सेंद्रिय शेतीत तरुणांची भूमिका


सेंद्रिय शेतीत तरुणांची भूमिका फार मोठी व मोलाची आहे. हि बाब जेवढी लवकर जाणवेल तेवढे चांगले आहे. कारण आजवर शेती केली जाते ती जास्तीत जास्त पारंपारिक व ढोबळमानाने. सध्याच्या तसेच यापुढील कालावधीत शेती हि पारंपारिक आणि आधुनिक पद्धतींची सांगड घालून होणे आवश्यक आहे. काही गोष्टी अश्या असतात त्या पारंपारिक पद्धतीने करणे गरजेचे असते. त्यातून चांगला लाभ होण्यास मदत होते. तर काही गोष्टी आधुनिक पद्धतीने केल्यास त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. आर्थिक दृष्ट्या काही गोष्टी समजणे अधिक महत्वाचे आहे. असे बोलले जाते कि, ज्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असते तो देश अप्रगत असतो किंवा प्रगती करण्याच्या वाटेवर असतो. तसेच ज्या देशाची अर्थव्यवस्था औद्योगिक गोष्टींवर अवलंबून असते तो देश प्रगत असतो. असे असताना हि गोष्ट देखील खोडून काढली जावू शकते. ज्या वेळी तरुण पिढी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास प्राधान्य द्यायला सुरुवात करेल.
 
तरुण पिढीमध्ये क्रांती करण्याची क्षमता जास्त असते, हे आपण आपल्या इतिहासातून समजूच शकतो. तसेच आपल्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे. तरुण पिढी जर शेतीकडे वळली तर आधुनिक शेतीक्रांती होणे सोपे होईल. शेतीकडे वळून भागणार नाही, तर सेंद्रिय पद्धतीने शेती करणे आवश्यक आहे सर्वच दृष्टीने. अभ्यासपूर्वक शेती करणे महत्वाचे आहे. शेती करताना धान्य पिकविणे जसे महत्वाचे आहे ज्यातून आपल्या देशाची गरज भागवून काही प्रमाणात आपण त्याची निर्यात करतो. या सोबतच अजून शेतीमध्ये अशा संधी आहेत ज्यांची आपण आपल्या देशाची गरज भागवून त्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात करू शकतो. आताही करतच आहोत परंतु जर त्या गोष्टी सेंद्रिय पद्धतीने पिकविल्या तर त्यांना चांगली मागणी वाढेल व आपल्याला त्याचा मोबदला चांगला मिळण्यास मदत होईल.
या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने करायच्या असतील तर तरुणांना सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे वळणे आवश्यक आहे. कारण त्यात त्यांची भूमिका मोठी आहे व महत्वाची देखील तितकीच आहे. आधुनिक शेतीक्रांती होणे म्हणजे त्यात प्राधान्य सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यालाच असले पाहिजे. तसेच शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन हा बदलला पाहिजे. जसे औद्योगिक क्षेत्राकडे पाहिले जाते तसेच शेती क्षेत्र तेवढेच महत्वाचे आहे, किंबहुना शेती सर्वच क्षेत्रांपेक्षा अधिक महत्वाची आहे. त्याची तुलना कशाशीच होवू शकत नाही. कारण जगातील प्रत्येक जीवाला खाण्यास लागते तेच खाण्यासाठी लागणारे अन्न जर चांगले मिळाले तर किती बरे होईल ना... म्हणून शेती सर्वच दृष्टीने मनुष्य जातीचे मूळ आहे. त्याकडे तरुणांनी तर वळणे गरजेचेच आहे परंतु सर्वांनीच त्याचे महत्व समजणे आवश्यक आहे.
अशा एक नाही तर अनेक गोष्टी आहेत ज्यातून असे दिसून येईल कि सेंद्रिय शेती करणे किती आवश्यक आहे. आवश्यक तर आहेच परंतु नक्की सेंद्रिय म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. सोबतच तरुणांची सेंद्रिय शेतीतील भूमिका काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेती करणे काळाची गरज आहे. त्यामध्ये शेती कोणत्या प्रकारची आहे, त्यात कोणते पिक घेणे सोपे पडेल, वातावरण कोणते आहे. कशाला चांगला मोबदला मिळेल अशा सर्व प्रकारच्या गोष्टींचा अभ्यास हा पिक लागवडीपूर्वी केला गेला पाहिजे. ज्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतील व शेतात देखील नवीन नवीन प्रयोग चांगल्या प्रकारे केले जातील. ज्यातून फायदा होतो त्यांची प्रसिद्धी करून नवीन गोष्टी होवू शकतात. सेंद्रिय शेतीमध्ये अनेक गोष्टी आहेत त्यासाठी खूप काही खते किंवा औषधे विकत आणण्याची देखील गरज पडत नाही. ती आपण स्वतः शेतावर तयार करू शकतो. तसेच ते ज्यांना हवे त्यांना पुरवू शकतो अशा अनेक गोष्टी आहेत ज्या केल्या जावू शकतात.

English Translate
Role Of Youth In Organic Agriculture 

The role of youth in organic farming is very big and valuable. The sooner you realize this, the better. Because farming is done to this day in the most traditional and gross way. In the present as well as in the future, agriculture must be combined with traditional and modern methods. There are some things that need to be done in the traditional way. It helps to make a good profit. So doing some things in a modern way makes the most of it. It is more important to understand some things financially. It is said that a country whose economy is dependent on agriculture is either underdeveloped or on the path to progress. Also, a country whose economy is dependent on industrial things is advanced. Even so, owning one is still beyond the reach of the average person. By this time the younger generation will start preferring organic farming.
We can see from our history that the younger generation has the potential to make a revolution. Also, the number of youth in our country is high. If the younger generation turns to agriculture, it will be easier for the modern agricultural revolution to take place. We will not turn to agriculture, but organic farming must be done in all respects. It is important to practice farming. It is just as important to grow grain in agriculture as it is to meet the needs of our country and to some extent we export it. At the same time, there are still opportunities in agriculture that we can export to meet the needs of our country. We are still doing it, but if those things are grown organically, they will be in good demand and will help you get good returns.
If all this is to be done well, young people need to turn to organic farming. Because their role is big and just as important. The modern agricultural revolution means that the priority should be organic farming. Attitudes towards agriculture should also change. The agricultural sector is just as important as the industrial sector, in fact agriculture is more important than all other sectors. It can't be compared to anything. Because every living thing in the world needs to eat the food that it needs to eat. Young people need to turn to it, but everyone needs to understand its importance.
There are many things that can be done to show the importance of organic farming. It is necessary, but it is necessary to understand exactly what is organic. At the same time, it is important to understand the role of youth in organic farming. Organic farming takes time. What kind of agriculture is there, what crops will be easy to grow in it, what is the environment. All sorts of things that will get good returns should be studied before planting this crop. From which many things will be learned and new experiments will be done well in the field. New things can happen by publicizing those who benefit. There are so many things in organic farming that you don't even have to buy a lot of fertilizers or medicines. We can make it ourselves on the farm. There are also many things that can be done to help those who need it.

Post a Comment

0 Comments

Close Menu