व्यावसायिक
पिक उत्पादनाची संकल्पना आणि व्याप्ती या विषयावर जाणून घेणे सध्या अनिवार्य आहे.
कारण शेती करत असताना फक्त पिकांची लागवड करायची आहे म्हणून लागवड करणे सोडले
पाहिजे. तसेच हंगाम आला लागवडीचा म्हणून नेहमीच लागवड केली जाते, असेही करणे
थांबविले पाहिजे. अजून एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते ती म्हणजे आजूबाजूला कुणी
एखादे पिक लावले आहे, म्हणून
आपणही तेच पिक लागवड करायचे. असे एक नाही अनेक ढोबळमानाने विचार करून सध्या
पिकांची लागवड केली जाते. या सर्व पद्धतींना एक अभ्यासक दृष्टीकोनाची झालर लावली
तर किती बरे होईल. सोबतच उत्पादनाच्या बाबतीत ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते ते
देण्याची वेळ येणार नाही. शेतात पिकाचे उत्पादन घेत असताना अनेक समस्यांना तोंड
द्यावे लागते. त्यामध्ये अचानक होणारे वातावरणातील बदल, पिकांवर
येणारे कीड रोग, शेतमालाच्या भावात होणारा सततचा बदल अशा
अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते. या सर्व गोष्टी लक्षात घेवून व्यावसायिक
पिक उत्पादनाची संकल्पना आणि व्याप्ती समजून तसे करणे काळाची गरज बनली आहे.
शेती
करत असताना फक्त एकाच पिकाची लागवड न करता विविध पिकांची लागवड करण्याकडे भर दिला
पाहिजे. त्यासाठी फळबाग लागवड केली जावू शकते. त्यामध्ये जी जागा उरते त्या
जागेमध्ये अनेक प्रकारचे भाजीपाला पिकांची लागवड केली जावू शकते. अनेक प्रकारच्या
फुलझाडांची लागवड केली जावू शकते. आंतरपीक पद्धतींचा वापर करून चांगल्या प्रकारे
व्यावसायिक शेतीला चालना मिळू शकते. यामध्ये फळझाडांपासून उत्पादन मिळण्यास थोडा
कालावधी लागतो, परंतु
त्या सोबतच आंतरपीक म्हणून पिकांची लागवड केल्यास नगदी उत्पादन मिळत राहते.
त्यामुळे कुठल्याही प्रकारचे मोठे आर्थिक नुकसान होत नाही. अशा एक नाही अनेक
पद्धती आहेत ज्यातून व्यावसायिक पद्धतीने पिकांचे
उत्पादनाचा विचार होवू शकतो. या सर्व गोष्टी करत असताना पिकांची फेरपालट करणे हेही
तेवढेच गरजेचे आहे. एकाच जमिनीत एकच पिक सतत लागवड न करता पिकांची फेरपालट होणे
अत्यंत आवश्यक बाब आहे.
तसेच
शेतीतील पिकांच्या उत्पादनात जशा वेगवेगळ्या संकल्पना राबवून उत्पादनातील नुकसान
टाळता येते. त्याचबरोबर शेती उत्पादनाची व्याप्ती मोठी आहे. शेतातील मिळणाऱ्या
वेगवेगळ्या उत्पादनापासून विविध प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जावू शकतात.
त्यासाठी असे नाही कि त्या पदार्थांना मोठी जागा लागेल. असेही अनेक शेतीमाल आहेत
कि जे कमी जागेत व कमी श्रमशक्ती मध्ये देखील चांगले बनविले जावू शकतात. त्यापासून
चांगला नफा मिळविला जावू शकतो. उदाहरणार्थ आवळा या पिकासाठी विशेष अशी जमिन किंवा
इतर गोष्टींची काळजी अति प्रमाणात घ्यावी लागत नाही. त्यापासून अनेक प्रकारचे छोटे
छोटे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जावू शकतात. जसे कि, आवळा सुपारी, आवळा पावडर इत्यादी अनेक प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ यापासून बनविले
जावू शकतात. यातून त्या शेतात आवळ्या बरोबर उरलेल्या जागेत दुसरे आंतरपीक देखील
घेतले जावू शकतात.
अशा रीतीने सध्या व्यावसायिक
पिक उत्पादनाची संकल्पना आणि व्याप्ती समजून त्यानुसार शेतीमध्ये बदल घडविणे
गरजेचे आहे. कमी जागेत देखील उत्तम शेती केली जावू शकते. यासाठी सर्वांसाठी थोडा
अभ्यासक दृष्टीकोन ठेवणे व आधुनिक शेतीक्रांती होणे आवश्यक आहे. त्यामध्ये जमिनीची
काळजी घेणे, पिकांची योग्य पद्धतीने लागवड करणे, सेंद्रिय खते व औषधांचा वापर करणे, शेती करत असतांना
पर्यावरणाची काळजी घेणे इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेवून शेती
करणे आवश्यक आहे. शेतीकडे फक्त शेती म्हणून न बघता त्याकडे सर्वांनीच एक संधी
म्हणून बघितले पाहिजे. व्यवस्थित अभ्यासक पद्धतीने शेतीकडे पाहिले तर अनेक संधी
दिसून येतील शेतीमध्ये अनेक संधी दडलेल्या आहेत. शेतीतील प्रत्येक गोष्टीपासून
व्यावसायीक उपयोग दिसून येवू शकतो त्या दृष्टीने त्याकडे पाहणे आवश्यक आहे. यातून
शेतीकडे वळणे गरजेचे आहे, आपण शेतीची काळजी घेतली तर शेतीही
आपल्याला भरभरून देईल.
English Translate
Concept and scope of commercial crop production
It is currently mandatory to know the concept and scope of commercial crop production. Because you only want to cultivate crops while farming, you should stop planting. It should also be stopped as it is always planted as the season has come. Another thing that Prakash shows is that someone has planted a crop nearby, so we used to plant the same crop. Not one such crop is currently being cultivated with a lot of rough thinking. How much better it would be if all these methods were combined with a pragmatic approach. At the same time, there will be no time to deal with the problems we face in terms of production. There are many problems to be faced while harvesting crops in the field. There are many problems such as sudden changes in the climate, pest diseases on crops, constant changes in the prices of agricultural commodities. With all this in mind, understanding the concept and scope of commercial crop production has become a matter of time.
When cultivating, emphasis should be laid on cultivating different crops instead of just one. Orchards can be planted for this purpose. A variety of vegetable crops can be grown in the remaining space. Many types of flowers can be planted. Commercial farming can be better promoted by using intercropping methods. It takes some time to get the yield from the fruit trees, but at the same time, if the crops are planted as intercrops, the cash yield continues to be obtained. It does not cause any major financial loss. There are many ways in which crop production can be considered commercially. While doing all these things, it is equally important to rotate the crops. It is very important to rotate the crop without continuously cultivating a single crop in the same soil.
Also, the loss of production can be avoided by implementing different concepts in the production of agricultural crops. At the same time, the scope of agricultural production is large. Different types of processed foods can be made from different products available in the field. It does not mean that the food will take up a lot of space. There are also many agricultural products that can be made well in less space and less labor. Good profits can be made from it. Amla, for example, does not require much care or special care for the crop. From it many kinds of small processed substances can be made. Many types of processed foods like amla betel nut, amla powder etc. can be made from it. From this, other intercrops can be taken in the remaining space along with amla in that field.
Thus it is necessary to understand the concept and scope of commercial crop production at present and make changes in agriculture accordingly. Better farming can be done even in less space. For this, it is necessary for everyone to have a little pragmatic approach and a modern agricultural revolution. It is important to take care of the soil, cultivate the crops properly, use organic fertilizers and pesticides, take care of the environment while farming, etc. Agriculture should not be seen only as agriculture, it should be seen as an opportunity by all. If we look at agriculture in a systematic way, we will see many opportunities. There are many opportunities hidden in agriculture. It is necessary to look at it from the point of view of commercial use from everything in agriculture. It is necessary to turn to agriculture, if you take care of agriculture, agriculture will also give you a lot.
0 Comments