पिकाच्या
उत्तम उत्पादनासाठी चांगली जमीन, पाणी, खते, बियाणे आवश्यक
असतात. त्याचबरोबर आवश्यक असते ती म्हणजे बियाणे लागवडीची योग्य पद्धत. वेगवेगळ्या
पिकाच्या लागवडीच्या वेगवगळ्या पद्धती आहेत. त्यामध्ये काही मुख्य पद्धती आहेत
त्या पुढील प्रमाणे... १. बी फोकून बियाण्याची पेरणी करणे. २. पाभरीने बियाण्याची
पेरणी करणे. ३. बियाणे टोकून पेरणी करणे. ४. रोपे तयार करून लागवड करणे. या चार
पद्धती लागवडीच्या प्रमुख पद्धती समजल्या जातात यामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने
लागवड होत असते.
प्रत्येक पद्धतीने लागवडीचे काही सूत्र आहेत ते खालील प्रमाणे :-
१. बी फोकून बियाण्याची पेरणी करणे (एका ठिकाणी उभे राहून हातात
बियाणे घेवून जागेवरून सभोवती फेकणे) :- या पद्धतीमध्ये मजूर कमी प्रमाणात लागतात. कारण
यामध्ये बियाणे हे शेतात फोकून दिले जातात त्या नंतर त्यावरून कुळवे फिरवून बी
मातीत झाकले जाते. तसेच काही ठिकाणी यावरून लाकडी फळीही फिरविली जाते. या
प्रकाराने लागवड करत असताना मोठ्या प्रमाणावर बियाणे लागत असते. बियाणे शेतात काही
ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पडते, त्यामुळे काही ठिकाणी दाट तर
काही ठिकाणी तुरळक रोपे उगवताना दिसतात. तसेच झाडांच्या दोन रोपांमध्ये व
ओळींमध्ये समान अंतर नसते. मशागतीचे कामे करणेही या पद्धतीत अवघड होत असतात.
२. पाभरीने बियाण्याची पेरणी करणे :- या पद्धतीने लागवड करत असताना
दोन ओळींमध्ये तर समान अंतर असते परंतु दोन रोपांमध्ये सारखे अंतर राहत नाही.
कोरडवाहू पिकांची व बागायती पिकांची लागवड या पद्धतीने केली जाते. त्याचप्रमाणे या
पद्धतीने लागवड करताना योग्य खोलीवर बियाण्याची लागवड करणे सोयीचे होते. यामध्ये
अनेक अवजारे आहेत एक चाड्याची पाभर, दोन चाड्याची पाभर इत्यादी.
३. बियाणे टोकून पेरणी करणे :- या पद्धतीने लागवड केल्यास मशागतीचे कामे करणे
सोपे जातात. कारण या पद्धतीने लागवड करत असताना विशिष्ट अशा अंतरावर खुणा करून
लागवड केली जाते. या पद्धतीने लागवड केल्यास दोन ओळींत व दोन रोपांतील अंतर योग्य
व समान ठेवता येते. त्यामुळे रोपांची वाढ चांगली होते. खून केलेल्या ठिकाणी दोन
किंवा तीन बियाणे टाकले जातात. रोपे चांगली वाढल्या नंतर ज्या रोपाला चांगली वाढ
आहे ते ठेवले जाते, दुसरे काढून टाकले जाते अशा प्रकारे
विरळणी केली जाते. या पद्धतीने लागवड करत असताना मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागते.
या पद्धतीने मका, भुईमूग, एरंडी
इत्यादींची लागवड केली जाते.
४. रोपे तयार करून लागवड करणे :- या पद्धतीने लागवड करत असताना बियाण्याची लागवड
हि गादीवाफे किंवा सपाट वाफ्यात केली जाते. यामध्ये भाजीपाला पिके, भात इत्यादी बियाण्यांची लागवड या पद्धतीने केली जाते. बियाणे वाफ्यांवर ३
ते ५ आठवड्यापर्यंत वाढविली जातात हा कालावधी पिकांनुसार वेगवेगळा असतो. नंतर या
रोपांची शेतात लागवड केली जाते, या पद्धतीने लागवड करत
असताना मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागते.
अशा प्रमुख बियाणे लागवडीच्या
पद्धती आपण पाहिल्यात. या सर्व गोष्टींमध्ये महत्वाची बाब आहे ती म्हणजे कोणते पिक
लागवड करत आहोत. त्यानुसार कोणत्या पद्धतीने बियाणे लागवड करणे आवश्यक आहे. कारण
काही पिकांची वेळच्या वेळी मशागत होणे अत्यंत आवश्यक असते. नाहीतर प्रमुख पिकाला
दिले जाणारे खत व पाणी हे शेतात उगविणारे तन त्याचे भागीदार बनतात, प्रमुख पिकाला
त्याचा योग्य तो लाभ होत नाही. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी मशागत महत्वाची असते.
त्यासाठी कोणते पिक कोणत्या पद्धतीने लावावे याची अभ्यासक दृष्टीकोन ठेवून निवड
करावी. तरुण पिढीने याकडे लक्ष देणे अगत्याचे आहे. कारण फक्त लागवड करायची म्हणून
न करता योग्य ती पद्धत देखील महत्वाची आहे. शेती व बियाण्याची लागवड हे सगळे एक
शास्र आहे आणि त्या सर्वांची एक शास्रोक्त पद्धत देखील आहे. ती म्हणजे योग्य वेळी
योग्य गोष्टींची निवड व त्या नुसार त्यांची राबवण. या सर्व बाबी एक सूत्रात
झाल्यात तर पिकांची चांगली वाढ होवून उत्पादन चांगले मिळण्यास मदत होईल परिणामी
येणारे अडथळे टळतील व शेतकरी सुखी व संपन्न होईल. शेती एक संधी आहे त्याकडे
अभ्यासक दृष्टीने पाहिले पाहजे व त्या ओळखल्या पाहिजेत.
English Translate
Main methods of crop sowing
Good soil, water, fertilizers, seeds are essential for good crop production. At the same time, what is required is proper method of seed cultivation. There are different methods of cultivating different crops. There are some main methods in it as follows ... Sowing seeds by sowing seeds. 2. Sowing of seeds with pabhari. 3. To sow the seeds. 4. Preparation and planting of seedlings. These four methods are considered to be the major methods of cultivation in which different types of cultivation are done.
Here are some formulas for each method of cultivation: -
1. Sowing seeds by sowing seeds (standing in one place and carrying seeds in hand and throwing them around the place): - This method requires less labor. This is because in this the seeds are sown in the field and then the seed is covered in the soil by turning the stalks. In some places, wooden planks are also rotated. This type of planting requires a large amount of seeds. Seeds fall more or less in some places in the field, so in some places dense and in some places sparse seedlings appear. Also, there is no equal distance between two plants and rows. This method also makes farming difficult.
2. Sowing of seeds with pavari: - When sowing with this method, the distance between two rows is equal but the distance between two seedlings is not the same. Dryland crops and horticultural crops are cultivated in this manner. Similarly, it was convenient to sow the seeds at the right depth when planting with this method. It has many tools like one chadya pabhar, two chadya pabhar etc.
3. Sowing by sowing seeds: - If sown in this method, tillage works become easier. This is because when planting with this method, planting is done by marking a certain distance. When planted in this manner, the spacing between two rows and between two seedlings can be kept correct and even. So the seedlings grow well. Two or three seeds are sown at the place of murder. After the seedlings have grown well, the seedling which has good growth is kept, the other is removed and thinned. This method of planting requires a lot of manpower. Maize, groundnut, castor etc. are cultivated by this method.
4. Preparation of seedlings and planting: - While sowing in this method, the seeds are sown in mattress or flat bed. In this vegetable crop, rice etc. seeds are sown in this method. Seeds are grown on stalks for 3 to 5 weeks, depending on the crop. These seedlings are then planted in the field, which requires a large amount of manpower.
We have seen such major seed cultivation methods. The important thing in all this is what crop we are planting. According to which method the seeds must be sown. This is because timely cultivation of some crops is essential. Otherwise, the fertilizer and water supplied to the main crop become its partner in the field and the major crop does not get its due benefit. Cultivation is important to avoid all these things. For this, the choice should be made keeping in view the method of planting which crop. It is important for the younger generation to pay attention to this. This is because the right method is important, not just planting. Agriculture and seed cultivation are all one science and also a scientific method of all of them. It is about choosing the right things at the right time and implementing them accordingly. If all these things are done in one formula, good growth of crops will help in getting better yields, resulting obstacles will be avoided and farmers will be happy and prosperous. Agriculture is an opportunity that should be looked at from a scholarly point of view and recognized.
0 Comments