रासायनिक
खतांच्या दुष्परिणामांवर विजय मिळविण्यासाठी दोन अतिशय महत्वाचे उपाय केले जावू
शकतात. त्यातला पहिला उपाय म्हणजे रासायनिक खतांचा वापर करणे थांबविणे आणि दुसरा
उपाय म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर करणे. यासाठी लवकर कुणीही राजी होत नाही व
बऱ्याच प्रमाणात असा गैरसमज दिसून येतो कि रायानिक खतांचा वापर केला तर त्याचे लवकर
परिणाम दिसून येतात म्हणून त्यांचा वापर केला जातो. सोबतच असेही कारण सांगितले
जाते कि, रासायनिक
खते बाजारात लवकर उपलब्ध असतात व ते विकत घेणे सोपे वाटते. परिणामी रासायनिक
खतांचा वापर करण्याची सवय लागली आहे. हे सगळे होत असताना त्यापासून किती प्रमाणात दुष्परिणाम
होतात याकडे दुर्लक्ष होत गेले. प्रमाणात त्याचा वापर राहिला असता तर एक वेळ इतके
नुकसान झाले नसते. परंतु सध्या सवयीमुळे भरमसाठ प्रमाणात त्याचा वापर होत आहे जो
सगळ्याच बाजूंनी नुकसानकारक आहे.
सेंद्रिय
खतांचा वापर करा असे जरी बोलले गेले किंवा सेंद्रिय शेती करा असे जरी सांगितले
गेले तरी बरेच प्रश्न निर्माण होतात. हे सर्व होते कारण सेंद्रिय शेती हि आपले मूळ
आहे आणि तिचा विसर पडला व रासायनिक खतांची अति सवय झाली. म्हणून आता सेंद्रिय
शेतीकडे वळावे व त्यात कोणती खते आहेत कसे कमी खर्चात चांगली शेती होवू शकते. या
सर्व गोष्टी मांडण्याची वेळ आली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही लवकर याकडे वळले तर
चांगल्या सुधारणा होवू शकतात. रासायनिक खतांच्या वापराने होणाऱ्या दुष्परिणामांवर
विजय मिळविला जावू शकतो. सेंद्रिय खतांमध्ये अनेक प्रकारची खते आहेत. त्यामध्ये
शेणखत, गांडूळखत,
कंपोस्ट खत, लेंडी खत इत्यादी अनेक प्रकारचे
खते आहेत. ज्या खतांमधून देखील रासायनिक खतांपेक्षा जास्त गोष्टी पिकांना व
जमिनीला मिळू शकतात. तसेच त्यापासून कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत. त्यांच्यामुळे
जमिनीची घडण सुधारते व ती चांगली राहते, जमिनीची सुपीकता
वाढतच राहते.
सेंद्रिय खतांचा परिणाम लवकर
दिसून येत नाही अशी समज आहे त्याला कारण म्हणजे, आपल्याकडे झालेला रासायनिक खतांचा
भरमसाठ वापर. त्यामुळे मोठे दुष्परिणाम होत आहेत त्यांची भरपाई होण्यास कालावधी हा
लागणारच. परंतु आत्ता दिलेला कालावधी हा कायमस्वरूपी उपयोगाचा ठरेल. कालांतराने
सेंद्रिय खतांचा परिणाम हा रासायनिक खतांच्या परिनामापेक्षा लवकर व चांगला होताना
दिसून येईल. रासायनिक खतांच्या दुष्परिणामांवर विजय
मिळविण्यासाठीचे महत्वपूर्ण दोन उपाय एक म्हणजे रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे
थांबविणे व दुसरे म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर पूर्णपणे सुरु करणे. परिणामी
सेंद्रिय खतांच्या वापराची सवय देखील करून घेणे जी सवय शेतीच्या भविष्यासाठी
चांगली आहे व सजीव सृष्टीची गरज बनली आहे.
English Translate
Suggest any two measures that can be taken to overcome the
adverse effects of chemical fertilizers
Two
very important measures can be taken to overcome the adverse effects of
chemical fertilizers. The first solution is to stop using chemical fertilizers
and the second solution is to use organic fertilizers. No one agrees to this early
on and there is a widespread misconception that rye fertilizers are used
because of their early results. At the same time, it is said that chemical
fertilizers are readily available in the market and they are easy to buy. As a
result, there is a tendency to use chemical fertilizers. While all this was
going on, the extent of the side effects was being ignored. If it had been used
in moderation, it would not have caused so much damage at one time. But now it
is being used in large quantities due to habit which is harmful in all
respects.
Whether
it is said to use organic fertilizers or to do organic farming raises many
questions. This is all because organic farming is our root and it has been
forgotten and we have become addicted to chemical fertilizers. So now let's
turn to organic farming and what fertilizers are in it and how good farming can
be done at low cost. It's time to dump her and move on. It's not too late yet.
If we turn to this early, good improvements can be made. Adverse effects of
chemical fertilizers can be overcome. Organic fertilizers contain many types of
fertilizers. It contains many types of fertilizers like manure, vermicompost,
compost manure etc. Fertilizers from which crops and soil can get more than
chemical fertilizers. It also does not cause any side effects. They improve the
texture of the soil and keep it good, increasing the fertility of the soil.
The
reason why there is a perception that the effect of organic fertilizers is not
seen early is because of the excessive use of chemical fertilizers. Therefore,
it will take time for the major side effects to be compensated. But the time
given now will be of permanent use. Over time, the effect of organic
fertilizers will be seen to be faster and better than the effect of chemical
fertilizers. Two important measures to overcome the adverse effects of chemical
fertilizers are to stop the use of chemical fertilizers completely and to start
using organic fertilizers completely. As a result, the habit of using organic
fertilizers has become a habit that is good for the future of agriculture and
has become a necessity for living creatures.
0 Comments