शेती करतांना पर्यावरणाची काळजी घेणे हि काळाची गरज...


पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर होय. शेती करत असतांना जमीन हा महत्वाचा घटक आहे. जमिनीवर घडणाऱ्या सर्व गोष्टींचा वातावरणावर परिणाम होत असतो. मग तो परिणाम काही वेळा चांगला तर काही वेळा वाईटही बघायला मिळतो. त्यामध्ये महत्वाच्या काही बाबी आहेत जसे कि आपण पिकांवर करत असलेली फवारणी. मोठ्या प्रमाणात होणारा रासायनिक खते व औषधांचा वापर यामुळे अनेक प्रकारचे नुकसान होत असते. रासायनिक खते
, औषधांमुळे मित्रकीटकांचा नाश होतो, जमिनीची उत्पादन क्षमता कमी होत जाते, परिणामी जमीन नापीक होते. जमिनीची जलधारण क्षमता कमी होते, जमिनीचा पोत बिघडतो, जमीन चोपन होत जाते. जमिनीतील आवश्यक घटकांचा नाश होतो. पर्यावरण दुषित होते त्याचा सजीव सृष्टीवर दुष्परिणाम दिसून येतो. तसेच जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंचा यामुळे नाश होत जातो. पिकांवर येणाऱ्या कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी सेंद्रिय खतांचा व औषधांचा वापर करावा. यामुळे जमिनीची जलधारण क्षमता वाढते, जमिनीतील उत्पादन क्षमतेवर कुठलाही वाईट परिणाम यातून होत नाही. 
तसेच इतर काही गोष्टी ज्या केल्यामुळे वातावरणावर त्याचा मोठा दुष्परिणाम होतो. जसे कि धसकटे जाळणे असो वा झूम शेती जिला स्थलांतरित शेती असेही संबोधले जाते. यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते. जमिनीची गुणवत्ता बिघडते, जमिनी मधील जीवाणू, मित्रकीटक यांचा नाश होतो. जमिनीची नत्र स्थिरीकरणाची क्षमता कमी होते, जमीन नापीक होत जाते. यामुळे वातावरणाचे मोठे नुकसान होते कारण धसकटे जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन हवेत पसरतो त्याचा वातावरणावर दुष्परिणाम होतो. वातावरणातील हवा यामुळे दुषित होत जाते. त्याचा सजीवांवर वाईट परिणाम होतो. या ऐवजी जर धसकटे व चारा पिके जमिनीत गाडले तर त्याचा जमिनीच्या जलधारण क्षमतेत चांगला बदल झालेला दिसून येईल. सूक्ष्म जीवाणूंची वाढ होईल, नत्राचा नाश होणार नाही. तसेच जमिनीचा पोत देखील बिघडणार नाही. वातावरणात कुठलाही वाईट परिणाम होणार नाही, वातावरणातील हवा स्वच्छ व चांगली राहण्यास मदत होईल. त्यामुळे सजीवांवर जे रोग पसरलेले दिसून येतात मग त्यामध्ये मनुष्य, पशु, पक्षी, वनस्पती इत्यादींच्या स्वास्थ्यावर होणारे चुकीचे परिणाम टाळायला मदत होईल.
पर्यावरणाची काळजी घेणे आज काळाजी गरज बनली आहे. शेती सोडून इतर क्षेत्रात देखील अशा गोष्टी होताना दिसतात ज्याचा पर्यावरणावर चुकीचा परिणाम होतो. पर्यावरण कशामुळे बिघडते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु त्यावर उपाय काय ते बघून तशी कृती करणे गरजेचे आहे. सगळ्याच क्षेत्रात वेगवेगळे उपाय आहेत जे आपण वापरात आणून पर्यावरणाचे होणारे नुकसान थांबवू शकतो. आपण सातत्याने हे बघत असतो कि काही प्रजाती या धोक्यात आहेत त्या वाचवल्या पाहिजेत. हे सगळे बघत असताना मनुष्यावर सुधा हि वेळ येईल कि काय... असा प्रश्न निर्माण होतो. हे टाळायचे असेल तर पर्यावरणाला वाचवणे गरजेचे आहे. कारण माणसाचे आयुष्य चांगले व निरोगी राहण्यासाठी वातावरण निरोगी असणे तेवढेच आवश्यक आहे. वातावरणाचा समतोल कुठेतरी आपल्यामुळेच बिघडलेला आहे व सुधारणेही आपल्याच हातात आहे. पर्यावरणाचा समतोल राखून आपण आपल्या पुढच्या पिढीला रोगमुक्त आयुष्य व निर्मळ चांगले वातावरण देवू शकतो. प्रत्येकाने ठरवले पाहिजे कि आपण पर्यावरणाला हानिकारक गोष्टी करणे टाळायचे व पर्यावरण पूरक गोष्टींचा वापर करायचा. असे करणे प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे याची जाणीव सर्वांना असावी. अश्या काही गोष्टींमधून आपण आपले पर्यावरण राखू शकतो.

English Translate
Taking care of the environment while farming is a need of the hour

The environment is the environment around us. Land is an important factor when farming. Everything that happens on the ground affects the environment. Then the result is sometimes good and sometimes bad. There are some important things like spraying on crops. Excessive use of chemical fertilizers and drugs causes many types of damage. Chemical fertilizers, pesticides destroy allied insects, reduce the productivity of the soil, resulting in soil infertility. The water holding capacity of the soil decreases, the texture of the soil deteriorates, the soil becomes chopped. Essential elements in the soil are destroyed. Pollution of the environment can have a detrimental effect on living things. It also kills micro-organisms in the soil. Organic fertilizers and pesticides should be used to control pests and diseases on crops. This increases the water holding capacity of the soil and does not adversely affect the productivity of the soil.
As well as some other things that have a major detrimental effect on the environment. For example, zoom farming is also referred to as migrant farming. This reduces the productivity of the land. Soil quality deteriorates, bacteria and algae in the soil are destroyed. As the nitrogen fixation capacity of the soil decreases, the soil becomes barren. This causes a great deal of damage to the atmosphere because the burning of dust causes a large amount of carbon to be released into the air, which has a detrimental effect on the atmosphere. This pollutes the air in the atmosphere. It has a bad effect on living things. Instead, if fodder and fodder crops are planted in the soil, it will show a good change in the water holding capacity of the soil. Microbes will grow, nitrogen will not be destroyed. Also the texture of the soil will not deteriorate. There will be no adverse effects on the atmosphere, it will help to keep the air clean and good. Therefore, the spread of diseases on living beings will help to avoid adverse effects on the health of humans, animals, birds, plants, etc.
Taking care of the environment has become a need of care today. There are other areas besides agriculture that have adverse effects on the environment. We all know what causes the environment to deteriorate. But it is necessary to see the solution and act accordingly. There are different solutions in every field that we can use to stop the damage to the environment. We are constantly seeing that some endangered species need to be saved. While looking at all this, the question arises as to whether the time will come for Sudha. To avoid this, it is necessary to save the environment. Because a healthy environment is just as important for a person's life to be good and healthy. The balance of the environment has been disturbed by us and it is up to us to improve it. By maintaining the balance of the environment, we can give our next generation a disease free life and a pure and good environment. Everyone should decide that we should avoid doing things that are harmful to the environment and use things that are environmentally friendly. Everyone should be aware that it is everyone's responsibility to do so. We can protect our environment from some of these things.

Taking care of the environment while farming is a need of the hour Video :-

Post a Comment

0 Comments

Close Menu