पिकांच्या
सुयोग्य वाढीसाठी चांगल्या निरोगी उत्पादनासाठी महत्वाचे असते योग्य हंगामात
पिकांची लागवड होणे. यासाठी पिकांची निवड व त्यांचा हंगाम या गोष्टी महत्वाच्या
असतात. योग्य त्या हंगामात योग्य पिकांची लागवड होणे गरजेचे असते. पिकानुसार
त्यांना मानवणाऱ्या हंगामात पिकांची लागवड झाल्यास कीड व रोगही आटोक्यात राहण्यास
मदत होते. पेरणीसाठी अनेक महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. त्यापैकी
महत्वाची बाब म्हणजे जमिनीतील ओलावा विचारात घेवून पिकांची पेरणी करणे. बऱ्याच ठिकाणी
पिकांच्या वाढीला चांगला वेळ मिळावा यासाठी “धूळ पेरणी” केली जाते. धूळ पेरणी
म्हणजे पाऊस वेळेवर होईल अशा अपेक्षेने कोरड्या मातीत बियाण्यांची पेरणी केली
जाते. जमीन वाफशावर आल्यावर पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या काळात बियाण्याची लागवड केल्यास बियाण्यांची उगवण चांगली होते व
पेरणीही व्यवस्थित होण्यास मदत होते. याबरोबरच अजून काही मुद्दे लक्षात घेणे
आवश्यक आहेत ते म्हणजे हवेतील व जमिनीतील तापमान. हे तापमान पाहिजे त्या प्रमाणात
कमी झाले नाही तर गहू पिकाच्या रोपांना मुळकुजव्या रोगाची लागण होण्याची शक्यता
असते. अशा अनेक पिकांमध्ये अनेक कारणांनी रोग व कीड जडत असतात. त्यामुळे योग्य
हंगामातच पिकांची योग्य त्या पद्धतीने लागवड करणे अगत्याचे आहे. हंगामानुसार
पिकांची लागवड होणे हे यशस्वी पिक लागवडीचे सूत्र मानले जाते.
यासाठी तीन मुख्य हंगाम आहेत ते म्हणजे खरीप, रब्बी व उन्हाळी :-
खरीप :- खरीप हंगाम हा जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये
असलेला बघावयास मिळतो. ज्या पिकांना हा कालावधी मानवतो त्याच पिकांची लागवड या
काळात करावी. जेणेकरून त्यांना वातावरण अनुकूल असते आणि उत्पादनाच्या वाढीत चुकीचे
परिणाम होत नाहीत. तसेच कीड
व रोगही नियंत्रणात राहतात. या कालावधीमध्ये भात, ज्वारी,
बाजरी, कापूस इत्यादी पिकांची लागवड केली
जाते. या पिकांसाठी हा कालावधी अनुकूल समजला जातो. या कालावधीत शक्यतो अशा पिकांची
लागवड केली जाते ज्या पिकांना कमी पाणी दिले तरीही त्यांच्यावर कुठलाही नुकसान कारक
परिणाम होणार नाही.
रब्बी :- रब्बी हंगाम हा ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत
असल्याचे समजले जाते. ज्या पिकांना थंड हमानात काहीही वाईट परिणाम होत नाही
त्यांची लागवड या कालावधीत केली जाते. जी पिके थंडीला अपवाद असतात त्यांना थंड
हवामान मानवते ती पिके रब्बी हंगामात घेतली जातात. थंडीमुळे त्यांना काहीही हानी
नसते अशा पिकांची लागवड या हंगामात होत असते. करडई, गहू, हरभरा इत्यादी पिके मुख्य
प्रमाणात या कालावधीत घेतली जातात.
उन्हाळी :- उन्हाळी हंगाम हा मार्च ते जून या कालावधीत असतो.
या काळात ज्या पिकांना उन्हाळी हंगाम मानवतो त्यांची लागवड केली जाते. ज्या
पिकांना उन्हाचा काहीही नुकसानकारक परिणाम होणार नाही याची काळजी घेवून या
कालावधीत पिकांची लागवड केली जाते. कुठल्याही प्रकारचा कीड व रोगांचा प्रसार होवून
काही नुकसान होणार नाही. याची
खात्री करून कोणते पिक या कालावधीत घेणे योग्य आहे हे बघून पिकाची निवड करावी. या
कालावधीत मोठ्या प्रमाणात उन्हाळी भुईमुग, काकडी, दोडका, खरबूज, टरबूज इत्यादी
पिकांची लागवड केली जाते.
अशा विविध पिकांची लागवड हि
वेगवेगळ्या हंगामात केली पाहिजे. योग्य त्या हंगामात लागवड करण्यासाठी अभ्यासक
दृष्टीकोन अतिशय महत्वाचा आहे. तरुण पिढीने शेती कडे एक संधी म्हणून बघताना या
सर्व बाबींचा अभ्यासक दृष्टीकोन ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. यामध्ये अनेक संधी
असतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या हंगामात विविध पिकांची लागवड होत असते. पिकांच्या
लागवडीसाठी जमीन, हवामान, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन इत्यादी सर्व गोष्टींची योग्य मात्रा व योग्य वेळ तेवढीच
महत्वाची आहे. आधुनिक शेतीक्रांती म्हणून शेतीकडे बघताना या सर्व गोष्टींची जागृती
करणे अत्यंत महत्वाचे आहे. अभ्यासपूर्वक योग्य हंगामात लागवडीसाठी योग्य त्या
पिकाची निवड हि यशस्वी उत्पादनाची खात्री देते.
English Translate
Crop Sowing Season
Proper growth of crops is important for good healthy production. Planting of crops at the right season is important. The selection of crops and their season are important for this. The right crops need to be planted in the right season. Depending on the crop, if they are planted during the growing season, pests and diseases can be controlled. Many important things are taken into account for sowing. The most important of these is to sow crops taking into account soil moisture. In many places, “dust sowing” is practiced to give crops a good time to grow. Dust sowing means sowing of seeds in dry soil in anticipation of timely rains. Crops are cultivated in large quantities when the land comes to Vafsha. Seed sowing during this period helps in better germination of seeds and also helps in proper sowing. In addition, there are other issues to consider: air and ground temperatures. If this temperature is not reduced to the desired level, the seedlings of wheat crop are more likely to be infected with root rot disease. Many such crops are infested with diseases and pests for a number of reasons. Therefore, it is important to plant the crop in the right way at the right season. Seasonal planting is considered to be the key to successful crop cultivation.
There are three main seasons for this: Kharif, Rabi and Summer: -
Kharif: - The kharif season is from June to October. The same crops should be planted during this period. So that they have a conducive environment and do not adversely affect the growth of production. Pests and diseases are also under control. During this period paddy, sorghum, millet, cotton etc. are cultivated. This period is considered favorable for these crops. It is possible to cultivate crops during this period which will not be affected even if the crops are given less water.
Rabbi: - Rabi season is considered to be from October to March. Crops which are not affected by cold weather are cultivated during this period. Crops that are cold exceptions are grown during the rabi season. Crops that are not harmed by the cold are planted during this season. Crops like safflower, wheat, gram etc. are mainly grown during this period.
Summer: - Summer season is from March to June. Crops grown during the summer season are cultivated during this period. Crops are planted during this period taking care that the crops will not be affected by the sun. There will be no harm from the spread of any kind of pests and diseases. The crop should be selected by making sure which crop is suitable for this period. During this period a large number of summer crops like groundnut, cucumber, dodka, melon, watermelon etc. are cultivated.
Such different crops should be planted in different seasons. Practical approach is very important for planting right in that season. It is equally important for the younger generation to have a pragmatic approach to agriculture as an opportunity. There are many opportunities in this. In many places different crops are grown in different seasons. The right amount and timing of all the things like land, weather, water management, fertilizer management, etc. are just as important for planting crops. It is very important to be aware of all these things when looking at agriculture as a modern agricultural revolution. Careful selection of the right crop for planting in the right season ensures successful production.
0 Comments