गांडूळखत


सेंद्रिय शेती करत असताना गांडूळ खताचे अनन्य साधारण महत्व आहे. आधुनिक शेतीक्रांती मध्ये शेतीकडे एक संधी म्हणून तरुण वर्गाने व शेतकऱ्यांनी बघत असताना गांडूळखत हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. शेतीकडे एक व्यवसाय म्हणून बघत असताना गांडूळखत या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात संधी असल्याचे दिसून येईल. यासाठी जागाही कमी लागते थोडे लक्ष द्यावे लागते त्यातून तीन प्रकारचे उत्तम व्यवसाय देखील करता येवू शकतात. त्यामध्ये एक म्हणजे उत्तम दर्जाचे गांडूळखत निर्मिती आणि विक्री. दुसरे म्हणजे चांगल्या प्रतीच्या गांडूळांची विक्री कारण गांडुळे वाढतच असतात. तिसरे म्हणजे गांडूळांच्या बेड मधून थेंबाथेंबाने जे पाणी पडत असते, म्हणजे गांडूळखत बनत असताना पाणी दिले जाते व त्यात टाकलेला पालापाचोळा यांचा तो अर्क असतो त्याला व्हर्मीवॉश असे म्हणतात. या तीन गोष्टी एकाच गांडूळ खताच्या उपक्रमातून मिळत असतात. गांडूळखत निर्मिती याकडे एक संधी व शेतीला जोडव्यवसाय म्हणून बघितले तर यातील सर्व संधींचे महत्व आपल्या लक्षात येईल.
शेतीसाठी अतिशय अनुकूल असे हे खत आहे शेतामध्ये रासायनिक खता ऐवजी गांडूळखताचा वापर केला तर त्याचे अनेक फायदे दिसून येतात. गांडुळे जमिनीत असल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. जमिनीतील सच्छिद्रता पोकळी त्यांच्या हालचालींमुळे टिकून राहते. गांडुळे खाली वर होत असतात त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. या खतामुळे पिकांना पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यास मदत होते. कुठल्याही पिकांसाठी गांडूळखत हे उत्तम खत समजले जाते. फळझाडे, फुलशेती, परसबाग, भाजीपाला शेती इत्यादी सर्वच ठिकाणी गांडूळ खताचा वापर फायदा देणारा ठरतो. या खताच्या वापरामुळे कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. गांडूळ हा प्राणी ओलसर जागेत अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांवर उपजीविका करतो. मातीमिश्रित पदार्थ खाऊन ते जमिनीच्या पृष्ठभागावर विष्टेच्या स्वरुपात बाहेर टाकतो. याच विष्टेत त्याच्या शरीरातून स्रवत असलेल्या घटकांमुळे अनेक पदार्थांवर प्रक्रिया होते आणि त्यामुळे वनस्पतींना पोषक अन्नद्रव्ये तसेच बरीच संप्रेरके मिळतात. त्यामुळे जमिनीत अन्नघटकांचे विघटन होण्यास मदत होत असते. त्यात प्रामुख्याने जिवाणू, बुरशी यांचा समावेश होतो.
गांडूळखत वापरल्याने जमिनी भुसभुशीत होतात. पिकांवर पडणारे कीड व रोग यांना नियंत्रित ठेवण्यात मदत होते. सोबतच जमिनीत सेंद्रिय पदार्थांची वाढ झाल्यामुळे जमिनीतील सूक्ष्म जीवांची आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढून ती पिकांना त्वरित उपलब्ध होण्यास मदत होते. या बरोबरच जे व्हर्मीवॉश गांडूळ खताच्या निर्मितीतून मिळते त्यामुळे अनेक लाभ हे चांगल्या उत्पादनासाठी होत असतात. पिकाच्या चागंल्या उत्पादनासाठी व्हर्मीवॉश हे एक उत्तम औषध आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सेंद्रिय शेती करा असे जेव्हा सांगण्यात येते, त्यावेळी अनेकांना असे प्रश्न पडतात कि कीड रोग आल्यास पिकांवर कसली फवारणी करावी. असे प्रश्न मनात येण्यामागे कारण आहे ते म्हणजे रासायनिक खत औषधांचा होणारा भरमसाठ वापर. रासायनिक खते औषधे बाजारात सहज उपलब्ध असतात म्हणून ते घेतले जातात आणि फवारले जातात परंतु त्याचा दुरगामी वाईट परिणाम जमीन, हवामान पिके व उत्पादन यावर होतो. हे सगळे टाळण्यासाठी जसे दशपर्णी अर्क, निबोळी अर्क यासारखे काही फवारण्या केल्या जातात कीड रोग पिकांवर आल्यास, सेंद्रिय शेती करताना त्या सोबतच हे एक उत्तम पिकांचे तंदुरुस्त राहण्याचे औषध आहे ते म्हणजे व्हर्मीवॉश. जे गांडूळखत निर्मिती बरोबरच आपल्याला मिळते.
गांडूळखत निर्मिती हा एक उत्तम व्यवसाय देखील होवू शकतो. याकडे एक संधी म्हणून बघणे आवश्यक आहे, असे म्हणण्यापेक्षा आत्ता सध्याची सर्वच परिस्थिती बघता हि काळाची गरज आहे असे म्हणावे लागेल. कारण मोठ्या प्रमाणात रासायनिक खते औषधे हे आपल्याला बाहेरून आयात करावे लागतात. हि बाहेरून होणारी आयात कमी आणि परिणामी बंद करायची असेल तर, सेंद्रिय शेती आणि त्यात गांडूळखत हा आपल्या शेतीसाठी उत्तम उपाय आहे. रासायनिक खते म्हणजे एक प्रकारचे विषालाच आपण आमंत्रन देतो हे सगळे थांबण्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टी करणे अनिवार्याचे आहे. या सगळ्याने आपण आपल्या पुढच्या पिढीला एक चांगली जमीन तर देवू सोबतच चांगले वातवरण देखील देवू शकू. या सर्व गोष्टींचा विचार तुम्हा आम्हा सर्वांनीच मुळापासून करणे अगत्याचे आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले पदार्थ आपल्याला बाजारभाव चांगला मिळण्यास देखील मदत करून देतील. कारण कुणालाही विष खाण्याची इच्छा नाही रासायनिक खत, औषधांच्या फवारणी केल्याने कुठल्याही उत्पादनावर त्याचे विषारी कण हे राहतच असतात आणि ते कुणालाही नको असतात. योग्य पर्याय उपलब्ध नसल्यामुळे ते वापरले जाते परंतु शेतीत सेंद्रिय खत औषधांचा वापर व त्यांची जास्तीत जास्त दर्जेदार निर्मिती केली तर हा सगळाच गुंता लवकरात लवकर सुटण्यास मदत होईल. चांगले आरोग्य लाभण्यासाठी निरोगी व विषरहित आहार आवश्यक आहे. त्यासाठी विषरहित अन्नपदार्थांचा पुरवठा वाढला पाहिजे, हे सगळे होण्यासाठी  सेंद्रिय शेती काळाची गरज आहे.

English Translate
Vermicompost Manure 

Earthworm manure has a unique general importance when doing organic farming. In the modern agricultural revolution, the vermicompost initiative is very important as it is seen by the youth and farmers as an opportunity for agriculture. Looking at agriculture as a business, it can be seen that there are a lot of opportunities in vermicomposting. It also requires less space and less attention. There are three types of good business that can be done. One of them is the production and sale of high quality vermicompost. The second is to sell good quality earthworms because earthworms keep growing. Thirdly, the water that falls from the bed of earthworms in drops, that is, water is given while making vermicompost and the extract of mulch in it is called vermiwash. These three things are obtained from the same vermicomposting activity. If we look at vermicompost production as an opportunity and agriculture as a side business, we will realize the importance of all these opportunities.
This is a very suitable fertilizer for agriculture. If vermicompost is used instead of chemical fertilizer in the field, it has many benefits. The presence of earthworms in the soil helps in improving the soil texture. The porosity cavity in the soil is maintained by their movements. Earthworms move up and down so the air in the soil keeps moving. This fertilizer helps in supplying nutrients to the crops. Vermicompost is considered to be the best fertilizer for any crop. The use of vermicompost is beneficial in all places like fruit trees, floriculture, kitchen gardens, vegetable farming etc. The use of this fertilizer does not cause any harm. The earthworm feeds on semi-decomposed organic matter in moist places. It feeds on the soil and excretes it in the form of feces on the surface of the soil. In this excreta, many substances are processed by the elements secreted by its body and thus the plant gets nutrients as well as a lot of hormones. This helps in the breakdown of nutrients in the soil. It consists mainly of bacteria, fungi.
The use of vermicompost makes the lands fertile. Helps to control pests and diseases on crops. At the same time, the increase in organic matter in the soil increases the availability of micro-organisms and nutrients in the soil, which helps in quicker availability of crops. In addition to this, the vermiwash obtained from the production of vermicompost has many benefits for better production. It is safe to say that vermiwash is a great medicine for good crop production. When it comes to organic farming, many people wonder how to spray crops in case of pests. The reason behind such questions is the rampant use of chemical fertilizers. Chemical fertilizers are readily available in the market so they are taken and sprayed but it has far reaching adverse effects on land, climate crops and production. To prevent all this, some sprays like Dashparni extract, Niboli extract are applied on the crop. Which you get with vermicompost production.
Vermicomposting can also be a great business. Rather than saying that this should be seen as an opportunity, we have to say that this is the need of the hour given the current situation. This is because we have to import a large number of chemical fertilizers. Organic farming and vermicomposting is the best solution for your farming if you want to reduce this import and stop it. We have to do all these things to stop the fact that chemical fertilizers are a kind of poison that we invite. With all this we can give a good land and a good environment to our next generation. It is important for all of us to think about these things from the beginning. Organically grown foods will also help you get better market prices. Because no one wants to eat poison. By spraying chemical fertilizers, drugs, its toxic particles stay on any product and no one wants them. It is used as there are no suitable alternatives available, but the use of organic fertilizers in agriculture and their maximum quality production will help to get rid of all these complications as soon as possible. A healthy and non-toxic diet is essential for good health. For this, the supply of non-toxic food should be increased, for all this, organic farming needs time.

Post a Comment

0 Comments

Close Menu