पाणी परीक्षण


पिकांच्या लागवडीपूर्वी पाणी परीक्षण करणे काळाची गरज आहे. पाणी परीक्षणासाठी योग्य पद्धतीचा अवलंब केला गेला पाहिजे. पाणी परीक्षण केल्यामुळे पाण्याचा आम्ल विम्ल निर्देशांक (
ph) कळतो. तसेच इतरही घटक पाण्यात किती प्रमाणात आहेत ते समजते. कारण पाणी खारट असेल तर त्यामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. पिकांची निवड करण्या पूर्वीच पाण्याचे योग्य ते परीक्षण होणे गरजेचे आहे. काही पिकांना कमी अधिक प्रमाणात खारट पाणी चालते कारण त्या पिकांमध्ये असलेल्या काही अनुवंशिक घटकांमुळे ते काही अंशी क्षारयुक्त पाण्याला प्रतिकार करू शकतात. त्यामध्ये खजूर, बोर, अंजीर, संत्रा, लिंबू, पालक इत्यादी पिकांचा समावेश होतो. या बरोबरच पाणी खारट असेल तर जमिनीतील क्षारांची पातळी वाढून जमिनी आधी क्षारयुक्त बनतात व कालांतराने जमिनी चोपण व नापीक बनत जातात. हे सर्व होणे टाळायचे असेल तर पाण्याचे परीक्षण योग्य वेळी करणे महत्वाचे ठरते. पाण्यातील घटकांची माहिती झाली कि नंतर त्यावर उपाय योजना करणे सोपे होते. जसे कि शेणखताचा वापर करणे, आच्छादनाचा वापर करणे, चर खोदणे, योग्य पद्धतीने पिकांची फेरपालट करणे व योग्य त्या पिकांची आंतरपीक म्हणून निवड करणे. अशा विविध पद्धती आहेत त्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी उपयोग करता येतो. क्षारांचे प्रमाण जास्त असेल आणि तशाच स्थितीत जर पिकांची लागवड केलेली असेल तर उत्पादनात मोठी घट होते. योग्य पद्धतीने पाण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे पिक कोणते आहे त्या भागात पाणी कसे आहे या सर्व गोष्टी लागवडीपूर्वी लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत. पाणी परीक्षण योग्य वेळी झाले नाही तर त्याचे मोठे दुष्परिणाम सहन करावे लागतात. पिकांची योग्य वाढ होत नाही, पिकांमध्ये रोग प्रतिकार शक्तीचा अभाव निर्माण होतो या सर्व गोष्टींमुळे उत्पादनावर त्याचा नुकसानकारक परिणाम होत असतो. या गोष्टी व्यवस्थित व योग्य रित्या होवून शेतीमध्ये चांगला बदल घडायचा असेल तर अभ्यासक दृष्टिकोन व तरुण पिढीने शेतीकडे वळणे काळाची गरज आहे. त्याच वेळी या सर्व गोष्टी योग्य वेळी सुधारल्या जावू शकतात. कारण शेती म्हणजे आजच होत आहे असे नाही, आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो तेथे शेती हि आपले मुळ आहे. म्हणून पिकांना आपल्याकडून काय हवे हेही आपण अभ्यासने गरजेचे आहे. आपल्याला पिकांपासून उत्पादन हवे त्यासाठी आपण त्यांना सगळे देतो खते देतो, पाणी देतो, कीड रोग आल्यास औषध देतो, फवारण्या करतो इत्यादी सगळ काही करतो. परंतु पिकांनाही आपल्याकडून काहीतरी हवे असते ते म्हणजे चांगले वातावरण, चांगली जमीन, चांगले हवामान, चांगला सूर्यप्रकाश, योग्य प्रमाणात चांगले पाणी, योग्य ते खते व औषधे. म्हणजे या सर्व गोष्टी पिकांना त्यांना मानवतील अशा योग्य वेळी व योग्य त्या दिल्या गेल्या पाहिजेत. हे सगळे वेळेवर दिल्यास पिकांची वाढ उत्तम व चांगली होवून दर्जेदार पिक उत्पादन मिळण्यास मदत होईल. या गोष्टी सर्वांनी लक्षात घेणे आज आवश्यक बनले आहे. आधुनिक शेतीक्रांतीची आज आवश्यकता आहे ते का तर शेतातील ढोबळमानाने होणारे कामे थोडे अभ्यासक व योग्य पद्धतीच्या दृष्टिकोनाचा अवलंब करून केल्यास त्याच जमिनीत तेच व्यक्ती काम करतील पण जमिनीतील उत्पादनात नक्कीच चांगला फरक पडलेला असेल. उत्पादनात भरघोस वाढ झालेली असेल उत्पादनाची प्रत सुधारलेली असेल. कारण शेती हे एक शास्र आहे त्याचा योग्य त्या पद्धतीनेच वापर झाला पाहिजे तरच त्याचा चांगला लाभ तुम्हा आम्हा सर्वाना होईल. शेतीमध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या नजर अंदाज केल्या जातात परंतु त्याचा दुष्परिणाम नंतर उत्पादनात घट होते तेव्हा लक्षात येतो. हे सगळे टाळण्यासाठी योग्य वेळी योग्य त्या गोष्टी होणे अत्यंत आवश्यक आहे. पाण्याचा नमुना घेवून तो २४ तासाच्या आत परीक्षणासाठी लॅब मध्ये पाठवावा. त्यानुसार त्यात काय कमतरता आहे किंवा कुठला घटक जास्त आहे हे सर्व परीक्षणा नंतर समजण्यास मदत होईल त्यानुसार उपयोजना करता येतील. भविष्यात होणारे नुकसान टाळता येईल व उत्तम शेती या माध्यमातून होवू शकते.

English Translate 
Test the water before crop planting

It takes time to test the water before planting the crop. Appropriate method should be adopted for water testing. Water acidity determines the pH of the water. It also understands how much other elements are in the water. Because if the water is salty, it causes a lot of damage to the crops. Proper watering needs to be done before selecting crops. Some crops run on more or less salt water because some of the genetic factors in those crops may make them more resistant to alkaline water. These include dates, bora, figs, oranges, lemons, spinach etc. At the same time, if the water is saline, the salinity level in the soil increases and the soil becomes saline first and over time the soil becomes loamy and barren. It is important to test the water at the right time to avoid all this. Knowing the components of water makes it easier to plan for remediation. Such as application of manure, use of mulch, digging of ditches, rotation of crops in a proper manner and selection of suitable crops as intercrops. There are different methods that can be used in different places. If the salinity is high and the crop is planted in the same condition, there is a big decrease in yield. Proper watering needs to be planned. What is the crop and how is the water in the area should be taken into consideration before planting. If water testing is not done at the right time, it can have serious side effects. Crops do not grow properly, crops lack immunity, all of which have a detrimental effect on production. If these things are to be done properly and properly and for a good change to take place in agriculture, then it takes time for the young generation to turn to agriculture with a pragmatic approach. At the same time all these things can be improved at the right time. Because agriculture is not happening today, our country is known as an agricultural country where agriculture is our origin. So we also need to study what crops want from us. We give them all the fertilizers, water, pesticides, sprays, etc. that we need to produce from the crops. But crops also want something from us: good climate, good soil, good weather, good sunlight, the right amount of water, the right amount of fertilizers and medicines. This means that all these things must be given to the crops at the right time and at the right time. Giving all this in time will help in getting better and better crop growth. All of these things need to be taken into account today. What is needed today is a modern agricultural revolution. If the work done in the field is done with a little practice and the right approach, the same people will work in the same land, but there will be a good difference in the production of the land. Production will be significantly increased and product copy will be improved. Because agriculture is a science and it should be used in the right way, only then it will benefit us all. There are many things in agriculture that are overlooked but the side effects are noticed when there is a decrease in production later. To avoid all of this, it is important that the right things happen at the right time. Take a water sample and send it to the lab for testing within 24 hours. According to this, it will be possible to understand what is lacking in it or which element is more. Future losses can be avoided and better farming can be done through this.

Test the water before crop planting Video :-

Post a Comment

0 Comments

Close Menu