अभ्यासपूर्वक पिकांची लागवड



सध्याची सर्व बाजूंची परिस्थिती बघितल्यास असे लक्षात येते कि, काही भागांमध्ये पिकांचे उत्पादन कमी येते. अशा ठिकाणी त्या पिकाला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी एखादे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते पण तेथे त्या पिकाला खूप कमी बाजारभाव मिळतो. शेतकऱ्यांनी केलेला खर्चही काही वेळा निघणे हलाखीचे होवून बसते. परिणामी पिक चांगले येईल भाव मिळेल या भरोशावर जे कर्ज घेतलेले असते. उधारी केलेली असते, विविध कारणांसाठी जसे खते, औषधे इ. ते सगळे फेडणे अवघड होवून जाते. कर्जबाजारीपणा या सर्व गोष्टींमुळे वाईट गोष्टी झालेल्या दिसून येतात. थेट इतपर्यंत कि, शेतकरी आपला अन्नदाता आत्महत्येचा विचार करतो जी सर्वात जास्त दुर्दैवी गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी. हे सगळे टाळायचे असेल तर अभ्यासपूर्वक पिकांची लागवड हि आज काळाची गरज बनली आहे. अभ्यास पूर्वक लागवड करणे म्हणजेच सारासार गोष्टी लक्ष्यात घेणे ज्यामध्ये सर्व गोष्टींची योग्य ती सांगड घालणे. म्हणजे जमीन कशी आहे, त्यात कोणत्या पिकाची लागवड चांगली होवू शकते, कोणत्या पिकला चांगली मागणी राहू शकते, वातावरण या सर्व गोष्टी बघाव्यात. या बरोबरच सर्वात महत्वाची बाब लक्ष्यात ठेवणे गरजेचे आहे ती म्हणजे आपल्या बाजूच्या शेतकऱ्याने ज्या पिकाची लागवड केली तेच पिक आपण घ्यावे असे नाही. कारण बहुतेक वेळा हेही बगायला मिळते कि खूप शेतकरी आजूबाजूचे एकाच पिकाची लागवड करतात व त्यांना पाहिजे तसा भाव मिळत नाही परिणामी नुकसानीस सामोरे जावे लागते. हे सगळे टाळायचे असेल तर पिकांची लागवड करताना अभ्यासक दृष्टीकोन महत्वाचा आहे. पिकाची लागवड करताना हे बघावे कि पिकाला चांगला बाजारभाव मिळाला पाहिजे मग तो आपल्या भागात असो वा इतर भागात. या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे कारण या सर्वांवरच आपले उत्पादन ठरत असते. या बरोबरच पिक कोणते घेतले जाणार आहे व तो माल वाहतूक त्या ठिकाणाहून करणेही सोपे झाले पाहिजे. या सोबतच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पिकांसाठी सरकारच्या योजना असतात याचीही माहिती घेणे गरजेचे आहे. यातून काही योजना या बियाण्यांसाठी असतात, काही योजना अवजारांसाठी असतात, काही योजना पिक विम्यासारख्या असतात अशा एक न अनेक सरकारच्या योजना असतात. यांची माहिती जवळच्या कृषी कार्यालयामधून घेत राहावे तसेच Online Government Website वरूनही योजनांची माहिती मिळते व अर्जही online करता येतात यातून बऱ्याच गोष्टी सोप्या होण्यास मदत होते. सरकारच्या योजना या शेतकऱ्यांसाठी असतात पण त्याच्या माहितीच्या अभावी त्याचा योग्य तो परिणाम दिसून येत नाही आणि तो दिसायचा असेल तर थोडे अभ्यासक शेतकऱ्याला व्हावेच लागेल आणि झालेच पाहिजे. जे अजिबात अवघड नाही जे आत्ता करत आहात तेच फक्त थोडे वेगळ्या पद्धतीने करायचे बाकी काही नाही. शेती तीच शेतकरी तोच सगळे काही तेच फक्त त्याला थोडी नव्याची झालर लावणे गरजेचे आहे. ज्याने शेतकरी सुखी व समृद्ध होण्यास मदत होईल. जे शेतकरी शिकलेले नाहीत ते जास्त या गोष्टींमध्ये पडत नाही व लक्ष देत नाहीत पण सध्याच्या काळात या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या प्रत्येक शेतकऱ्यांचे मुले व मुली हे नक्कीच सुशिक्षित आहेत त्यांनी थोड आपल लक्ष जर शेतीकडे एक संधी म्हणून दिले तर आज दुसरीकडे Job शोधण्यापेक्षा आपल्याकडे आपण इतरांना Job निर्माण करून देवू शकतो. या भावनेने पाहिले तर हे होणे काहीही अवघड नाही. कारण तरुणांची इच्छाशक्ती एकत्र आली तर कुठलीही क्रांती घडू शकते. सध्याच्या काळात आधुनिक शेती क्रांती होणे हि काळाची गरज बनलेली आहे आणि ती होण्यास अभ्यासक दृष्टीकोन, पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड आवश्यक आहे. सध्या तरुणांनी शेती कडे पाहताना एक संधी म्हणून बघावे व काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर अनेक गोष्टी सोप्या होण्यास मदत होते. भारतमातेला सुखी व संपन्न करण्यास आपलाही हातभार लागल्याचा आनंद मिळेल. आपण तरुण वर्गाने या सर्वांकडे वळणे गरजेचे आहे ती आपली गरज तर आहेच परंतु ते आपले आद्य कर्तव्य देखील आहे.

English Translate 
Careful planting of crops

Looking at the current situation from all sides, it can be seen that crop yields are declining in some parts. In such places the crop appears to be in great demand. In some places a product is in large quantities but there it gets a very low market price. Even the expenses incurred by the farmers sometimes go unnoticed. As a result, the crop will get better and the price will be better. Borrowed for various purposes like fertilizers, medicines etc. It all becomes difficult to repay. Debt settlement can make the difference between success and failure. Directly so, the farmer thinks of his breadwinner suicide which is the most unfortunate thing for all of us. If we want to avoid all this, the cultivation of crops has become the need of the hour. Careful planting means taking into account all the things in which all things are properly combined. That is to say, we have to look at how the land is, which crops can be cultivated well, which crops can be in good demand, the environment. Along with this, the most important thing to keep in mind is that we should not take the same crop that was planted by the farmer next to us. This is because it is often the case that many farmers cultivate the same crop in the vicinity and do not get the desired price, resulting in losses. To avoid all this, a pragmatic approach is important when planting crops. When planting a crop, make sure that the crop gets a good market price, whether it is in your area or elsewhere. All these things you need to know because your product depends on all of them. Along with this, it should also be easier to pick the crop and transport it from that place. It is also important to know that the government has schemes for different crops for the farmers. Some of these schemes are for seeds, some schemes are for implements, some schemes are like crop insurance. You can get the information from the nearest agriculture office as well as information about the schemes from the online government website and you can also apply online. This helps to make many things easier. The government's plans are for these farmers but due to lack of information it does not show the right result and if it is to be seen then a little studious farmer has to be and must be. What is not difficult is that what you are doing now is just a little different. Agriculture is the same farmer, everything is the same, he just needs to be given a new look. Which will help the farmers to be happy and prosperous. Farmers who are not educated do not pay much attention to these things but these things need to be paid attention at present. At present, the sons and daughters of every farmer are certainly well educated. If they pay a little attention to agriculture as an opportunity, we can give jobs to others instead of looking for jobs elsewhere. With this feeling, it is not difficult to happen. Because any revolution can happen if the will of the youth comes together. The modern agricultural revolution has become a necessity of the times and it needs a practical approach, a combination of modernity with tradition. Nowadays, when young people look at agriculture as an opportunity and remember a few things, many things can be made easier. We will be happy to help you make Mother India happy and prosperous. We, the youth, need to turn to all this, it is our need, but it is also our first duty.

Careful planting of crops Video :- 

Post a Comment

0 Comments

Close Menu