आपला
भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. शेती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.
हे सगळे आपण बघत आणि ऐकत आलो आहोत. सध्या एकंदरीतच जगातील आर्थिक स्थिती काही
चांगली नाही. तरीही आपल्या देशाची आर्थिक स्थिती हि चांगली राहावी असेच तुम्हा
आम्हा सर्वांना वाटते. हे होणेही शक्य आहे पण केव्हा जेव्हा आपला शेतकरी सुखी आणि
संपन्न होईल तेव्हा. ज्यावेळी आपल्या शेतकऱ्यावर दुर्दैवी आत्महत्येची वेळ येणे
थांबेल तेव्हा. त्यामुळे हा विषय गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे आणि ती
टाळण्याचे किंवा त्यातून बाहेर निघण्याचे उपाय काय? या सर्व गोष्टींचे चिंतन शेतकरी व देशातील इतर
जबाबदार विभाग आणि आजची तरुण पिढी यांनी केल्यास, नक्की
शेतीला एक उत्तम व्यवसाय म्हणून चांगले दिवस आल्या शिवाय राहणार नाहीत. आपला
अन्नदाता शेतकरी देखील सुखी व संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी सुखी तर
पूर्ण देश सुखी हे विसरता कामा नये.
या सर्व गोष्टी लक्षात घेता
सध्या आधुनिक शेतीक्रांती होणे हि काळाची गरज बनली आहे. यामध्ये प्रामुख्याने
सेंद्रिय शेतीचा वापर करणे. ज्यामधून आपल्याला निरोगी व विषाणू मुक्त जमीन, हवामान व
उत्पादन मिळेल. या सगळ्यात महत्वाची बाब येते ती म्हणजे सेंद्रिय शेती मध्ये खत
औषधे कोणती द्यावीत. मग ती पिकांच्या व जमिनीच्या पोषणासाठी असोत किंवा पिकांवर
येणाऱ्या कीड व रोगांच्या निवारण्यासाठी असोत. आपल्या निसर्गाने याचीहि सोय करून
ठेवली आहे आपल्यासाठी. जनावरांपासून मिळणारे शेन, गोमुत्र
इत्यादींचा वापर. यामध्ये शेणखत या खताचा वापर करा सेंद्रिय शेती करताना, असे सांगितल्यावर असेही वाटते कि शेण सुकवून त्याचा वापर करावा म्हणजे
शेणखत होय तर असे होत नाही. शेणखत बनविणे हि एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीनेच ते
बनविले गेले पाहिजे. तेव्हा त्याचा हवा तसा उपयोग होण्यास मदत होते.
जनावरांचे गोठे हे कोणत्या पद्धतीचे आहेत हे देखील यात बघितले
पाहिजे. त्यामुळे शेणखत बनविण्यास अनेक गोष्टींची मदत होवू शकते. म्हणजे काही गोठे
हे डोक्याजवळ डोके अशा पद्धतीचे असतात. तर काही गोठे हे शेपटीकडे शेपूट असलेल्या
पद्धतीचे असतात. तर काही गोठे हे मुक्त संचार पद्धतीचे असतात जिथे जनावरांना बांधलेले
नसते. यातील पक्के गोठे आहेत कि कच्चे असेही बरेच भाग आहेत. यातला महत्वाचा मुद्दा
हा कि, गोठ्यात जनावरांचे शेण, शेतातील
व गोठ्यातील काडीकचरा, उरलेले वैरण, व
गोमुत्र इत्यादींचा उपयोग शेणखत बनविण्यासाठी केला जातो. शेणखत हे विशिष्ट जागी
ढिगारा पद्धतीने किंवा खड्डा पद्धतीने बनविले जाते. यासाठी जी पद्धत ज्यांना
बनविण्यासाठी सोयीस्कर आहे तिची निवड केली जावू शकते. नंतर हा ढीग किंवा खड्डा शेण
मातीच्या काल्याने लीपणे आवश्यक आहे. कारण यातील सर्व गोष्टी या कुजणे महत्वाचे
असते, ते जेव्हा चांगल्या पद्धतीने कुजतात तेव्हा जे खत तयार
होते ते खरे शेणखत होय.
यामध्ये देखील शेतीला उत्तम जोडव्यवसायाची संधी आहे. चांगल्या
प्रकारच्या शेणखताची निर्मिती केली जावू शकते व त्याची उपलब्धता वाढवली जावू शकते.
ज्यामुळे ज्यांना हे बनविणे शक्य नाही त्यांच्यापर्यंत खत पोहचेल. तसेच जे शेणखत
बनवू इच्छिता किंवा ज्यांना बनविणे शक्य आहे त्यांच्यासाठी चांगला व्यवसाय म्हणून
उपयोग होईल. शेणखताचा वापर हा जमिनीसाठी मोलाचा आहे. त्यातून जमिनीला व पिकांना
पोषक असे पदार्थ तर मिळतातच, जमिनीचा पोत सुधारतो, जमिनी भुसभुशीत होतात, जमीनीतील पाणी धरून ठेवण्याची
क्षमता वाढते. उत्पादनात देखील चांगली वाढ होते. असे एक नाही अनेक फायदे हे
शेणखतापासून होत असतात.
English Translate
farmyard manure
Our India is an agricultural country. Agriculture is the backbone of our country's economy. We have been seeing and hearing all this. Currently, the overall economic situation in the world is not good. However, we all want the economic condition of our country to be good. It is possible, but only when your farmer is happy and prosperous. When the time for unfortunate suicide on your farmer stops coming. So it's time to take this issue seriously and what is the solution to avoid it or get out of it? If all these things are considered by the farmers and other responsible sections of the country and today's young generation, surely agriculture as a good business will not survive without good days. Even our food farmer will not be happy and prosperous. We should not forget that farmers are happy and the whole country is happy.
With all this in mind, modern agricultural revolution has become the need of the hour. This mainly involves the use of organic farming. From which you will get healthy and virus free land, climate and production. The most important thing is which fertilizers should be given in organic farming. Whether it is to nourish crops and soil or to control pests and diseases on crops. Our nature has made it easy for us. Use of animal dung, cow urine etc. Use manure in this. When doing organic farming, it is also said that it should be used after drying the dung, which is not the case if it is manure. Making compost is a method and it should be done in that way. Then it helps to use it as it should.
It should also look at the nature of the herds. So there are many things that can help in making compost. This means that some herds have a head-to-toe approach. Some herds are tail-to-tail. So some herds are free movement where the animals are not tied up. There are many parts of it, whether they are solid or raw. The important point is that in the barn, animal dung, farm and barn waste, leftover fodder, and cow urine etc. are used to make dung manure. Manure is made in a pile or pit method in a specific place. For this, the method which is convenient to make can be chosen. This mound or pit must then be covered with a layer of dung. Because all of these things are important to decompose, the manure that is formed when they decompose in a good way is the real manure.
In this too, agriculture has the opportunity to be a good joint venture. Good quality manure can be produced and its availability can be increased. So that the fertilizer will reach those who cannot make it. It will also be used as a good business for those who want to make compost or who can. The use of manure is valuable for the land. It not only provides nutrients to the soil and crops, improves soil texture, soils become fertile, and increases the water holding capacity of the soil. There was also a good increase in production. Not one but many benefits come from cow dung.
0 Comments