आज आपण
सगळेच शेती या विषयाकडे दुर्लक्ष करत आहोत.खास करुन शेतीकडे सुशिक्षित तरुण वर्गाने वळणे जास्त आवश्यक आहे. बाहेर
अनेक चांगले job शोधत असतो परंतु आपली शेती असुनही
ती दुर्लक्षित राहते कारण आपण शेतीकडे एक संधी म्हणून बगतच नाही. चांगला job शोधण्यासाठी ज्याप्रमाने प्रयत्न करतो, जर शेती
असलेल्यांनी थोडे प्रयत्न आपल्या शेतात काहीतरी नविन करण्यासाठी केले तर किती बर
होईल ना... व ज्यांच्याकडे शेती नाही तेही शेती घेऊन आपला उत्तम शेती व्यवसाय सुरु
करू शकतात. अशा प्रकारे नव्या दृष्टिकोनातून शेतीकडे बघू शकतो व शेतीला आधुनिकतेची
जोड देवू शकतो. शेती करत असताना शेतीला पूरक जोडव्यवसाय करता येतील, त्यामध्ये अनेक व्यवसाय आहेत गांडुळ खत निर्मिती गांडूळ खतापासून गांडूळ
तर मिळतातच, खतही मिळतेच परंतु सेंद्रिय शेती करताना
अजून एक महत्वाची गोष्ट यातून मिळते ती म्हणजे व्हर्मीवॉश. ज्याचा पिकांवर
येणाऱ्या किड व रोगांच्या नियंत्रणासाठी उपयोग होतो. गायींचा गोठा ज्यातुन
आपल्याला दूध, शेण, गोमूत्र
मिळते. दूधापासून रोजचे आर्थिक उत्पादन मिळत राहते, तर
शेणाचे अनेक उपयोग आहेत, सेंद्रिय शेतीमध्ये मोठ्या
प्रमाणावर शेण व गोमूत्राचा उपयोग केला जातो. तसेच शेळीपालन, कुक्कुट पालन, रोपवाटिका, औषधी वनस्पती लागवड, बदक पालन इत्यादी अनेक
शेतीला जोडव्यवसाय सुुरू करता येतील.प्रत्येकाची
परिस्थिती, परिसरातील वातावरण यावर आपला जोडव्यवसाय कुठला
करावा हे अवलंबून आहे. याबरोबरच शेती करताना सुयोग्य नियोजन केल्यास चांगले शेती
प्रकार देखील करता येतील. त्यामध्ये फळबाग, भाजीपाला, फुलशेती पैकी आपल्या शेतीच्या प्रकारानुसार आणि वातावरणानुसार वेगवेगळे
प्रकार अवलंबू शकतो.
फळबाग :-
फळबाग
करताना विशिष्ट अंतरावर फळझाडांची लागवड केली जाते. त्यामध्ये रिकाम्या जागेत
वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला पिके घेतली जाऊ शकतात.त्यामुळे फळांचे हंगामी पीक आपल्याला मिळेल व भाजीपाल्याचे नगदी उत्पादन
मिळत राहील. फुलझाडांचे वेगवेगळे प्रकार देखील लागवड करता येऊ शकतात. ही झाली
प्रकारांबद्दल माहिती आता आपण जाणून घेऊया फळबाग लागवडीतून काय काय करता येईल.
फळबाग लागवडीमुळे अनेक प्रकारचे फायदे होतात वेगवेगळ्या प्रकारची फळे लावल्यामुळे
आपण त्यासाठी चांगले मार्केट बघून विक्री करू शकतो. आपल्या मालाची प्रत चांगली
असेल तर आपण विदेशात त्याची निर्यात करू शकतो.
तसेच
आपल्याला आवड असेल तर आपण त्यापासून वेगवेगळे प्रक्रियायुक्त पदार्थ बनवू शकतो.उदा. पपई पासून जॅम, जेली, टुटीफ्रुटी, मुरंबा, पेपेन असे पदार्थ बनवले जातात. असे वेगवेगळ्या फळांपासून वेगवेगळे पदार्थ
बनवले जातात. त्यानुसार प्रक्रिया केलेल्या पदार्थांना मागणी तर चांगली असतेच, बाजारभावही चांगला मिळण्यास मदत होते....
English Translate
A New Approach To Agriculture Part-1
Today we are all ignoring the issue of agriculture. It is especially important for the educated youth to turn to agriculture. There are many good job seekers out there but despite our farming it is neglected because we do not look at farming as an opportunity. The way we try to find a good job, how much better it would be if those who are farmers put a little effort to do something new in their field ... and even those who don't have a farm can start their own good farming business by taking up farming.
In this way we can look at agriculture from a new perspective and add modernity to agriculture. There are many businesses that can be used as a supplementary business while farming. There are many occupations in which vermicompost is made. Which is used for control of pests and diseases on crops. A herd of cows from which we get milk, dung, cow urine. While daily economic production is derived from milk, dung has many uses, organic farming uses a large amount of dung and cow urine. In addition, goat rearing, poultry rearing, nursery, cultivation of medicinal plants, duck rearing etc. can be started as a side business. Everyone's situation depends on the environment in the area. In addition to this, with proper planning, good farming practices can be done. There are different types of orchards, vegetables, floriculture depending on your type of farming and environment.
Orchards: - Fruit trees are planted at certain distances during orchard cultivation. In it, different types of vegetables can be grown in the open space. Therefore, we will get a seasonal crop of fruits and cash production of vegetables. Different types of flowers can also be planted. Here's a look at some of the things that can be done with orchards. Horticulture has many benefits. Planting different types of fruits helps us to find a good market and sell them. If you have a good copy of your goods, we can export it abroad.
Also, if you like, you can make different processed foods from it. E.g. Jams, jellies, tutifrutti, marmalade, papain are made from papaya. Different foods are made from different fruits. Demand for this specialty has grown significantly as a result of recent corporate scandals.
0 Comments