाखवतो. तसेच हा देखील आपला हक्क आहे कि आपण वृक्षारोपण करू शकतो आणि ते आपण केलेच पाहिजे. जसे जमेल तसे
, जेवढे जमेल तेवढे, ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने इत्यादी अनेक गोष्टी असतात. पर्यावरण वाचवण्याचे मूळ हे वृक्षांचा नाश थांबविणे व त्यात जमेल तेवढी वाढ करणे हेच आहे हि बाब समजणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक सजीवासाठी वृक्ष हे महत्वाचे आहेत म्हणून जास्तीत जास्त वृक्षरोपण सर्वांनाच कसे करता येईल याकडे लक्ष असले पाहिजे. कारण काही नाही तर काही कारणांनी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असते. त्यावर जरी आपण नियंत्रण नाही ठेवू शकत परंतु वृक्षारोपण करून झाडांची वाढ तर आपण करू शकतो. अशा एक नाही अनेक गोष्टी आहेत ज्यातून आपल्याला जाणवून येईल कि वृक्षारोपण कार्यक्रमात आपण भाग घेणे किती महत्वाचे व गरजेचे आहे.

English Translate
Why should we participate in plantation program? 

Why should you participate in a tree planting program? This is a question that many have asked. Most importantly, we all know the current state of the environment. In the past, India was closed due to the epidemic that plagued everyone. We all saw the change in the atmosphere at that time. It will help everyone understand what to do to endanger their environment and how to avoid it. At least everyone knows how to do it right. So it is not enough to just look or talk about it, it is necessary to take action. We have to improve everything. Also, there is an answer to the question why you should take part in this tree planting program. In fact, the question should not even come to mind that everyone should be aware of this. Trees give us air that we have all been hearing, seeing and experiencing since childhood. Now it's time to move on. There was definitely a big difference between the atmosphere when we were young and the environment between our parents and our grandparents. There is no doubt that there will be a big difference between the environment we are experiencing now and the environment we will have for the next generation. But while all this is going on, there are some things that are in the hands of all of us so that we can keep it good.
There is no point in thinking about things that are not in our hands. But we can definitely improve what we have. One of the things that can keep good or give good is the environment. The environment is the environment around us. It is the responsibility of all of us to take good care of you. Because future generations can do everything on their own. But if you do not have a good environment for them, you will not feel bad about it in the future. That some things were in our hands but we could not do them in time. At present, it is our responsibility to improve the environment as much as possible without allowing it to remain polluted. We can claim the same improved environment for our future generations. Sustaining the environment is the responsibility of all human beings, and we should be aware of that. It's time to dump her and move on.
It takes time to plant trees to keep all these things good. There is no need to think about anything. Like we assert our rights for other things. It is also our right to plant trees and we must do it. There are many things like how you can get it, how much you can get it, how you can get it, etc. It is important to understand that the key to saving the environment is to stop deforestation and increase it as much as possible. Trees are important for every living thing, so everyone should pay attention to how to plant as many trees as possible. If not for some reason, then for some reason a large number of trees are being cut down. Although we can't control it, we can grow trees by planting trees. There are many things that will make you realize the importance and necessity of participating in a tree planting program.

Post a Comment

0 Comments

Close Menu