शेती
करत असताना अभ्यासपूर्वक शेती करणे हि काळाची गरज आहे. शेतीमध्ये अभ्यास करणे
म्हणजे असे नाही कि, सतत
पुस्तके घेवून अभ्यास केला पाहिजे आणि त्यातून शेती केली पाहिजे. माहिती मिळते
पुस्तकांमधून हे खरे आहे. परंतु त्या सर्व गोष्टी सर्वांनाच वेळेवर उपलब्ध होतील
असे नाही. तसेच त्या सर्वांनाच समजतील असेही नाही. कारण शेती हा प्रात्यक्षिक विषय
आहे. अनेक वेळा आपण शेतात विविध पिकांची लागवड करतो. त्यात काही गोष्टी असतात ज्या
नवीन पद्धतीने केल्या जातात. त्यातून काही बदल बघायला मिळतात. काही ठिकाणी मात्र
असे होताना दिसत नाही. शेती हा सतत बदलाचा विषय आहे. त्यात नवीन होणारे बदल
स्वीकारणे देखील तितकेच महत्वाचे आहे. मागच्या वेळी घेतलेले पिक त्यात काही आपण
चांगले करतो तर काही बाबतीत काही त्रुटी राहून जातात. ज्यामुळे काही नुकसानास सामोरे जावे लागते. या सर्व गोष्टी अभ्यासाच्या आहेत एका वेळी झालेली नुकसानी
गोष्ट नंतरच्या वेळी टाळता आली पाहिजे. तेव्हा तो भाग होतो अभ्यासपूर्वक शेती
करण्याचा.
शेतीमध्ये
अनेक प्रकारचे बदल हे काळानुसार स्वीकारले गेले पाहिजे. वातावरणात अचानक होणारे
बदल त्यामुळे होणारे नुकसान या गोष्टी आज नाही होत आहेत. सातत्याने या बाबी होत
आल्या आहेत आणि अजूनही होतच आहेत. यावर काहीतरी अभ्यासपूर्वक उपाय शोधणे हे तुम्हा
आम्हा सर्वांचीच जबाबदारी आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या घडवणे आपण टाळू
शकत नाही. जे आपल्या हातातले आहे त्यात मात्र आपण बदल निच्छितच करू शकतो. होणारे
नुकसान टाळू शकतो किंबहुना होणाऱ्या नुकसानीचा दाह कमी करू शकतो.
शेतीत विविध शेती पद्धती आहेत त्यात बागायती शेती, कोरडवाहू शेती इत्यादी. तसेच विविध प्रकार आहेत शेतीचे त्यामुळे योग्य त्या गोष्टीची निवड झाली पाहिजे. फळबागा लागवड वाढवली पाहिजे. बरेच असे फळबागा आहेत जे कुठल्याही जमिनीत येवू शकतात व चांगले उत्पादन देखील देवू शकतात. त्यामध्ये नगदी पिके घेता येतात. एखाद्या पिकाचे वातारण किंवा इतर काही कारणांमुळे नुकसान झाले तर दुसऱ्या पिकाचे उत्पादन मिळेल अशा रीतीने शेती पद्धतीत बदल होणे अगत्याचे बनले आहे.
English Translate
The need for study in agriculture
It takes time to cultivate carefully while farming. Studying in agriculture does not mean that you have to constantly study with books and cultivate from it. This is true from books that get information. But not all of them will be available on time. Nor will they all understand. Because agriculture is a practical subject. Many times we cultivate different crops in the field. There are some things that are done in a new way. It shows some changes. In some places, however, this does not seem to be the case. Agriculture is a subject of constant change. It is equally important to accept new changes. The crop we took in the past, we do some good in it and in some cases some mistakes remain. Which has to face some losses. All these things are of study. The damage done at one time should be avoided at a later time. Then he becomes a part of the study.
Many changes in agriculture have to be adapted over time. The damage caused by sudden changes in the climate is not happening today. These things have been happening all the time and are still happening. It is the responsibility of all of us to find a practical solution to this. You can't avoid doing things that are not in your hands. However, we can definitely change what is in our hands. It can prevent damage or even reduce the damage caused by inflammation.
There are various farming methods in agriculture including horticulture, dryland farming etc. There are also different types of farming so the right thing should be chosen. Orchard planting should be increased. There are many orchards that can grow in any soil and also give good yields. It can be used for cash crops. If one crop is damaged due to climate or some other reason, it has become necessary to change the farming method in such a way that another crop can be produced.
0 Comments