पाणी व्यवस्थापन


पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी पाणी किती महत्वाचे आहे हे तुम्हा आम्हा सर्वांनाच अवगत आहे. या सोबतच पाणी किती द्यावे
कसे द्यावेकोणत्या वेळी द्यावे या गोष्टीही माहिती असणे आवश्यक आहे. प्रत्येक पिकाची पाण्याची गरज हि वेगवेळी असतेपिकांना पाणी जास्त किंवा कमी प्रमाणात देवून भागत नाही. त्यासाठी योग्य प्रमाण अतीशय महत्वाचे असते. कमी पाणी दिले तरी पिकांवर त्याचे चुकीचे परिणाम दिसून येताततसेच जास्त पाणी दिले तरीही पिकांवर त्याचे वाईट परिणाम होतात. त्यामुळे प्रमाणात पाणी देणे हे चांगल्या उत्पादनाचे उत्तम लक्षण समजले जाते. काही ठिकाणी माहितीच्या अभावामुळे काही पिकांना पाण्याची जास्त मात्राही दिली जाते त्यामागे हा उद्देश असतो किपाणी भरपूर दिले तर उत्पादन चांगले येईल. परंतु असे नसते चांगल्या पिक उत्पादनासाठी गरजेनुसारच पाण्याचा पुरवठा केला गेला पाहिजे. तसेच काही पिकांना काही प्रमाणात पाण्याचा तान पडू देणे देखील आवश्यक असते. अशा रीतीने वेगवेगळ्या पिकांसाठी पाण्याची आवश्यकता हि वेगळी असते त्या नुसारच ती भागवली गेली पाहिजे.
या सर्व गोष्टी सुस्थितीत होण्यासाठी पाणीजमीनआणि त्यात घेतली जाणारी पिके यांच्यामधील संबंध अभ्यासपूर्वक समजून घेणे आवश्यक आहे. पिकांच्या उत्पादनात इतर गोष्टींप्रमाणेच पाण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. जमिनीचा पोत कसा आहे व त्यात कोणते पिक घेतले जात आहे यावरून पाणी किती लागेल या गोष्टी ठरवाव्यात. जमिनीच्या विविध पोतानुसार पाण्याची उपलब्धता बदलतेजमिनीतील उपलब्ध पाण्याचा ओलावा ५० टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास पिक कोमेजण्यास सुरुवात होते. प्रामुख्याने पिकाच्या चयापचय व वाढीच्या सर्व क्रिया उदा. बाष्पोच्छवासजमिनीच्या पृष्ठभागावरील बाष्पीभवन इत्यादी वरून त्या पिकाची पाण्याची गरज काढली जाते.
तसेच सर्वात महत्वाची बाब आहे ती म्हणजे सुयोग्य पद्धतीने पिकांना पाण्याचा पुरवठा होणे. यासाठी योग्य त्या पाणी देण्याच्या पद्धतीची निवड करावी. कमी पाणी असेल तर त्या ठिकाणी कोणती पाणी देण्याची पद्धत वापरूनपाण्याचे योग्य नियोजन होवू शकते जेणेकरून पिकाला पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही. पाणी जास्त असेल अशा वेळीसोबतच पाणी कमी असेल अशा वेळी कोणती पद्धत वापरावी हे ठरविले पाहिजे. पिकांना लागवडीपूर्वीलागवडीनंतरपिकांच्या वाढीच्या नाजूक अवस्थेत इत्यादी विविध कालावधीत पाण्याच्या वेगवेगळ्या पाळ्यांची आवश्यकता असते. पाणी देण्याच्या मोकाट पद्धतआळे पद्धतफवारा सिंचन (तुषार सिंचन)ठिबक सिंचन इत्यादी प्रचलित पद्धती आहेत. कमी पाणी असल्यास लांब सारी पद्धतीचाजोड ओळ पद्धतीचापट्टा पद्धत तसेच सारी आड सारी भिजवून पाणी दिले जाते इत्यादी पद्धतींचा वापर केला जातो. या बरोबरच जमिनीत जास्त प्रमाणात ओलावा टिकवून राहावा यासाठी जमिनीत आच्छादनाचा वापर केला जातो. त्यासाठी गवताचेही आच्छादन केले जाते. ज्यांना शक्य असेल अशा ठिकाणी ठिबक सिंचन या पद्धतीचा देखील वापर केला जातो. यामुळे पाणी पिकाच्या थेट मुळाजवळ थेंब-थेंब दिले जाते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत नाही व हवे तेवढेच पाणी पिकाला मिळणे सोपे होतेपाणी व्यवस्थापन हा पिक उत्पादनातील महत्वाचा भाग आहे. त्याचे काटेकोर पालन केल्यास भविष्यात होणाऱ्या पाणी टंचाई वर मात करता येईलउत्पादनात भरघोस वाढ होण्यास मदत होईल.
पिकांना पाणी व्यवस्थापन हा अभ्यासक पद्धतीने हाताळण्याचा भाग आहे. कारण अनेक ठिकाणी माहितीच्या अभावामुळे अनेक चुकीच्या पद्धतीने पाणी दिले जाते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आधुनिक शेतीक्रांतीच्या दिशेने वाटचाल करतानातरुण पिढीने तसेच शेतकऱ्यांनी हे सर्व मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहेत. अभ्यासक दृष्टिकोनातून पाण्याचे व्यवस्थापन केले तर पिकांना आवश्यक पाणी मिळेल सोबतच पाण्याचीही बचत करण्यास यश मिळेल. यासाठी पाणी देण्याच्या योग्य पद्धतीची पिकानुसार निवड करावी. सोबत शेतात आच्छादनाचा वापरही चांगल्या प्रकारे केल्यास येणारे तन नियंत्रणात ठेवता येतेसोबतच जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यास त्याची चांगली मदत होते. शेती करत असताना पारंपारिक पद्धतीचा तर वापर करायलाच पाहिजेसोबत नवीन तंत्रज्ञानालाही आवश्यक तिथे वापरले पाहिजे. ज्यामुळे अनेक गोष्टी सोप्या होतातसर्वांनाच सर्व गोष्टी वापरणे शक्य होत नाही सर्वच ठिबक सिंचन नाही वापरू शकत. यालाही अनेक पर्याय आहेत त्यानुसार पाण्याची बचतपिकाला सुयोग्य पाण्याचे नियोजनजमिनीतील ओलावा या सर्व गोष्टी व्यवस्थित नियोजनाने सोप्या होवू शकतात. त्यासाठी सर्व गोष्टींची अभ्यासक पद्धतीने सुयोग्य सांगड घालणे अत्यंत आवश्यक आहे. शेती एक शास्र आहे आणि ती शास्रोक्त पद्धतीने होणे तेवढेच आवश्यक आहे. अशा सगळ्या गोष्टी जमल्यात कि पाण्याचे नियोजन चांगले होईल. परिणामी उत्पादनातही चांगली भरघोस वाढ झालेली दिसून येईल.

English Translate 
Water Management

We all know how important water is for good crop production. It is also important to know how much water to give, how to give it, when to give it. The water requirement of each crop is different, the crop is not given more or less water. The right amount is very important for that. Less watering can have adverse effects on crops, and more watering can have adverse effects on crops. Therefore, adequate watering is considered to be the best sign of a good product. Due to lack of information in some places, some crops are given more water. The purpose behind this is that if a lot of water is given, the yield will be better. But this is not the case. For good crop production, water should be supplied as per the requirement. It is also necessary to allow some crops to get some amount of water. Thus the water requirement for different crops is different and should be adjusted accordingly.
In order for all these things to be in good condition, it is necessary to study carefully the relationship between water, land, and the crops grown in it. The importance of water in crop production is as unique as anything else. Depending on the texture of the soil and what crops are being grown in it, the amount of water required will be decided. The availability of water varies according to the different textures of the soil. If the available water moisture in the soil is less than 50%, the crop starts wilting. Mainly all the activities of crop metabolism and growth e.g. The water requirement of the crop is derived from evaporation, evaporation from the surface of the soil etc.
Also, the most important thing is to supply water to the crops properly. Choose the right method of watering. If there is less water, what method of watering should be used in that place, proper water planning can be done so that the crop does not experience water shortage. Decide which method to use when water is high and water is low. Crops need different watering periods at different periods like before planting, after planting, in the critical stage of crop growth etc. Mokat method of watering, Aale method, sprinkler irrigation (drip irrigation), drip irrigation etc. are the prevalent methods. If there is less water then long sari method, joint line method, belt method as well as water is given by soaking all sari sari etc. In addition, mulch is used to retain excess moisture in the soil. For this, grass is also covered. Drip irrigation is also used where possible. This results in water droplets being applied directly to the roots of the crop. This does not waste water and makes it easier for the crop to get as much water as it needs. Water management is an important part of crop production. Strict adherence to it will help in overcoming future water scarcity, which will help in increasing production.
Water management of crops is part of handling in a pragmatic manner. This is because in many places water is supplied in a wrong way due to lack of information. To avoid all this, the young generation as well as the farmers need to keep all these issues in mind while moving towards the modern agricultural revolution. If water is managed from a pragmatic point of view, the crops will get the required water as well as save water. For this, proper method of watering should be chosen according to the crop. Proper use of mulch in the field also helps in controlling the weeds and helps in maintaining soil moisture. While farming, traditional methods must be used, along with new technologies where necessary. Which makes many things easier, not everyone can use everything, not everyone can use drip irrigation. There are many options for this, according to which water saving, proper water planning for the crop, soil moisture can all be simplified with proper planning. For this, it is very important to put everything in a practical way. Agriculture is a science and it needs to be done in a scientific way. With all this in mind, water planning will be better. As a result, there will be a good increase in production.

Water Management Video :-

Post a Comment

0 Comments

Close Menu