खत व्यवस्थापन


पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी पाणी व जमीन
, बियाणे या गोष्टी जशा महत्वाच्या आहेत तसेच अत्यंत महत्वाचे आहे ते म्हणजे पिकांना खत व्यवस्थापन. खताची आवश्यकता का पडते तर वनस्पतींच्या शरीराची सुदृढ वाढ होण्यासाठी नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, लोह, मँगेनीज, बोरॉन, जस्त, तांबे, मॉलिब्डेनम, क्लोरीन या सोळा मुलद्रव्यांची आवश्यकता असते. यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश हि प्रधान अन्नद्रव्य आहेत यांची पिकांना जास्त प्रमाणात आवश्यकता असते. यांच्या पाठोपाठच कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक हि पिकांना आवश्यक असते ते दुय्यम अन्नद्रव्य म्हणून संबोधले जातात. याबरोबरच कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, लोह, मँगेनीज, बोरॉन, जस्त, तांबे, मॉलिब्डेनम, क्लोरीन यांना सूक्ष्म अन्नद्रव्ये असे म्हणतात ते पिकांना कमी प्रमाणात लागतात. या अन्नद्रव्यांचा पुरवठा पिकांना हवा, पाणी व जमीन यातून होतो. या बरोबरच पिकांना लागणाऱ्या या घटकांचा पुरवठा हा खतांद्वारे केला जातो.
खतांचे मुख्य दोन प्रकार, त्यामध्ये सेंद्रिय खते व असेंद्रिय खते :- 
सेंद्रिय खते :- सेंद्रिय खतांमध्ये शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत इत्यादी खतांचा समावेश होतो. या खतांच्या वापराणे जमिनीचा पोत चांगला राहतो. तसेच आवश्यक त्या अन्नद्रव्यांचा पुरवठाही सेंद्रिय खते चांगल्या प्रमाणात करतात. पिकांना आवश्यक असणाऱ्या जीव जंतूंची वाढ जमिनीत सेंद्रिय खतांमुळे चांगली होते. शेंगवर्गीय पिकांमुळे जमिनीतील उपलब्ध नत्राचे प्रमाण वाढून जमीन सुपीक बनते म्हणून पिकांची फेरपालट करताना शेंगवर्गीय पिकांचा समावेश करावा.
असेंद्रिय खते :- असेंद्रिय खते म्हणजे रासायनिक खते होय रासायनिक खतांमध्ये एकेरी खते, संयुक्त खते, मिश्र खते इत्यादींचा समावेश होतो. एकेरी खतांमध्ये एकाच अन्नद्रव्याचा पुरवठा केला जातो. संयुक्त खतांमध्ये एक किंवा दोन अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जातो. मिश्र खतांमध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त अन्नद्रव्यांचा पुरवठा करतात.
रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत बिघडतो. यांचा वापर करणे टाळले पाहिजे, सोबतच माहिती असावी जे आपल्याला वापरायचे आहे त्याची आणि जे आपल्याला वापरायचे नाही त्याचीही. तसेच सेंद्रिय खते का वापरावीत व रासायनिक खते वापरणे का टाळावे हे माहिती असणे आवश्यक आहे. त्याशिवाय आधुनिक शेतीक्रांती होणे अशक्य आहे. यासाठी डोळस व अभ्यासक दृष्टीकोन महत्वाचा आहे. तरुण पिढीने शेती एक संधी म्हणून बघत असताना या गोष्टींचा अभ्यास करणेही महत्वाचे आहे. पिकांच्या उत्तम वाढीसाठी सेंद्रिय खते देणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण जे रासायनिक खते पुरवू शकत नाही ते सर्व सेंद्रिय खते पुरवू शकतात. सोबतच जमिनीचा पोतही यामुळे खराब होत नाही उलट दिवसेंदिवस जमिनीची घडण चांगली होत जाते. परिणामी उत्पादनात चांगली भर यामुळे पडत असते कारण पिकांना हवे ते अन्नद्रव्य जमिनीमधून मुबलक प्रमाणात मिळत असतात. अन्नधान्य उत्पादनात सेंद्रिय खतांचा भरीव वाटा आहे. खते देण्याच्या जमिनीवर विखुरणे, टॉप ड्रेसिंग, तिफणीच्या सहाय्याने खते पेरून देणे, ओळीत खते देणे, नांगराच्या तासामागे खते देणे, गोळी पद्धत इत्यादी प्रचलित पद्धती आहेत.
आधुनिकतेकडे वळताना या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे कि, योग्य वेळी खतांची हवी तेवढीच मात्रा दिली गेली पाहिजे. त्यात कमी किंवा जास्त असे दोघेही प्रकार होता कामा नयेत. नाहीतर त्याचा उत्पादनावर चुकीचा परिणाम दिसून येतो. खतांच्या वापराबद्दल जागृती झाली पाहिजे जेणेकरून असे चुकीचे समज होणार नाहीत. उत्पादनाची वाढ हि सर्व गोष्टींची चांगली व प्रमाणात सांगड घातल्याने होत असते. सायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादनात जरी वाढ होत असली, तरी जमिनीच्या सुपीकते संबंधी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व गोष्टी लक्षात वेळीच घेणे गरजेचे आहे याने जमिनीला तर नुकसान होतच आहे. परंतु उत्पादनाच्या प्रतीवरही याचा दूरगामी नुकसानकारक परिणाम होत आहे. तसेच रासायनिक खते व अति पाण्याच्या वापरामुळे निर्माण झालेल्या क्षारयुक्त, चोपण जमिनी या वेळीच जमीन सुधारकांच्या वापर करून सुधाराव्यात. या गोष्टी वेळीच केल्याने भविष्यातील धोके टाळता येवू शकतात.

English Translate 
Fertilizer Management

Fertilizer management for crops is as important as water and soil, seeds are important for good crop production. Why Fertilizer is Needed Plants need 16 elements like Nitrogen, Phosphorus, Potash, Calcium, Magnesium, Sulfur, Carbon, Hydrogen, Oxygen, Iron, Manganese, Boron, Zinc, Copper, Molybdenum, Chlorine for healthy growth. Crops require high amount of Nitrogen, Phosphorus and Potash. These are followed by Calcium, Magnesium, Sulfur which are required by the crops as secondary nutrients. In addition, carbon, hydrogen, oxygen, iron, manganese, boron, zinc, copper, molybdenum, chlorine are called micronutrients and they require less amount of crops. These nutrients are supplied to the crops through air, water and soil. In addition, these nutrients are supplied to the crops through fertilizers.
There are two main types of fertilizers, namely organic fertilizers and inorganic fertilizers: -
Organic Fertilizers: - Organic fertilizers include manure, compost manure, green manure etc. The use of these fertilizers keeps the soil texture good. Organic fertilizers also provide a good supply of essential nutrients. Organic fertilizers are good for the growth of organisms required by the crop. Peanut crops should be included in crop rotation as they increase the amount of nitrogen available in the soil and make the soil more fertile.
Inorganic Fertilizers: - Inorganic fertilizers are chemical fertilizers. Yes, chemical fertilizers include single fertilizers, compound fertilizers, mixed fertilizers etc. Single fertilizers supply the same nutrients. One or two nutrients are supplied in compound fertilizers. Mixed fertilizers supply two or more nutrients.
Chemical fertilizers degrade soil texture. They should be avoided, as well as information on what you want to use and what you don't want to use. It is also important to know why organic fertilizers should be used and why chemical fertilizers should be avoided. Without it, modern agricultural revolution is impossible. For this, a keen and pragmatic approach is important. It is also important to study these things when the younger generation sees agriculture as an opportunity. Organic fertilizers are very important for good growth of crops. Because those who cannot supply chemical fertilizers can supply all organic fertilizers. At the same time, it does not spoil the texture of the soil, on the contrary, it improves the texture of the soil day by day. As a result, there is a good increase in production as the crops get the nutrients they need from the soil in abundance. Organic fertilizers play a major role in food production. The prevailing methods are scattering on top of fertilizer land, top dressing, spraying of manure with the help of tiffany, manure in a row, manure behind plow hour, pellet method etc.
Turning to modernity, it is important to keep in mind that the right amount of fertilizer should be given at the right time. It should not be more or less the same. Otherwise it has the wrong effect on the product. There should be awareness about the use of fertilizers so that such misconceptions do not occur. Production growth is achieved by combining all things well and in moderation. Although the use of cyan fertilizers has increased production, many questions have been raised about soil fertility. All these things need to be taken into consideration in time as it is damaging the land. But it is also having a far-reaching detrimental effect on product quality. Also, saline, loamy soils created due to use of chemical fertilizers and excess water should be improved at this time by using land reformers. Doing these things on time can prevent future dangers.

Post a Comment

0 Comments

Close Menu