भारतातील आर्थिक विकासात शेतीची भूमिका अनन्य साधारण आहे. शेती भारतीय आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यामधील काही महत्वाची मुद्दे खालील प्रमाणे :-
१. पिकांचे योग्य पद्धतीने नियोजन.
२. आर्थिक दृष्ट्या उपयुक्त पिकांची लागवड वाढवणे.
३. वातावरणाचा विचार करून पिकांची लागवड करणे.
४. मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करणे.
५. देशभरातील विविध विभागवार उत्पादन घेणे.
६. शेतीतील पिकांचे महत्व वाढवणे.
७. पिकांची गुणवत्ता वाढविणे.
८. जास्तीत जास्त शेतीमाल निर्यात करणे.
९. प्रक्रियायुक्त पदार्थांना चालना देणे.
१०. रासायनिक पदार्थांचा शेतात वापर टाळणे.
यासाठी आपल्या देशाने शेती विषयक आयात थांबवली पाहिजे. तसेच आपल्या देशाला शेती मालाने संपन्न बनविले जावे. आयात केल्या जाणाऱ्या गोष्टी आपल्याकडे वाढवण्यावर भर दिला तर जास्त चांगले परिणाम दिसून येतील. या नंतर बाहेरील देशांमध्ये ज्या शेतीमालाची मागणी आहे त्याची गुणवत्ता चांगली करून चांगल्या किंमतीत त्याची विक्री केली जावी. ज्याचा आपल्या देशाला अत्यंत चांगला लाभ होण्यास वाव आहे. बहुधा हे बघायला मिळते कि, काही शेतीमालाचा बाजारभाव अचानक वाढतो तर काही शेतीमालाचा बाजारभाव अचानक कमी होतो. या सततच्या बदलात योग्य नियोजनाने सातत्य येण्यास मदत होईल. यामुळे आपल्या देशाला स्वयंपूर्ण बनविले जावू शकते. निर्यात मोठ्या प्रमाणात होईल.
ज्यावेळी शेती विषयक गोष्टींची बाहेरील आयात कमी होईल, परिणामी थांबेल आणि निर्यात जास्तीती जास्त वाढेल तेव्हा आपल्या देशाचा आर्थिक विकास झालेला असेल. यासाठी सर्वांचाच शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे. शेतीकडे बघताना अभ्यासक दृष्टीने बघितले तर त्यातील संधींची जाणीव होईल. सर्वांनाच शेतीमध्ये प्रगती करण्याला वाव आहे. सध्याच्या काळात तर हे महत्वाचे आहेच परंतु या सगळ्या गोष्टींकडे वेळीच लक्ष दिले तर पुढच्या पिढीला काही चांगले देण्यास यशस्वी होता येईल. जेव्हा शेतकरी स्वयंपूर्ण होईल तेव्हा त्यांची आत्महत्या होणे थांबेल असे म्हटले जाते. परंतु आत्ता शेती हा विषय फक्त शेतकरी एवढा मर्यादित राहिलेला नाही. जर शेतकरी स्वयंपूर्ण झाला तर देश देखील स्वयंपूर्ण होईल. परिणामी देशाची आर्थिक स्थिती स्वयंपूर्ण होताना दिसून येईल. शेतीला चांगली चालना मिळण्यासाठी सर्वानीच प्रयत्न करणे आवश्यक आहे.
मोठ्या स्थरावर हे नियोजन झाले पाहिजे यामधील प्राथमिकता म्हणजे जेथे जी पिके चांगले होतात तेथे तशा पद्धतीने पिकांची लागवड करणे. त्याला कारण अशा ठिकाणी पिक सुरळीतपणे येण्यास मदत होते. अडचणी कमी येतात पिके रोग किडींना कमी प्रमाणात बळी पडतात. अनेक गोष्टींवरचा खर्च वाचतो व पिकांची गुणवत्ता चांगली राहते. यामुळे उत्पन्नाला बाजारभाव चांगला मिळतो देशातही आणि विदेशातही. जास्तीत जास्त निर्यात वाढवली तर देशाला त्याचा आर्थिक नफा होईल. यासाठी "शेती नियोजन" अशा प्रकारची योजना राबविली पाहिजे. ज्यातून मोठ्या स्थरावर शेती मालाचे नियोजन होईल.
शेतीची भारताच्या आर्थिक विकासात कायमच मोठी व मोलाची भूमिका राहिली आहे. म्हणून तर आपल्या देशाला कृषिप्रधान देश असे समजले जाते. हीच भूमिका आत्ता दृढ करण्याची वेळ आली आहे....
English Translate
Role of agriculture in economic development in India
The role of agriculture in India's economic development is unique. It does not matter if agriculture is the backbone of the Indian economy. Some of the important points are as follows: -
1. Proper crop planning.
2. To increase the cultivation of economically viable crops.
3. Cultivation of crops keeping in view the environment.
4. Creating massive awareness.
5. Acquisition of various departmental products across the country.
6. To increase the importance of agricultural crops.
7. Improving crop quality.
8. Exporting maximum agricultural produce.
9. Promoting processed substances.
10. Avoid the use of chemicals in the field.
For this, our country should stop importing agricultural products. Also, our country should be made prosperous with agricultural commodities. The more you focus on the things you import, the better the results will be. After this, the quality of agricultural produce which is in demand in foreign countries should be improved and sold at a good price. Which has the potential to benefit our country immensely. It is often seen that the market price of some agricultural commodities rises suddenly while the market price of some agricultural commodities decreases suddenly. Proper planning will help to bring about continuity in this continuous change. It can make our country self-sufficient. Exports will be large.
At a time when imports of agricultural commodities are declining, consequently stagnant, and exports are increasing exponentially, our country will be economically developed. For this, it is necessary to change the attitude of everyone towards agriculture. If you look at agriculture from a practical point of view, you will realize the opportunities in it. Everyone has the opportunity to make progress in agriculture. This is important in the present, but if we pay attention to all these things in time, we can succeed in giving something better to the next generation. It is said that when a farmer becomes self-sufficient, his suicide will stop. But now the subject of agriculture is not limited to farmers only. If the farmer becomes self-sufficient, then the country will also become self-sufficient. As a result, the country's economic situation will become self-sufficient. Everybody needs to make an effort to get a good start in agriculture.
This should be done on a large scale. The reason is that it helps the crop to grow smoothly in such places. Problems are reduced. Crops are less susceptible to diseases and pests. It saves money on many things and the quality of the crop remains good. This gives a good market price to the income both in the country and abroad. Increasing exports to the maximum will benefit the country financially. For this, "agricultural planning" should be implemented. Which will lead to large scale planning of agricultural commodities.
Agriculture has always played a vital role in India's economic development. Therefore, our country is considered as an agricultural country. It's time to dump her and move on.
0 Comments