परसबागेतील झुडपे व त्यांचे प्रकार



परसबागेची उभारणी करताना अनेक बाबींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. अभ्यासपूर्वक उभारणी केल्यास परसबागेची काळजी घेणे सोपे होते. यामध्ये महत्वाच्या गोष्टी म्हणजे किती जागेवर बाग असणार आहे. कोणत्या प्रकारची बाग असणार, झाडांची निवड, पाण्याची व्यवस्था इत्यादींची काळजी घेणे. झाडांची छाटणी व आकार देणे, भाजीपाला असल्यास त्याची निगा राखणे रोपांची लागवड करणे. मोठी झाडे लावायची असल्यास त्यांना लागणारी जागा, खते, झाडांची व झुडपांची अभिवृद्धी या बाबी लक्षात घ्याव्यात. 
या लेखाद्वारे आपण झुडपे व त्यांचे प्रकार या संबंधी माहिती घेणार आहोत. परसबागेत झुडूपे मोठी भूमिका निभावत असतात. झुडुपे परसबागेचा आत्मा असतात असे म्हणणे वावगे ठरणार नाही. परसबागेत झाड व झुडूपे दोघेही आपापल्या पद्धतीने बागेची शोभा वाढवत असतात. झाडे व झुडपे यात महत्वाचा फरक म्हणजे झाड एका खोडावर छत्रीसारखे वाढते. झुडूप जमिनीतून अनेक खोडांनी वाढत असते. झुडपाच्या खोडांची उंची समान असते. झुडपाला योग्य तो आकार देवून त्याची वेळोवेळी छाटणी करावी लागते. बागेसाठी झुडपाची निवड करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यामध्ये चांगली फुलणारी, हरित राहणारी, उन व सावली कमी जास्त प्रमाणात सहन करून हिरवळ टिकविणारी. तसेच काही झुडुपे कुंपणाची भूमिका बजावतात त्यानुसार योग्य त्या झुडपांची निवड करणे सोयीचे ठरते. काही झुडुपे जास्त सूर्यप्रकाश सहन करू शकतात तर काही झुडुपे कमी अधिक प्रमाणात सूर्यप्रकाश सहन करू शकतात. 

झुडपांचे प्रमुख दोन प्रकार आहेत :-
१. सदाहरित झुडपे
२. पानगळीचे झुडपे 

१. सदाहरित झुडपे :- या प्रकारातील झुडुपे वर्षभर हिरवी दिसतात. त्यामुळे बाग खुलून दिसण्यास मदत होते. बागेमध्ये कायम हिरवळ टिकून राहते. या प्रकारच्या झुडपांची पानगळ होत नाही. 

२. पानगळीचे झुडपे  :- या प्रकारातील झुडपांची पाने गळून पडतात. तसेच काही झुडपांची छाटणी करावी लागते यामुळे काही काळ बागेत हिरवळ कमी प्रमाणात दिसते. कालांतराने झुडपांना चांगला बहार येतो. या प्रकारातील झुडपांची पानगळ होते त्यावेळी पालापाचोळा उचलून टाकला जातो. त्यामुळे श्रमही वाढतात परंतु हा पालापाचोळा तसाच पडू दिला तर त्याचे कुजून चांगले सेंद्रिय खत निर्माण होते. यामुळे झाडांची वाढही चांगली होते. 
परसबाग अनेक कारणांनी उभारली जावू शकते. काही ठिकाणी छंद म्हणून, जागा जास्त असल्याने तिचा योग्य उपयोग म्हणून तर काही ठिकाणी घरातील भाजीपाला व फुलांची आवश्यकता भागविण्यासाठी इत्यादी विविध कारणांनी परसबाग उभारली जाते. झुडुपांची लागवड करताना वेगवेगळ्या अभिवृद्धी पद्धतींचा वापर केला जातो. त्यामध्ये दाब कलम, छाट कलम, गुटी कलम इत्यादी. झुडुपांची लागवड मुख्यत्वे हिवाळ्यात करणे उपयुक्त ठरते. या काळात पाणी कमी प्रमाणात असेल तरीही झुडुपांची वाढ योग्य पद्धतीने होते.   

परसबागेतील काही महत्वाची झुडपे :-
औषधी झुडपे :- तुळस, गुळवेल, राम तुळस, कापूर तुळस, अडुळसा, ब्राम्ही, वेखंड, पुदिना, निरगुडी, अक्कलकाढा इत्यादी. या औषधी वनस्पती आहेत यांनाच औषधी झुडुपे असे संबोधले जाते. ज्यांची लागवड बागेत करणे सहज शक्य आहे. 

सुगंधी झुडपे :- सोनचाफा, रातराणी, मोगरा, जिरानियम, मेंदी, हिरवा चाफा, पारिजातक इत्यादी सुगंधी झुडपे बागेत मोठ्या प्रमाणात लावली जातात. 

शोभिवंत झुडपे :- जास्वंद, तगर, सदाफुली, कृष्ण कमळ, गुलबास, ग्लोरी लिली, झिनिया, गोकर्णी, गोल्डन रॉड, कण्हेर, बोगनवेल, मोरपंखी, अबोली, बॉटल ब्रश, शंकासूर, चित्रक, निवडुंग इत्यादी काही महत्वाची शोभिवंत झुडपे आहेत ज्याने बाग अगदी मनमोहक दिसते.

English Translate 
Backyard Shrubs and Their Types

There are several things that need to be studied when setting up a backyard garden. Properly covered, it will withstand a great deal of adverse conditions. The important thing is how much space the garden will have. What kind of garden to have, selection of plants, watering system, etc. to take care of. Pruning and shaping of trees, taking care of vegetables if any, planting of seedlings. If large trees are to be planted, the space required for them, fertilizers, growth of trees and shrubs should be taken into consideration.
In this article we will learn about shrubs and their types. Shrubs play a big role in the backyard. It is safe to say that shrubs are the soul of the garden. Both the trees and the shrubs in the backyard enhance the beauty of the garden in their own way. An important difference between trees and shrubs is that the tree grows like an umbrella on a single trunk. Shrubs grow from the ground with many shoots. Shrub trunks have the same height. The shrub needs to be pruned from time to time to give it the right shape. Special care must be taken when choosing shrubs for the garden. It has good flowering, stays green, maintains green by tolerating more or less heat and shade. Also some shrubs act as a fence so it is convenient to choose the right shrubs. Some shrubs can tolerate more sunlight while some shrubs can tolerate less and more sunlight.

There are two major types of shrubs: -
1. Evergreen shrubs
2. Leafy shrubs

1. Evergreen shrubs: - This type of shrub looks green all year round. This helps to keep the garden open. The garden is evergreen. This type of shrub does not grow.

2. Leafy shrubs: - The leaves of this type of shrub fall off. Also, some shrubs need to be pruned, which makes the garden look less green for some time. Over time, the shrubs get better. When this type of shrub leaves, the mulch is picked up. This also increases the labor, but if this mulch is left as it is, its peat produces good organic manure. It also improves the growth of plants.
The kitchen garden can be built for many reasons. In some places, as a hobby, due to the large space, it is used for its proper use. Different growth methods are used in planting shrubs. It includes pressure section, cut section, gutty section etc. Shrub planting is mainly done in winter. Shrubs grow well even when water is scarce during this period.

Some important shrubs in the backyard: -
Medicinal herbs: - Tulas, Gulvel, Ram Tulas, Kapoor Tulas, Adulsa, Brahmi, Vekhand, Peppermint, Nirgudi, Akkalkadha etc. These medicinal plants are called medicinal shrubs. Which can be easily planted in the garden.

Aromatic shrubs: - Aromatic shrubs like Sonchafa, Ratarani, Mogra, Geranium, Mendi, Hirva Chafa, Parijatak etc. are widely planted in the garden.

Ornamental shrubs: - Jaswant, Tagar, Sadafuli, Krishna Kamal, Gulbas, Glory Lily, Xenia, Gokarni, Golden Rod, Kanher, Bougainvillea, Peacock, Aboli, Bottle Brush, Shankasur, Chitrak, Nivdung etc. are some of the important ornamental shrubs. Looks adorable.

Post a Comment

0 Comments

Close Menu