उपयुक्ततेच्या आधारे पिकांचे प्रकार


शेतात विविध पिकांची लागवड वेगवेगळ्या कारणांनी केली जाते. त्यातले साम्य असलेली एक गोष्ट म्हणजे सर्व पिकांची लागवड उत्पादन मिळवून देईल हि संकल्पना समोर ठेवून केली जाते. उपयुक्ततेच्या आधारे पिकांचे वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये जास्त उत्पादन मिळवून देणारी पिके
, कमी उत्पादन मिळवून देणारी परंतु आवश्यक असणारी पिके. कमी श्रम लागणारी पिके, जास्त श्रम लागणारी पिके. हवामानात अचानक होणारे बदल स्वीकारणारी पिके, हवामानातले बदल न स्वीकारून नुकसान होणारी पिके. जमीन व पाणी यांना चोखंदळ असणारी पिके, जमीन व पाणी यांना जसे आहे त्यात उत्पादन मिळवून देणारी पिके इत्यादी पिकांचे प्रकार आहेत. 
तसेच तृणधान्य पिके, कडधान्य पिके, गळीतधान्य पिके, भाजीपाला पिके, फळबागा, फुलशेती इत्यादी पिके आहेत. यातील पिकांची लागवड हि वेगवेगळ्या कारणांसाठी केली जाते. या बरोबरच वेगवेगळ्या हंगामात केली जाते. हंगाम, जमीन, पाणी व्यवस्थापन इत्यादी सर्व बाबींची सांगड घालून कोणते पिके घेणे उपयुक्त आहे. यावरून पिकांची लागवड केल्यास लाभ होवू शकतात. पिकांची उपयुक्तता अनेक गोष्टींच्या आधारे ठरविली जाते. तशीच ती हंगामी व वार्षिक पिके घेताना देखील ठरविली पाहिजे. कुठल्या पिकाला कोणत्या काळात बाजारभाव चांगला आहे. याचीही अभ्यासपूर्वक माहिती ठेवून पिकांची निवड केली पाहिजे. काही पिकांची प्रक्रिया करून विक्री केल्यास जास्त लाभ होतो. याही बाबींकडे अभ्यासपूर्वक लक्ष दिल्यास आधुनिक पद्धतीने शेती करण्यास चालना मिळेल व होणारे नुकसान टळेल. नुकसान झाले नाही तर आपला शेतकरी राजा सुखी व संपन्न होईल.

English Translate 
Types of crops based on utility

Different crops are cultivated in the field for different reasons. One of the similarities is that the concept is that planting all crops will yield yields. Crops are classified differently based on their suitability. These include high yielding crops, low yielding but essential crops. Crops that require less labor, crops that require more labor. Crops that accept sudden changes in climate, crops that do not accept climate change. There are different types of crops such as land and water crops, land and water crops.
There are also cereal crops, pulses, oilseeds, vegetable crops, orchards, floriculture etc. These crops are cultivated for different purposes. This is done in different seasons. Which crop is suitable to take with all the factors like season, land, water management etc.? This can be beneficial if crops are planted. The usefulness of the crop is determined by a number of factors. It should also be decided when taking seasonal and annual crops. Which crop has the best market price in which period? Crops should be selected keeping this in mind. Some crops are more profitable to process and sell. Proper attention to these matters will lead to modern farming and avoid losses. If there is no loss, our farmer king will be happy and prosperous.

Post a Comment

0 Comments

Close Menu