वनशेती


सध्या आपण बघतो कि
, मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. वृक्षतोड होण्याचे अनेक कारणे आहेत. औद्योगिक दृष्ट्या विचार केला तर या गोष्टी होत राहणार, परंतु याचा प्रभाव कमी केला जावू शकतो. औद्योगिक गरजा भागविण्यासाठी जंगलतोड होते, त्यामुळे अनेक गोष्टींचे नुकसान होत आहे. मनुष्य म्हणून आपले तर होतच आहे परंतु जंगलात वस्ती करणारे प्राणी, पक्षी व इतर यांची देखील मोठी हानी होताना दिसून येते. या सगळ्या गोष्टी होताना दिसतात त्याचे कारण म्हणजे आपल्या गरजा वाढल्या आणि त्या वाढतच आहेत व वाढतच राहणार. म्हणून यावर उपाय देखील शोधणे तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी सुवर्णमध्य काढणे आवश्यक आहे. तो सुवर्णमध्य म्हणजे वनशेतीकडे वळणे, वनशेती करणे अत्यंत गरजेचे आहे. वनशेती मध्ये खूप मोठ्या संधी दडलेल्या आहेत त्याकडे आपण डोळसपणे बघणे काळाची गरज बनले आहे. 
वनशेती करत असताना महत्वाची बाब म्हणजे जमीन सर्वसाधारण असेल तरी चालते. त्यासाठी विशेष चांगल्या जमिनीची आवश्यकता नसते. सोबतच त्यामध्ये आंतरपिके घेतली जावू शकतात. या बरोबरच वनशेतीसाठी विशेष पाण्याची गरज नसते. मुबलक पाणी उपलब्ध असले तरी पिके तग धरतात व उत्पादन देतात. कुठल्याही पिकांसाठी काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात त्या म्हणजे जमीन, पाणी, वातावरण, मनुष्यबळ, बाजारभाव इत्यादी. वनशेती करताना मनुष्यबळ कमी प्रमाणात लागते. एकदा लागवड झाली कि त्यात खूप काही लक्ष देण्याची आवश्यकता नसते. वनशेती करताना एक चांगली गोष्ट होते ती म्हणजे ज्या पिकाची लागवड केलेली असते, त्याचा पालापाचोळा जमिनीवर पडत राहतो. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते, म्हणून त्या जमिनीत आंतरपिके चांगल्या प्रकारे घेतली जावू शकतात. तसेच या पिकांना कुठल्याही प्रकारचे हवामान विशेष असे नुकसानकारक ठरत नाही. त्याचे कारण म्हणजे हि पिके नाजूक प्रकारातील नसतात. त्यामुळे एखाद्या वर्षी कमी पाऊस झाला किंवा जास्त पाऊस झाला तर त्याचा या पिकांवर चुकीचा प्रभाव दिसून येत नाही. तसेच या पिकांना जास्त प्रमाणात खर्च येत नाही. म्हणजे कुठले कीड किंवा रोग विशेष असे जडत नाहीत. त्यामुळे फवारण्या करण्याचा खर्च वाचतो. 
सध्या चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या जंगलतोडीमुळे सरकार वनशेती करण्यास प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे. या गोष्टींची देखील माहिती घेणे आवश्यक आहे. वनशेती करताना कुठली पिके घ्यावीत त्यामुळे चांगला लाभ होवू शकतो हे बघणे गरजेचे आहे. आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे, आपल्याकडील हवामान कोणत्या प्रकारचे आहे. त्यात कोणते पिक चांगले येईल हे ठरवून पिकांची लागवड केली पाहिजे. तसेच ते पिक कोणत्या कारणासाठी लागवड करत आहोत याचीही तेवढीच माहिती असणे गरजेचे आहे. या गोष्टीची माहिती असली तर त्यांना बाजार चांगला मिळण्यास मदत होईल. सगळ्या गोष्टी नियोजन पद्धतीने केल्यास उत्पादनाला बाजारभाव चांगला मिळेल. कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. महाराष्ट्रातील हवामानात बांबू, साग, निलगिरी, कडुलिंब इत्यादी पिके चांगली घेतली जावू शकतात. या सोबतच महारुख याचे उत्पादन चांगले घेतले जावू शकते. त्याचा उपयोग काडीपेटी बनविण्यासाठी केला जातो. 
वनशेती केल्यास जंगलतोड मोठ्या प्रमाणात थांबविण्यास मदत होईल. वनशेती केल्यामुळे उत्पादन तर मिळेलच सोबतच पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन थांबविता येईल. वनशेती मधून अनेक गोष्टी साध्य केल्या जावू शकतात. औद्योगिक क्षेत्राची मागणी घेवून त्याचा पुरवठा केला जावू शकतो. यामुळे सर्वच गोष्टींचे संतुलन राहण्यास मदत होईल.

English Translate 
Forestry

Right now we see a lot of deforestation. This causes damage to the environment. There are many reasons for deforestation. From an industrial point of view, these things will continue to happen, but the impact can be minimized. Deforestation is taking place to meet industrial needs, so many things are being lost. As human beings, it is happening to us, but it is also seen that the animals, birds and others living in the forest are suffering a great loss. The reason we see all this happening is because our needs have increased and they are growing and will continue to grow. So it is the responsibility of all of us to find a solution. For this, it is necessary to draw a golden mean. That golden mean is to turn to forestry, it is very important to do forestry. It takes time for us to take a closer look at the huge opportunities that lie ahead in forestry.
The important thing when doing forestry is that even if the land is normal, it works. It does not require particularly good soil. At the same time intercrops can be grown in it. In addition, no special water is required for forestry. Despite abundant water, crops thrive and produce. Some of the most important things for any crop are land, water, environment, manpower, market prices, etc. Forestry requires less manpower. Once planted, it does not require much attention. One of the good things about forestry is that the mulch of the crop that is planted keeps falling on the ground. This helps in improving the soil texture, so intercropping can be done well in that soil. Also, these crops are not particularly affected by any kind of weather. This is because these crops are not delicate. Therefore, if there is less or more rain in a year, it does not have a negative effect on these crops. Also these crops do not cost much. This means that there are no special pests or diseases. So the cost of spraying is worth it.
Currently, the government is encouraging deforestation due to deforestation. We are implementing various schemes for this. These things also need to be known. It is important to look at the crops that can be used for afforestation. What kind of land do you have, what kind of climate do you have? Crops should be planted by deciding which crop will be best. It is also important to know the purpose for which the crop is being planted. Knowing this will help them get a better market. If everything is done in a planned manner, the product will get a good market price. There will be no damage of any kind. Bamboo, teak, eucalyptus, neem etc. can be grown well in the climate of Maharashtra. Along with this, Maharukh's product can be taken well. It is used to make kadipeti.
Forestry will help to stop deforestation on a large scale. Forestry will not only bring yield but also stop the imbalance of the environment. Many things can be achieved through forestry. It can be supplied by the demand of the industrial sector. This will help keep everything in balance.

Post a Comment

0 Comments

Close Menu