शेतीसाठी
महत्वाचा घटक म्हणजे जमीन त्यावरच शेतीच्या सर्व घडामोडी व उलाढाली अवलंबून असतात.
जमिनीमध्ये पिक घेण्यापूर्वी ज्या जमिनीत पिक घ्यायचे आहे त्या जमिनीतील मातीचे परीक्षण
करणे गरजेचे असते. त्यातून आपल्याला त्या जमिनीत असणारे घटकांचे प्रमाण समजत असते.
तसेच पिकाच्या लागवडीच्या वेळी कोणते खते द्यावे व प्रमाण किती द्यावे हे समजते.
जमिनीचा सामू आपल्याला यातून माहिती होतो. आता आपण बघूया जमिनीची काळजी कशी घेवू
शकतो, ज्यामुळे
पिकांची वाढ चांगली होवून दर्जेदार उत्पादन येण्यास मदत होईल. परिणामी बाजारभाव
चांगला मिळेल व त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होण्यास मदत होईल. या सर्व गोष्टी
एक सुत्रीत व्हायच्या असतील तर जमिनीची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जमिनीत
सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा. सेंद्रिय पदार्थांचा वापर करणे म्हणजे नेमके काय
करणे किंवा सेंद्रिय म्हणजे नक्की काय व कसे ते आपण समजावून घेवू कारण याबाबत बरेच
प्रश्न पडलेले दिसून येतात. असे होते कि सर्वच सांगतात सेंद्रिय शेती केली पाहिजे, परंतु सेंद्रिय शेती करायला लागल्या नंतर नक्की पिकांवर रोग किडी आल्यावर कोणते
औषध फवारायचे हे प्रश्न पडतात. त्याचे कारण म्हणजे भरमसाठ प्रमाणात होणारा
रासायनिक खत औषधांचा वापर त्याचीच झालेली सवय. यामुळे आपले मूळ असलेले सेंद्रिय
म्हणजे काय याचा विसर पडला कि काय असे वाटते. आता आपण बघुयात सेंद्रिय म्हणजे
नक्की काय व सेंद्रिय शेती म्हणजे काय. सेंद्रिय याचा अर्थ “सह इंद्रिय” म्हणजेच
इंद्रियांचा वापर करून केलेली शेती ती सेंद्रिय शेती. इंद्रिय हि सजीवांना असतात
आणि सजीव दोन प्रकारचे एक म्हणजे प्राणी दुसरे म्हणजे वनस्पती सर्व प्रकारच्या
सजीवांना अवयव असतात. म्हणजेच प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांचा वनस्पतीचे अन्न
म्हणून उपयोग करणे. त्यात खत अवस्थेत तसेच वनस्पतींवर कीड व रोग येतात म्हणजे
वनस्पती आजारी पडतात, अशक्त होतात त्यांना चांगल्या अवस्थेत
आणण्यासाठी या अवशेषांचा वापर करणे म्हणजे सेंद्रिय शेती करणे होय. त्यामध्ये
पालापाचोळा, शेन, गोमूत्र, गांडूळखत, व्हर्मिवॉश, दशपर्णी
अर्क इत्यादी सजीवांच्या अवशेषांचाच हा भाग आहे.
सेंद्रिय पदार्थाचे आधी तपकिरी
रंगाच्या ह्युमस नावाच्या पदार्थामध्ये रुपांतर होते. नंतर वनस्पतीच्या पोषणास
लागणाऱ्या कार्बन, नत्र, स्फुरद, पालाश,
गंधक यांसारख्या मुलघटकात रुपांतर होते. हे कार्य जमिनीतील विविध
सूक्ष्म जीव त्यांच्या स्वत:च्या पालन पोषणा बरोबरच करत असतात. पाला पाचोळा जमिनीत
कुजू दिल्यास कुजलेला पालापाचोळा जमिनीतील ओलावा धरून ठेवण्यास मदतीचा ठरत असतो.
जमिनीची सच्छिद्रता पोकळी जपणे गरजेचे असते त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते,
सूर्यप्रकाश जमिनीला व पिकांना चांगला मिळण्यास मदत होते. हे सगळे
चांगले ठेवायचे काम सेंद्रिय पदार्थ करत असतात. पिकांना सेंद्रिय पदार्थांचा
पुरवठा करत असताना ते जमिनीत कमी अधिक प्रमाणात पडले तर त्याचा वाईट व दुष्परिणाम
जमिनीवर होत नाही. जमिनीत पोषक तत्व हे सेंद्रिय पदार्थ वापरल्यानेच चांगले
राहतील. ते चांगले राहिले तर वर्षानुवर्ष जमीन चांगली होत जाईल तिचा पोत चांगला
राहील. त्या जमिनीत घेतले जाणारे पिके चांगले उत्पादन देतील व त्यात कुठलाही
विषाणूचा अंश राहणार नाही. परिणामी चांगला सकस व विषाणूरहित आहार मानवास मिळण्यास मदत
होईल. या आहारामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. तसेच जमिनीतील सूक्ष्मजीव व अन्नद्रव्य वाचवायचे असतील तर
त्यासाठी सेंद्रिय हा एकमेव पर्याय आहे आणि सध्या ती काळाची गरज देखील आहे. नाही
तर असाच जर रासायनिक खते व औषधांचा वापर चालू राहिला तर जमिनी नापीक बनत जातील.
जमीन पिकांसाठी महत्वाची आहे आणि तिला जपणे तेवढेच महत्वाचे आहे म्हणून जमिनीची
गरज आपण आता ओळखली पाहिजे. जमिनीमध्ये अनेक गोष्टी असतात त्या सर्व टिकणे आवश्यक
आहे. सेंद्रिय कर्ब हे फक्त सेंद्रिय पदार्थांतुनच वाढू शकते जे आजकाल
परीक्षणातून दिसून आले आहे कि कमी होत चालले आहे ते वाचवले पाहिजे. जमिनीमध्ये जी
साखळी आहे तिची काळजी घेतली गेली पाहिजे. त्यासाठी सूक्ष्मजीव, अन्नद्रव्य, पाणी, सूर्यप्रकाश
इत्यादी घटकांची जमिनीत चांगली सांगड घातली गेली तर जमीन उत्तम राहून पिके चांगली
येण्यास मदत होईल. याचा थेट परिणाम उत्पादनाच्या प्रतीवर दिसून येईल. जमिनीची
सुपीकता टिकवली जाने अत्यंत गरजेचे आहे आणि ती फक्त सेंद्रिय पदार्थांच्या वापरणेच
टिकू शकते.
English Translate
Land care for good yield in agriculture
The important factor for agriculture is the land on which all the activities and turnover of agriculture depend. Before taking the crop in the soil, it is necessary to test the soil in the soil in which the crop is to be grown. From that we understand the amount of elements in that soil. It also understands which fertilizers to apply at the time of planting and how much to apply. From this we know the surface of the land. Now let us see how we can take care of the soil, which will help the crop to grow better and produce quality produce. As a result, the market price will be better and it will help the farmers to benefit financially. If all these things are to be in harmony, then it is necessary to take care of the land. For this, organic matter should be used in the soil. We will explain exactly what it means to use organic matter or what exactly is organic and how, because there are so many questions. It happens that everyone says that organic farming should be done, but after starting organic farming, the question arises as to which medicine to spray when the disease pests on the crops. The reason for this is the habit of using chemical fertilizers in large quantities. It seems that we have forgotten what our original organic is. Now let's see what exactly is organic and what is organic farming. Organic means "co-senses" which means organic farming. The senses belong to living beings, and the two kinds of living beings, one being animals and the other being plants, are the organs of all living things. That is to use the remains of animals and plants as plant food. Pests and diseases occur in the manure stage as well as on the plants so that the plants get sick and weak. To use them in good condition means to do organic farming. This is part of the remains of living things like mulch, shen, cow urine, vermicompost, vermiwash, dashaparni extract etc.
Organic matter is first converted to a substance called brown humus. It then converts to plant nutrients such as carbon, nitrogen, phosphorus, potash, and sulfur. These functions are performed by various micro-organisms in the soil along with their own nourishment. If the leaves are soaked in the soil, the rotten leaves help to retain the moisture in the soil. The porosity of the soil needs to be maintained so that air circulation is maintained in the soil and sunlight helps the soil and crops to get better. Organic matter is what keeps them going. While supplying organic matter to the crop, if it falls more or less in the soil, it does not adversely affect the soil. The nutrients in the soil will only get better with the use of organic matter. If it stays good, the soil will get better year after year and its texture will remain good. Crops grown in that land will give good yields and will not contain any traces of viruses. As a result, good nutritious and non-toxic food will help humans. This diet will help boost the body's immune system. Organic is the only option if you want to save soil microorganisms and nutrients and now it is time consuming. Otherwise, if the use of chemical fertilizers and pesticides continues, the lands will become barren. Land is important for crops and it is just as important to take care of it so we need to recognize the need for land now. There are many things in the land that must survive. Organic carbs can only be increased by organic matter which has been shown to be declining nowadays. The chain that is in the ground should be taken care of. For this, if micro-organisms, nutrients, water, sunlight etc. are well mixed in the soil, the soil will remain good and the crop will be good. This will have a direct effect on the product copy. Soil fertility needs to be maintained and can only be maintained with the use of organic matter.
0 Comments