आधुनिक
शेतीक्रांतीचा विचार करता शेतीकडे संधी म्हणून बघू इच्छिणाऱ्यांसाठी रोपवाटिका
व्यवसाय एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी बघावयास मिळतील, हा व्यवसाय निवडताना काही
महत्वाच्या गोष्ठी समजणे आवश्यक आहे. त्यातल्या काही बाबी आपण मागील “रोपवाटीकेतील
संधी” या लेखात बघितल्या आहेत. आजच्या लेखात आपण रोपवाटिकेचे प्रकार जाणून घेणार
आहोत. रोपवाटिका हा व्यवसाय बऱ्याच प्रमाणात वाढण्यास वाव आहे. त्यामध्ये सर्वच
रोपे एकाच ठिकाणी मिळत नाहीत. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते. त्यामध्ये
काही हंगामी रोपवाटिका असतात, तर त्या ठिकाणी वार्षिक रोपे
मिळत नाहीत. असे अनेक गोष्टी आहेत त्यामुळे योग्य त्या पद्धतीने रोपवाटिकांचे
संगोपन व्हावे यासाठी त्यांचे काही प्रकार पाडण्यात आले आहेत. रोपवाटिका हा
व्यवसाय अजून सुटसुटीत व सुरळीत होण्यास यामुळे मदत होईल. या पद्धतींमुळे वेळ
वाचतो व रोपांची निवड करणे देखील सोपे होते.सध्या रोपवाटिका हा एक शेतीला
उत्तम जोडव्यवसाय म्हणून त्याकडे पाहिले जाते. शेतकरी व तरुण पिढीने याकडे थोडा
अभ्यासक दृष्टीकोनातून बघितले पाहिजे. रोपवाटिका या व्यवसायातून दर्जेदार रोपांची
निर्मिती करून, शेतीत आधुनिक शेतीक्रांती घडवून आणली जावू शकते. रोपवाटिकेसाठी परवाना
काढणे आवश्यक आहे, त्यामध्ये सर्व माहिती देणे व समजून घेणे
यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. या सर्व गोष्टींमधून शेतकरी सुखी व
संपन्न होईल व शेतीतील उत्पादनही चांगले मिळण्यास मदत होईल.
रोपवाटिकांचे प्रकार खालील प्रमाणे :-
१. बी-बियाणे
रोपवाटिका :- या
प्रकारातील रोपवाटिकेत बियाण्यांचीच निर्मिती केली जाते. त्यामध्ये वेगवेगळ्या
पिकांच्या बियाण्यांचा समवेश होतो. या प्रकारातील रोपवाटिका कमी प्रमाणात आढळून
येतात ज्यात फक्त बियाणेच तयार केले जाते अशा. या प्रकारातील रोपवाटिकांची संख्या
वाढणे आवश्यक आहे. या माध्यमातून पारंपारिक बियाणे निर्मिती व जोपासना होणे देखील
आवश्यक आहे. चांगल्या उत्पादनासाठी उत्तम बियाणे आवश्यक असते. बी-बियाणे रोपवाटिका
बनवून दर्जेदार बियाणे व बिना भेसळ चांगले बियाणे मिळणे अजून सुलभ होईल.
२. फळझाडांची रोपवाटिका :- या प्रकारातील रोपवाटिकेत निरनिराळ्या
फळझाडांच्या विविध जातींचे कलमे, रोपे व बियाणे तयार केली
जातात. या प्रकारातील रोपवाटिकेत फळझाडांचा समावेश असतो. तसेच वेगवगळ्या
फळझाडांच्या रोपांच्या योग्य त्या वाढीनंतर त्यांची विक्रीला सुरुवात केली जाते.
३. कलमांची रोपवाटिका :- या प्रकारातील रोपवाटिकेत विविध पिकांचे कलमे
तयार करून त्यांची विक्री केली जाते. उदा. डोळा कलम, गुटी कलम
इत्यादी प्रकारचे कलमे तयार केली जातात. यात वेगवेगळ्या पिकांची वनस्पतींची
निरनिराळी कलमे तयार करून विक्री केली जाते.
४. भाजीपाला रोपवाटिका :- या रोपवाटिकेत फक्त भाजीपाल्याचाच समावेश असतो.
वेगवेगळ्या भाजीपाल्याच्या जातींचे कलमे, रोपे व बियाणे तयार
केले जातात. निरनिराळ्या भाजीपाल्याच्या योग्य त्या वाढीनंतर त्यांची विक्रीला
सुरुवात केली जाते.
५. रोपांची रोपवाटिका :- या प्रकारच्या रोपवाटिकेत बियाणे व कलमे तयार
केले जात नाहीत. तर बियाण्यांपासून रोपे तयार करून विक्री केली जाते. त्यामध्ये
भाजीपाला पिकांचेही बियाण्यांपासून रोपांची निर्मिती करून त्यांची विक्री केली
जाते उदा. मिरची, टोमॅटो इत्यादी. अशा प्रकारे सर्व
प्रकारच्या बियाण्यांपासून रोपे तयार करून त्यांची विक्री या प्रकारच्या
रोपवाटिकेत केली जाते.
६. फुलझाडे रोपवाटिका :- या प्रकारच्या रोपवाटिकेत सर्व प्रकारच्या व
विविध जातींच्या फुलझाडांची रोपे, कलमे व बियाणे तयार केली
जातात. या रोपवाटिकेत अनेक शोभिवंत वनस्पतींचीही रोपे तयार करून त्यांची विक्री
केली जाते. फुलझाडांच्या प्रकानुसार त्यांची योग्य वाढ झाल्या नंतर विक्री केली
जाते.
७. खास रोपवाटिका (Special Nursery) :- या प्रकारातील रोपवाटिकेत
एखाद्याच पिकाचे रोपे, कलमे व बियाणे तयार केले जातात. जसे
कि काही ठिकाणी फक्त गुलाबाचीच रोपवाटिका असते. त्यावरच कलमे व रोपे तयार केली
जातात. तसेच काही ठिकाणी फक्त आंबा या पिकाच्या रोपांचीच रोपवाटिका असते. अशा
प्रकारे रोपांची योग्य वाढ झाल्यावर त्या रोपांची विक्री केली जाते.
८. औषधी वनस्पतींची रोपवाटिका :- या रोपवाटिकेत सर्व प्रकारच्या औषधी वनस्पतींची
रोपे, कलमे व बियाणे तयार केली जातात. प्रत्येक वनस्पतीच्या
वेगवेगळ्या वाढीच्या काळानुसार त्या प्रमाणे त्या रोपांची विक्री केली जाते. या
प्रकारातील रोपवाटिका दुर्मिळ प्रमाणात दिसून येतात, विविध
छोट्या रोपवाटिकेत मोजके औषधी रोपे मिळतात, परंतु स्वतंत्र
औषधी वनस्पतींची रोपवाटिका फार कमी प्रमाणात आढळतात. या प्रकारातील रोपवाटिका
व्यवसाय सुरु करण्यास सध्या चांगला वाव आहे. कारण औषधी वनस्पती या मिळणे अवघड होत
चालेले आहे, म्हणून त्यांची जोपासना होणे देखील तितकेच
महत्वाचे आहे. या प्रकारातील रोपवाटिकेला सध्या चांगली मागणी आहे.
९. एकत्रित रोपवाटिका :- या प्रकारातील रोपवाटिकेत सगळ्याच प्रकारचे
थोड्या थोड्या प्रमाणात रोपे, कलमे व बियाणे आढळून येतात.
यामध्ये अनेक प्रकारचे फळझाडे व भाजीपाला व फुलझाडांचे रोपे व बियाणे आणि कलमे
आढळून येतात. या प्रकारच्या रोपवाटिका या शहरा जवळ तसेच ग्रामीण भागात आढळून
येतात.
१०. वनशेती रोपांची रोपवाटिका :- यामध्ये अनेक प्रकारचे असे रोपे, कलमे व बियाणे तयार केले जातात जे वनशेतीसाठी आवश्यक असतील. असे सर्व
प्रकारचे रोपे या प्रकारातील रोपवाटिकेत तयार केले जातात. वेगवेगळ्या पिकांच्या
योग्य त्या वाढीनंतर त्यांची विक्रीची वेळ ठरते व त्या नुसार रोपांची विक्री केली
जाते.
११. आगाऊ नोंदणी करून पुरवठा करणाऱ्या रोपवाटिका :- या प्रकारातील रोपवाटिकेत
रोपे, कलमे, बियाणे यापैकी काय व किती प्रमाणात लागणार आहे याची नोंद होते. त्यानुसार त्यांचा ठरलेल्या वेळी पुरवठा केला जातो. या प्रकारामध्ये अनेक
प्रकारे देवाण घेवाण केली जाते.
English Translate
Types Of Nurseries
The nursery business is a great option for those who want to see agriculture as an opportunity considering the modern agricultural revolution. There are so many types it's hard to say. There are so many types it's hard to say. Some of these are covered in the previous article, “Opportunities in the Nursery”. In today's article we will learn about the types of nurseries. The nursery business has a lot to grow. Not all seedlings are found in one place. You have to go to different places for that. It has some seasonal nurseries, where annual seedlings are not available. There are many such things so some of them have been demolished in order to take proper care of the nursery. This will help in making the nursery business more convenient and smooth. These methods save time and also make it easier to select seedlings.
Currently, nursery is considered as a good side business to agriculture. Farmers and the younger generation should look at this from a slightly more scholarly point of view. Nursery The modern agricultural revolution in agriculture can be brought about by producing quality seedlings from this business. It is necessary to get a license for the nursery, giving all the information and understanding in it will not cause any problem. All these will make the farmer happy and prosperous and will also help in getting better agricultural produce.
The types of nurseries are as under: -
1. Seed Nursery:- In this type of nursery only seeds are produced. It consists of seeds of different crops. This type of nursery is less common in which only seeds are produced. The number of nurseries of this type needs to be increased. It is also necessary to produce and cultivate traditional seeds through this medium. Good seeds are essential for good production. Making a seed nursery will make it easier to get quality seeds and good seeds without adulteration.
2. Fruit Tree Nursery:- In this type of nursery, cuttings, seedlings and seeds of different species of different fruit trees are prepared. This type of nursery includes fruit trees. Also the sale of different fruit trees is started after proper growth of the seedlings.
3. Crop Nursery:- In this type of nursery, cuttings of various crops are prepared and sold. E.g. Eye grafts, guti grafts etc. are made. It involves making and selling different cuttings of different crops.
4. Vegetable Nursery:- This nursery only includes vegetables. Cuttings, seedlings and seeds of different vegetable varieties are prepared. The sale of various vegetables is started after proper growth.
5. Nursery:- In this type of nursery no seeds and cuttings are produced. So seedlings are made from seeds and sold. It also sells vegetable crops by producing seedlings from seeds e.g. Peppers, tomatoes, etc. Thus seedlings are prepared from all types of seeds and sold in this type of nursery.
6. Flower Nursery:- This type of nursery produces seedlings, cuttings and seeds of all types and varieties of flowers. The nursery also produces and sells many ornamental plants. Depending on the type of flower, they are sold after proper growth.
7. Special Nursery:- In this type of nursery, seedlings, cuttings and seeds of the same crop are prepared. Like in some places there is only a rose nursery. Cuttings and seedlings are made on it. Also, in some places, only mango seedlings are grown in nurseries. Thus when the seedlings grow properly, they are sold.
8. Medicinal Plant Nursery: - In this nursery all kinds of medicinal plants, seedlings and seeds are prepared. The seedlings are sold according to the different growth periods of each plant. Nurseries of this type are rare, with a small number of medicinal plants available in various small nurseries, but individual medicinal plant nurseries are rare. This type of nursery business is currently a good opportunity to start. Because medicinal plants are becoming more and more difficult to obtain, their preservation is just as important. This type of nursery is currently in great demand.
9. Integrated Nursery:- This type of nursery has a small number of seedlings, cuttings and seeds of all types. It contains a wide variety of fruit and vegetable and flower seedlings and seeds and cuttings. These types of nurseries are found near the city as well as in rural areas.
10. Nursery Nursery:- It produces many types of seedlings, cuttings and seeds which are essential for forestry. All such seedlings are grown in this type of nursery. After the proper growth of different crops, their sale time is decided and the seedlings are sold accordingly.
11. Nurseries that supply by pre-registration:- This type of nursery records what and how much of the seedlings, cuttings, seeds will be required. Accordingly, they are supplied on time. This type of exchange is done in many ways.
0 Comments